UPSC Full Form in Marathi | यूपीएससी म्हणजे काय?

मित्रांनो! यूपीएससीने आपल्या देशामध्ये घेतली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज भरतात.

जर तुम्ही यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा विचार करीत असाल किंवा UPSC Full Form in Marathi म्हणजे काय? हे शोधत असाल तर चिंता करू नका कारण आजच्या या लेखामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

UPSC Full Form in Marathi
UPSC Full Form in Marathi

UPSC Full Form in Marathi | UPSC meaning in Marathi

UPSC Full Form in Marathi: Union Public Service Commission.

UPSC म्हणजेच Union Public Service commission ज्याला आपण मराठी भाषेमध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोग” असे म्हणतात.

युपीएससी एक अशी संघटना आहे जिच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, विविध पदांसाठी भरती काढल्या जातात, IAS, IPS, IFS, IRS इत्यादी पदांची भरती केली जाते.

युपीएससी म्हणजे काय?

UPSC चां Full From केंद्रीय लोकसेवा आयोग कसा होतो. युपीएससी एक अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि केडर तसेच भारतीय संघाच्या सशस्त्र सैन्याने भरती प्रक्रिया आयोजित करते. UPSC ही एक राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आहे या परीक्षेसाठी देशभरातील कुठल्याही भागातून विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.

तसेच यूपीएससी परीक्षे मार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत 24 पदाची भरती करण्यासाठी जबाबदार ठरते. यूपीएससी परीक्षा ही भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांन पेक्षा सर्वात कठीण आहे.

UPSC ही level A आणि level B कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी स्वतंत्र संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची स्थापन ही 1 ऑक्टोंबर 1926 रोजी करण्यात आली. यु.पी.एस.सी चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. तसेच युपीएससी दरवर्षी भारत देशांमध्ये नागरी सेवा परीक्षा घेत असते.

UPSC अंतर्गत पोस्ट:

यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा अंतर्गत विविध पोस्ट दिल्या जातात. म्हणजेच Union Public Service commission ने निवडलेले उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) इत्यादी पदांवर भरती होते.

तसेच यूपीएससी परीक्षा मार्फत विविध क्षेत्रातील level A आणि level B च्या ऑफिसर साठी देखील परीक्षा घेतल्या जातात. एवढेच नसून शयूपीएससी दरवर्षी सिव्हिल सेवा परीक्षा देखील घेते.

यूपीएससी परीक्षेसाठी आवश्यक पात्रता:

1. यू.पी.एस.सी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी प्रथमता आपण भारत देशाचे नागरिक असण्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

2. यूपीएससी परीक्षेचे अवेदन करण्यासाठी उमेदवार पदवीत्तोर असणे व ती पदवी विद्यालय किंवा शासनमान्य असणे आवश्यक य आहे. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना देखील यूपीएससी परीक्षा अर्ज भरता येतो.

3. यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 30 वर्ष असणे अनिवार्य आहे. तर अनुसूचित जाती व जमातींच्या उमेदवारांसाठी 5 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत आहे.

UPSC परीक्षेचे स्वरूप:

यूपीएससी परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला यूपीएससी परीक्षेच्या तीन टप्प्यातून जावे लागते. त्यात पूर्व परीक्षा (Prelim Exam), मुख्य परीक्षा (Main Exam) आणि मुलाखत (Interview) असे तीन टप्पे असतात.

1. पूर्व परीक्षा (prelim Exam):

यु.पी.एस.सी च्या पूर्व परीक्षा मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. पूर्व परीक्षेसाठी दोन पेपर असतात पहिला पेपर सामान्य अध्ययनाचा दुसरा पेपर वैकल्पिक विषयाचा असतो. हे दोन्ही पेपर इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून विचारले जातात.

2. मुख्य परीक्षा (Mains):

पूर्व परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळते. मुख्य परीक्षा ही पूर्णपणे वर्णनात्मक प्रकाराचे असते. यामध्ये सामान्य अध्यायन, इंग्रजी भाषा, निबंध, भारतीय भाषा आणि वैकल्पिक विषय अशा विविध विषयांचे पेपर असतात.

3. मुलाखत (interview):

 मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत घेतली जाते.मुख्य परीक्षेनंतर ज्या दोन ते तीन महिन्यांच्या काळानंतर मुलाखत हा टप्पा येतो. ही मुलाखत फक्त दिल्ली मध्येच होते.

यूपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा:

यूपीएससी तर्फे घेण्यात येणार्‍या परीक्षा या पुढील प्रमाणे;

सिविल सेवा परिक्षा (CSE)

भारतीय संरक्षण अकादमी परीक्षा (NDA)

भारतीय वन सेवा परीक्षा (IFSE)

इंजिनिअरिंग सेवा परीक्षा  (ESE)

भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (IES)

नौदल आकादमी परीक्षा (NAE)

एकत्रिक संरक्षण सेवा परीक्षा (CDS)

एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (CMSE)

भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS)

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा (CAPF)

Conclusion:

UPSC Full Form in Marathi: Union Public Service Commission ( केंद्रीय लोकसेवा आयोग ).

Official website: UPSC

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा