फॅशन डिझायिंग बद्दल माहिती | Fashion Designing Course Information in Marathi

फॅशन डिझायनर हा शब्द कानावर ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नवीन नवीन प्रकारचे कपडे, त्याचे खूप प्रकार दिसतात. फॅशन डिझायनिंग म्हणजे नुसतं कपडे शिवने नव्हे तर विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, डिझाईन काढणे प्रत्यक्ष कपड्यांवरील जरी वर किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्यांचा समावेश फॅशन डिझायनिंग मध्ये होतो. काही संस्था याला फॅशन डिझायनिंग कोर्स असेही म्हणतात.

फॅशन डिझायनिंग म्हणजे काय –

फॅशन डिझायनिंग हे फॅब्रिक शैली, नमुने रंग आणि विशिष्ट युगाची फॅशन परिभाषित करणारे एक क्षेत्र आहे. हे केवळ कपड्यात पुरतेच मर्यादित नाही तर त्यात वेगळे सामान, हात पिशवी ,चप्पल्स, वास्तू, ज्वेलरी, या सर्व गोष्टींचा समावेश फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये केला जातो. आपल्याकडे फॅशन डिझाईनिंग खरोखर करण्याचे कौशल्य असल्यास या क्षेत्रात आपल्यासाठी असंख्य नोकऱ्या आहेत. फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण एक उत्तम करिअर या क्षेत्रामध्ये करू शकता. प्रत्येक व्यक्ती ला आपला प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडावा अस वाटत असते. त्यासाठी कुठल्या कपड्याची निवड करावी यासाठी फॅशन डिझाइनरची आवश्यकता असते.

फॅशन डिझायनर कोर्स महत्त्वाचा का आहे –

या बदलत्या काळात फॅशन क्षेत्राला प्राधान्य खूप दिले जात आहे. कोणत्या पण व्यक्ती फॅशन डिझायनिंगचे थोडेफार कौशल्य असल्यास त्यामध्ये खूप करिअर करू शकतो.

आपल्या मधला प्रत्येक व्यक्ती हा फॅशन आणि डिझायनिंगच्या मागे धावत आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत.

फॅशन डिझायनिंग हे फक्त कपड्यापुरतेच मर्यादित राहिलेली नाही तर याचा विस्तार प्रत्येक ठिकाणी होत आहे.

फॅशन डिझाइनिंगची आवश्यकता का आहे –

डिझाईन एक सुंदरता देणारी कला आहे. त्यांची मांडणी ही वेळेनुसार बदलत राहते, त्याची रचनाही वेळेनुसार बदलत राहते. इंडस्ट्रीमध्ये फॅशन डिझाइनिंगला खूप ट्रेंड आहे पण तसं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला आपण फॅशनेबल पाहिजे अस वाटत. प्रत्येक व्यक्तीला कपड्यात ज्वेलरी मध्ये गारमेंट्स मध्ये फॅशन हवी असते. डिझायनरच काम फक्त डिझायनिंग करणे नसून मार्केटमध्ये लोकांना काय आवडतं हे देखील पाहणे जरूरी आहे. मार्केटमध्ये चालू असल्या ट्रेंड नुसार फॅशन करावी लागते.

फॅशन डिझायनिंग कोर्ससाठी आवश्यक पात्रता –

फॅशन डिझाईनिंग हा कोर्स कोणीही करू शकतो. फक्त त्या व्यक्तीमध्ये स्किल असणे आवश्यक आहे. बारावी पास किंवा १० पास विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. विज्ञान, कला, वाणिज्य यासारख्या कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. काही संस्थांमध्ये प्रवेशापूर्वी चाचणी परीक्षा घेतली जाते तर काही ठिकाणी दहावी व बारावीच्या गुणांवर देखील प्रवेश दिला जातो. अनेक संस्थेत प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूहचर्चा मुलाखत यांचा प्रवेशाचे निकष ठेवण्यात येतात. विद्यार्थी या क्षेत्राम ध्येय, प्रसिध्दी मिळू शकतात आणि त्याचं उत्तम करियर पण होत.

