BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 01/12/2022

BBI चा फुल फॉर्म बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स असा आहे.

BBI हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे.

BBI कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे? BBI कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?

ह्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमची बारावी पूर्ण असणे एक महत्वाची अट आहे. तुम्हाला बारावी मध्ये ५०% किंवा जास्त गुण असणे आवश्यक आहे. जर तुमचे ५०% पेक्षा कमी तुन असतील तर तुम्ही BBI कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्र नाही.

काही कॉलेज BBI कोर्सला बारावी नंतर प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रतीक्षा पण घेऊ शकता. हि प्रवेश परीक्षा तुमच्या अकरावी आणि बारावी मध्ये शिकवलेल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावर सेट केलेली असेल.

BBI कोर्सचा कालावधी किती आहे? BBI कोर्सच्या परीक्षा कश्या होतात?

या कोर्सचा कालावधी ३ वर्षाचा आहे आणि प्रत्येक वर्षांमध्ये २ सेमिस्टर समाविष्ट केलेले आहेत.

BBI कोर्सची परीक्षा सेमिस्टर पॅटर्न ने होते म्हणजे एका वर्षात तुमची २ वेळा परीक्षा घेतली जाते. तुम्हाला हा कोर्स पूर्ण करण्यासाठी ६ सेमिस्टर पास करावे लागतात.

BBI कोर्समध्ये मला काय शिकवले जाते?

हा कोर्स तुम्हाला फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग आणि संबंधित क्षेत्रात प्रशिक्षण देते.

आजच्या जगात बँकिंग आणि इन्शुरन्स यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञान हाताळण्याचेही प्रशिक्षण देते.

BBI कोर्ससाठी किती फी आकारली जाते?

BBI कोर्सला प्रवेश देण्यासाठी महाविद्यालय तुमच्याकडून ५ हजार ते १ लाख पर्यंत वार्षिक फी आकारू शकते.

तुम्हाला किती फी भरावी लागेल ते तुमच्या कॉलेजवर अवलंबून आहे.

BBI कोर्स पूर्ण केल्यावर मी काय करू शकतो?

BBI कोर्स करतांना तुम्ही CA , CS , CFA, ACCA सारख्या परीक्षेची तयारी करू शकता. काही विद्यार्थी MPSC, UPSC परीक्षेची देखील तयारी करतात.

BBI कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही एम बी ए कोर्ससाठी पण पात्र आहेत.

जर तुम्हाला BBI नंतर MBA करायचे असेल तर त्याची तयारी तुम्ही BBI कोर्सच्या शेवटच्या वर्षी करू शकता. काही विद्यार्थी पहिल्या वर्षापासून प्रवेश परीक्षेची तयारी करतात.

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.