Pharm D कोर्स माहिती | Pharm D Course Information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 12/05/2023

शिक्षण हे एक सतत बदलणारे क्षेत्र आहे आणि या बदलांमुळेच आपण व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रात बदल घडून येतांना आपण बघतो, अश्या बदलांच्या शृखलांचा परिमाण म्हणजेच भारतातील शिक्षण क्षेत्रात नव्याने येणाऱ्या अनेक अभ्यासक्रम होय. फार्म डी अभ्यासक्रम पण ह्याचेच एक उदाहरण आहे. तर आज जाणून घेउया फार्म डी बाबत

फार्म डी चा अर्थ काय? (Pharm D Meaning)

फार्म डी म्हणजेच “डॉक्टर ऑफ फार्मसी” हा एक व्यावसायिक फार्मसी संबंधित डॉक्टरेट प्रोग्राम आहे. भारतात, १० + २; बारावी किंवा डी. फार्म नंतरचा हा सहा वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आहे ज्यात पाच वर्षांचा शैक्षणिक अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप चा समावेश असतो.

मुख्य समजून घेण्याचा मुद्दा असा कि हा अभ्यासक्रम  एम. फार्म म्हणजे मास्टर इन फार्मसी (पद्युत्तर कोर्स) पेक्षा थोडा वेगळा आहे.

डी फार्म आणि फार्म डी फरक

आता जाणून घेऊया डी फार्म आणि फार्म डी मधील ठळक फरक

नावातल्या साम्य मुले अनेक उमेदवार डी फार्म आणि फार्म डी मध्ये गोंधळून जातात, हा तुलनात्मक तक्ता त्या गोंधळातून तुम्हाला सुटण्यात मदतीचा ठरेल.

अभ्यासक्रमाचे नावफार्म डी – डॉक्टर ऑफ फार्मसीडी फार्म – डिप्लोमा इन फार्मसी
अभ्यासक्रमाची कालावधी६ वर्ष (पाच वर्षांचा शैक्षणिक अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप)२ वर्ष
पात्रता१० +२ (किमान 50%)  किंवा डी फार्म१० + २ (किमान ५०%)
भविष्यातील संधीप्रवेश स्तरीय पोझिशन्सउच्च स्तरीय पोझिशन्स
Pharmacy Course Information in Marathi (Pharm D and D Pharm)
 • डॉक्टर ऑफ फार्मसी ही विज्ञान आणि औषध वितरित करण्याची कला यांचे संयोजन आहे.
 • उमेदवारांना क्लिनिकल फार्मसी, मेडिकल फार्मसीमध्ये व्यावहारिक मान्यता दिली जाते.
 • अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना निदान, औषधांचा उपचारात्मक उपयोग, उपचार आणि रोगांची निवड इत्यादी कौशल्ये प्राप्त होतात.
 • रुग्णांची सेवा, रोगाचे निदान करणे इत्यादी कौशल्य देखील अवगत होतात.

फार्म डी अभ्यासक्रमाचा एक वैशिष्ट्य आवृत्ती देखील अस्तित्वात आहे, पदव्युत्तर आवृत्ती चा फार्म डी अभ्यासक्रम 

3 वर्षाच्या फार्म डी अभ्यासक्रमासाठी (पदव्युत्तर शिक्षण) –

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत मान्यता प्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ फार्मसी अभ्यासक्रम पास केलेले उमेदवार फार्म डी अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थी आहे.

तसेच पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण अर्थात १० + २ मध्ये  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र विषयांसह समतुल्य केले असावे.

Pharm D चे शिक्षण का घ्यावे?

फार्म डी अभ्यासक्रमाचे स्वतःचे तर फायदे आहेतच परंतु ते स्पर्धात्मक जगात देखील महत्वाचे आहे. फॅर्म डी पदवीधरांची मागणी  आजच्या स्पर्धात्मक जगात फार जास्त आहे. आणि ह्या शिक्षणाचे देखील अनेक नफे आहेत, जसे कि

समाजामध्ये सहभाग: फार्मसिस्ट हा समुदायाचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण तो रुग्णांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणात योगदान करतो आणि म्हणूनच फार्मसी संबंधित क्षेत्रात सक्रिय व्यावसायिकांना समाजामध्ये मानाचे स्थान देण्यात येते.

करिअरचे अनेक पर्यायः या क्षेत्रात करिअरचे विविध पर्याय आहेत. फार्मासिस्ट संस्था, नर्सिंग होम, रुग्णालये, महाविद्यालये आणि वैद्यकीय उद्योगात काम करू शकणे असे अनेक पर्यायातून एका उज्वल भविष्याची निवड करणे सोपे होते.

वाढ: फार्मसी उद्योगाचा वाढीचा दर नेहमीच फार वेगवान राहिला आहे आणि सध्या देखील तीच परिस्थिती कायम आहे .

स्वायत्तता: कामाची स्वायत्तता आहे कारण आपण आपले कार्यस्थान आणि कामाचे तास निवडू शकता. आपण एखादे काम करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

अभ्यासक्रमाची पात्रता (Eligibility)

फार्म डी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे पात्रतेचे काही निकषांवर ठरवण्यात आले आहे,

 • मान्यताप्राप्त मंडळाकडून १० + २ म्हणजे बारावी पात्रता, किमान 50% गुणांसह
 • अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी आणि  इतर आरक्षित प्रवर्गासाठी  किमान गुणांमध्ये 5% पर्यंत गुणांची सूट देण्यात आली आहे.
 • १२वी ची विज्ञान शाखा, पीसीबी विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) किंवा पीसीएम विषय (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित)
 • प्रवेश घेण्यासाठी सामान्य प्रवेश परीक्षा म्हणून काही महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये पात्रतेचे निकष वेगळे वेगळे असतात.
 • विद्यार्थ्यांनी पीसीआय (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) द्वारा मान्यताप्राप्त कॉलेजमधून फार्म.डी म्हणजे डॉक्टर  इन फार्मसी अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा.

प्रवेश प्रक्रिये बद्दल माहिती

अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना संबंधित महाविद्यालय व विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेत पात्रता असणे आवश्यक आहे.

नोंदणी फॉर्म संबंधित माहिती महाविद्यालय किंवा विद्यापीठांच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच वेबसाईट वर जारी केल्या जाते. शेवटच्या तारखेपूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी पोर्टल वॉर ऑनलाईन अर्ज जमा करायचा असतो. काही महाविद्यालये अंतिम निवडीसाठी समुपदेशन किंवा जीडी आणि पीआय देखील घेतात.

फार्म डी  अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विविध महाविद्यालये व विद्यापीठांनी घेतलेल्या एनएमआयएसईई (NMISEE), जीपीएटी (GPAT) , एमईटी (MET), बीव्हीसीईटी (BVCET), एसआरएमजेई (SRMJEE) सारख्या प्रवेश परीक्षणाद्वारे  नियमित केल्या जाते, तसेच ह्या परीक्षा  उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.

फार्म डी अभ्यासक्रम साठी सरासरी फी 6,00,000 लाख रुपये ते  20,00,000 रु. पर्यंत असते तरीही ह्या आकड्यावर  भौगोलिक स्थान आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठांद्वारे उपलब्ध अभ्यासक्रमांनुसार बदलते.

कार्यक्रमात प्रवेश निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी राष्ट्रीय पातळीवर किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते हे आपण समजून घेतलेच आहे तर आता जाणून घेऊया ह्या परीक्षांबाबत आणखी माहिती.

 • एनएमआयएसईई (NMISEE): ही एनएमआयएस (NMIS) विद्यापीठाने घेतलेली २-तासांची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.
 • जीपीएटी (GPAT): एनटीए 3 तासांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय पातळीवर, ऑनलाइन परीक्षा घेते.
 • बीव्हीसीईटी (BVCET): भारती विद्यापीठ विद्यापीठातर्फे विद्यापीठ पातळीवर सामान्य प्रवेश चाचण्या घेतल्या जातात.
 • एसआरएमजेई (SRMJEE)  ही एसआरएम विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था द्वारे आयोजित विद्यापीठ पातळीची प्रवेश परीक्षा आहे.

