BHMS कोर्स माहिती | BHMS Course Information in Marathi

By Jay Vijay Kale • 

होमिओपॅथी म्हणजे काय?

होमिओपॅथी शरीराचा नैसर्गिक पद्धतीने बचाव करण्यासाठी मदत करते. होमेओपथिचे अशे मानणे आहे कि निरोगी व्यक्तीमध्ये लक्षणे आणणारी कोणतीही गोष्ट खूप छोट्या प्रमाणामध्ये (diluted dose) दिल्यावर दुसऱ्या आजारासारखे लक्षणे असणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी मदत  करू शकते.

जेव्हा तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा डॉक्टर तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारतात आणि सगळ्या लक्षणांची नोंद घेऊन तुमच्या उपचाराला सुरवात करतात.

होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी तुमच्याकडे BHMS डिग्री असणे आवश्यक आहे. BHMS हा ५.५  वर्षाचा डिग्री कोर्स आहे जो तुम्ही तुमच्या बारावी विज्ञान नंतर करू शकता.

BHMS कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (BHMS course information in Marathi)

BHMS चा फुल फॉर्म आहे: Bachelor of Homeopathic Medicine and Surgery

BHMS हा होमिओपॅथी क्षेत्रातला एक डिग्री कोर्स आहे. विद्यार्थी होमिओपॅथिक डॉक्टर होण्यासाठी हा कोर्स करतात. ज्या विद्यार्थ्यांकडे BHMS डिग्री असते ते “Dr.” हे title वापरू शकता.

BHMS कोर्सचा कालावधी ५.५ वर्षाचा आहे. ह्या ५.५ वर्षांमध्ये ४.५ वर्ष तुम्ही अभ्यास करतात आणि एका वर्षासाठी तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते.

BHMS कोर्स सेमिस्टर पॅटर्नचे पालन करतो, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुमची परीक्षा होते. एका वर्षांमध्ये २ सेमिस्टर असतात म्हणजे तुम्हाला BHMS कोर्स पूर्ण करतांना ९ सेमिस्टर पास करावे लागतात.

BHMS कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे?

जर तुम्हाला BHMS कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमचे science क्षेत्रात educational background असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमची बारावी कॉमर्स किंवा कला क्षेत्रातून झालेली असेल तर तुम्ही BHMS कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही.

BHMS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तुमची बारावी विज्ञान स्ट्रीम मधून पूर्ण केलेली पाहिजे. तूम्हाला बारावी मध्ये PCB हे विषय असणे आवश्यक आहे आणि तुमचा aggregate score ५०% पेक्षा जास्त असावा.

तुम्ही NEET परीक्षा पण देणे गरजेचे आहे. जर तुम्ही NEET  प्रवेश परीक्षा दिलेली नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.

BHMS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी:

 • तुमची बारावी science स्ट्रीम मधून केलेली पाहिजे.
 • तुम्ही बारावी science मध्ये PCB हे विषय घेलेले पाहिजे.
 • तुमचे PCB विषयात ५०% aggregate गुण असणे आवश्यक आहे.
 • तुम्ही NEET प्रवेश परीक्षा दिलेली पाहिजे.

BHMS कोर्सचे काही specializations:

BHMS कोर्स करतांना तुम्हाला एखादया specialization ची निवड करावी लागते. काही BHMS  specialization आहेत:

 • Paediatrics
 • Psyciatry
 • Skin Specialist
 • Pharmacy
 • Infertility Specialist

BHMS कोर्सनंतर काय करावे?

BHMS कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतःचे क्लिनिक टाकू शकता किंवा जॉब करू शकता.

BHMS कोर्स पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे ३ पर्याय असतात:

 • स्वतःचे क्लिनिक टाकणे
 • जॉब करणे
 • पुढे शिक्षण चालू ठेवणे

BHMS पदवीधारकांना कोणते जॉब भेटतात?

