बीसीएस म्हणजे काय ? BCS Information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 01/12/2022

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये.

आज आपण जाणून घेणार आहोत बीसीएस् विषयी.

तुमचा मनात खूप प्रश्न असतील जसे –

 • बीसीएस काय असत?
 • कोठे प्रवेश घ्यायचा?
 • कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?
 • लोकप्रीय कॉलेज कोणते आहेत?
 • कोणते विषय अभ्यासायला मिळणार?
 • वेतन किती मिळणार?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

बीसीएस म्हणजे काय ? BCS Information in Marathi

बीसीएस म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (Bachelors of Computer Science) हा एक पदवीधर कोर्स आहे.

या मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स विषयी शिकवले जात.

कॉम्प्युटर सायन्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर चे प्रिनसिपल व वापर शिकवले जातात.

काही कॉलेजेस मध्ये हा कोर्स वेगळ्या नावाने शिकवला जातो जसे  –

 • B.Sc. (Computer Science)
 • B.S. (Computer Science).

प्रत्येक कोर्स च्या नावामध्ये थोडा थोडा फरक आहे तसेच त्यांच्या अभ्यास क्रमामध्ये देखील काही बदल आहेत.

जे मुख्य विषय असतात ते सारखेच असतात. 

सामान्य पने बी सी एस मध्ये तुम्हाला सहा सेमीस्टर असतात जे तीन वर्षात पूर्ण होतात.

पण काही कॉलेज मध्ये हा कोर्स चार वर्षाचा देखील आहे.

या मध्ये तुम्हाला आठ सेमीस्टर असतात जे चार शेक्षणिक वर्षात पूर्ण होतात. 

तुम्हीं हा कोर्स मुक्त विद्यापीठ मधून देखील पूर्ण करू शकता.   

बी सी एस साठी प्रवेश पात्रता

तुम्हीं जर बारावी ही विज्ञान शाखेतून Physics, Chemistry, Maths आणि English विषया सह केली असेल तर तुम्हीं बी सी एस ला प्रवेश घेता येतो. (काही महाविद्यालये कोणत्याही प्रवाहातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.)

जर तुम्हीं दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला असेल तरी सुधा तुम्हाला बी सी एस ला प्रवेश घेता येतो. 

काही कॉलेजेस मध्ये तुम्ही विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेने मधून जरी बारावी पूर्ण केली असेल तर प्रवेश दिला जातो.

काही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते व प्रवेश परीक्षेतील गुणांचा आधारे प्रवेश दिला जातो.  

नोकरीच्या संधी

बी सी एस नंतर मिळणारी पदे

 • IT  Project  Manager 
 • Programmer Analyst Software  
 • Engineer Developer/Programmer 
 • Software  Developer 
 • Teacher/Lecturer Theorist 

बी सी एस नंतर उच्च शिक्षणाच्या संधी

बी सी एस उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही एम सी एस (कॉम्प्युटर सायन्स) करू शकता त्याच बरोबर तुम्हीं एम सी ए, एम सी एम, एम बी ए करू शकता .

तुम्हाला बी सी एस नंतर कॉम्प्यूटर डेव्हलमेंट क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळते.

बी सी एस नंतर करता येणारे काही कोर्स:

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.