अभ्यासक्रमाच्या मजकूर

शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये बी. फार्म म्हणजे फार्मसी मध्ये पदवी शिक्षणासारख्याच विषयांचा समावेश आहे, त्याव्यतिरिक्त फार्मसी क्षेत्रातील घटकांवर हॉस्पिटल फार्मसी संबंधित प्रशिक्षण, कम्युनिटी फार्मसी चे मूलभूत घटक, संशोधनाचे घटक आणि तसेच विष विज्ञान संबंधित प्रशिक्षणावर जोर देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षाला उमेदवाराला सहा महिन्यांकरिता प्रकल्पाचे काम देखील करावे लागते.

सहाव्या वर्षी, इंटर्नशिप सोबत सहा महिन्यांसाठी प्रकल्पाचे काम देखील करावे लागते. संशोधनात्मक स्वरूप असणाऱ्या प्रकल्पाचा विषय, कार्यपद्धती, लागणारे संसाधन, मार्गदर्शन इत्यादी साठी, उमेदवारांना अभ्यासक्रम शिक्षकांपैकी एक शिक्षक नेमून देण्यात येतो, ह्या पद्धतीने उमेदवारांना आपले संशोधन प्रकल्पाला अमलात आणण्यासाठी मदत होते. 

भविष्यातील संधी 

पूर्ण झाल्यानंतर आणि अभ्यासक्रमा च्या दरम्यान फार्म डी उमेदवार दवाखान्यात क्लिनिकल फार्मसी मध्ये सेवा देऊ शकतात, तसेच क्लिनिकल रिसर्च संस्थांनमध्ये (सीआरओ),फार्माकोविजिलेन्स,फार्माको-अर्थशास्त्र , समुदाय (कम्युनिटी) सेवा, संशोधन आणि शिक्षणशास्त्र अशा अनेक क्षेत्रात काम करू शकणार आहे. 

ह्या अभ्यासक्रमाच्या नंतर च्या जॉब प्रोफाइल मध्ये

 • फार्मसिस्ट
 • औषध विशेषज्ञ
 • रिटेल फार्मासिस्ट
 • हॉस्पिटल फार्मसी डायरेक्टर
 • हॉस्पिटल स्टाफ फार्मासिस्ट
 • क्लिनिकल फार्मासिस्ट इ. चा देखील समावेश आहे.

फार्म दि पदवी धारकांना औषधनिर्माण संस्थांच्या अनुसंधान व विकास, उत्पादन विकास, तांत्रिक आणि विपणन विभागात संधी मिळतात. काही शीर्ष फार्मसी कंपन्या आहेत:

ल्युपिन, फायझर, सिप्ला, AbbVie, पिरामल, जॉन्सन आणि जॉन्सन, सन फार्मास्युटिकल्स, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन GSK, ऑरोबिंडो फार्मा, अ‍ॅमजेन, डॉ रेड्डीज लॅब, मायलन फार्मास्युटिकल्स इंक, झायडस कॅडिला, वॉलग्रीन फार्मसी, ग्लेनमार्क फार्मा, सनोफी, अ‍ॅबॉट लॅबोरेटरीज आणि बऱ्याच आणखी संस्था देखील.

तर हि होती फार्म डी बाबत ची माहिती अभ्यासक्रमाची, प्रवेश परीक्षा, प्रवेश परीक्षेची तयारी, पात्रता आणि भविष्यातील संधी सुद्धा. आम्ही अशा करतो तुम्ही तुमचे शैक्षणिक निर्णय व्यवस्थित विचार करून घ्याल आणि यशस्वी परिणामांचा आनंद घ्याल.

Also read: (D Pharmacy Course Information in Marathi)

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Similar

Post Thumbnail

बी फार्मसी म्हणजे काय? | B Pharmacy Information in Marathi


Post Thumbnail

डी फार्मसी म्हणजे काय? | D Pharmacy Information in Marathi


Popular Posts

Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?