BHMS  कोर्सनंतर तुम्हाला खालील जॉब भेटू शकता:

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि BHMS डिग्री धारकांना नोकरी कोण देते. नोकरी देणाऱ्या काही संस्था आहेत:

 • खाजगी/सरकारी क्लिनिक/दवाखाना
 • मेडिकल कॉलेज
 • Research institutes
 • Homeopathic medicine stores (pharmacies)
 • NGO’s
 • Pharmaceutical Industries

BHMS  कोर्स पूर्ण झाल्यावर जर मला शिक्षण चालू ठेवायचे असेल तर मी कोणते कोर्स करू शकतो?

BHMS नंतर करता येणारे काही कोर्स आहेत:

 • MD
 • M.Sc
 • PGDM
 • MHA
 • MBA
 • MPH

Also read –

 • (D Pharmacy Course Information in Marathi)
 • Jay Vijay Kale

  नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

  Keep Reading

  No Featured Image

  Pharm D कोर्स माहिती | Pharm D Course Information in Marathi

  No Featured Image

  हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स इन्फॉर्मेशन |Hospital Management Course Information in Marathi

  बीएससी नर्सिंग (बेसिक) कोर्स | BSc Nursing Information in Marathi

  बीएससी नर्सिंग (बेसिक) कोर्स | BSc Nursing Information in Marathi

  B.Sc Nursing Information in Marathi | Admission साठी कॉलेज एंन्ट्रांन्स एक्जाम दयावी लागेल.  एंन्ट्रांन्स एक्जाम एप्रिल - जुन मध्ये होतात. फॉर्म त्या आधी सुटतात.

  No Featured Image

  MBBS कोर्स माहिती | MBBS Course Information in Marathi

  No Featured Image

  बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर ( Bsc. Agriculture ) कृषि क्षेत्रातील एक उत्तम करिअर || Bsc. Agriculture full Course information in Marathi

  No Featured Image

  BMLT कोर्स बद्दल माहिती | BMLT Course Information in Marathi

  बी फार्मसी म्हणजे काय? | B Pharmacy Information in Marathi

  बी फार्मसी म्हणजे काय? | B Pharmacy Information in Marathi

  DMLT कोर्स माहिती, पात्रता, प्रवेश प्रक्रिया (DMLT Course Information in Marathi)

  DMLT कोर्स माहिती, पात्रता, प्रवेश प्रक्रिया (DMLT Course Information in Marathi)

  DMLT course information in Marathi, DMLT हा एक डिप्लोमा कोर्से आहे. कोर्सचा कालावधी १ वर्ष किंवा २ वर्ष असू शकतो. कोर्सचा कालावधी तुम्ही कोणत्या कॉलेजला कोर्स अवलंबून आहे.

  No Featured Image

  बीएएमएस कोर्सेची माहीती | BAMS Course Information in Marathi

  bams हा 5.5 वर्षाचा एक मेडीकल अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आर्युवेदा मेडीकल अँड सर्जरी कोर्सचा अभ्यासक्रम वैदयकीय क्षेत्राचा पारंपारीक आणि आधुनिक या दोन्ही बाबींवर केंद्रीत आहे. (BAMS COURSE INFORMATION IN MARATHI)

  No Featured Image

  डी फार्म कोर्स माहिती | D Pharmacy Information in Marathi

  D Pharmacy Information in Marathi | दोन वर्षांची D Pharmacy पदविका, बारावी उत्तीर्ण म्हणजेच १० + २ उत्तीर्ण विद्यार्ध्यांसाठी विकसित केलेला प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे.

  No Featured Image

  BDS कोर्स माहिती | BDS Course Information in Marathi

  GNM कोर्स माहिती | GNM Nursing Course Information in Marathi

  GNM कोर्स माहिती | GNM Nursing Course Information in Marathi

  GNM हा ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. तुम्ही नोंदणीकृत ANM नर्स असाल तरच तुम्ही GNM कोर्सला प्रवेश घेऊ शकता. | GNM Nursing Course Information in Marathi