फॅशन डिझायनिंग कोर्स मध्ये काय असते –

फॅशन डिझायनिंग कोर्स हा एक प्रसिद्ध कोर्स आहे. या कोर्समध्ये कपड्यांना कसं सुंदर बनवल जात, त्यावर कुठलं डिझाईन छान दिसत, हे शिकवले जाते. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण सुंदर दिसावा, आपला प्रभाव दुसऱ्या व्यक्तीवर चांगल्या प्रकारे पडला पाहिजे. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये हे कौशल्य नसतं की तो आपल्यासाठी, आपल्याला हवे असणारे कपडे स्वतः डिझाइन करू शकेल. त्यामुळे फॅशन डिझायनिंग कोर्स करणे महत्त्वाचा आहे. फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त चांगले कपडे शिवने नाही. त्यापलीकडेही कितीक बाबी यामध्ये येतात. कपड्यांवरील एम्ब्रोईडरी चे प्रकार, टाक्यांचे प्रकार, टीपा मारणे ,डिझाईन काढणे, प्रत्यक्ष कपडे शिवणे, रंग संगती , कपड्यांवरील जरी वर्क या सर्वांचा समावेश फॅशन डिझायनिंग मध्ये होतो. आज पारंपारिक वेशभूषा दिसत नाहीत. परंतु कालांतराने नष्ट झालेली वेशभूषा पुन्हा नव्या रुपात येताना आपण अनेक वेळा पाहिल आहे. जुन्या स्टाईलचे कपडे नवे रूप धारण करून ते पुन्हा बाजारात आणणे आणि त्याला चांगल्या प्रकारे किंमत मिळवून देणे हे कौशल्य फॅशन डिझायनर चे असते असे म्हटले तरी चालेल.

फॅशन डिझायनिंग कोर्स हा किती वर्षाचा असतो –

फॅशन डिझायनिंग कोर्स हा एका वर्षापासून चार वर्षापर्यंत असू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात – बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग , BSc फॅशन डिझायनिंग, Diploma फॅशन डिझायनिंग, बॅचलर ऑफ फॅशन कम्युनिकेशन, अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध असतात.

फॅशन डिझायनर ची सॅलरी किती पर्यंत असू शकते –

तसं बघितलं तर फॅशन डिझायनरची सॅलरी ही त्याच्या कामावर आधारित असते. त्यांनी केलेल्या कामावर, त्यांनी बनवलेल्या डिझाइन्स वर त्यांची सॅलरी ठरवली जाते. त्यांनी बनवलेले डिझाईन्स मार्केटमध्ये प्रसिद्ध होत असतील तर त्यांच्या फॅशन डिझायनिंगला खूप वाव मिळतो. साधारणतः त्यांची सॅलरी 15 ते ५० हजारापर्यंत असू शकते. सॅलरी तुम्ही कुठे आणि काय काम करतात त्यावरही अवलंबून आहे.

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्याकरता आवश्यक कौशल्य –

आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचा आहे त्या क्षेत्रामध्ये आवड असणे खूप महत्त्वाच आहे . तसेच त्या व्यक्ती मध्ये creative personality skill असणे आवश्यक आहे. तसच चित्रकला स्केचिंग, निरीक्षण, कल्पकता, सृजनशीलता, नाविन्य, निर्मिती तंत्रज्ञान, संवादकौशल्य इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे.

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्याकरता किती फी लागते –

फॅशन डिझायनिंग कोर्स करण्याकरता ऍडमिशन डिपारमेंट हे वेगळ्या प्रकारचे राहते. हे सर्व काही तुम्ही ज्या इन्स्टिट्यूट ला ऍडमिशन घेता त्यावर अवलंबून राहते. जर तुम्ही हा कोर्स महाग ठिकाणी करत असणार तर त्याची फी ही सर्वात जास्त राहते.

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आपण करिअर करू शकतो का –

आजच्या तरुणांचा भर हा सर्वात जास्त फॅशन आणि स्टाईल याच्यावर असतो. आपण कोणते कपडे घालतो याला ते सर्वात जास्त प्राधान्य देतात. त्यांच्यासाठी आपण कोणते फॅशनेबल स्टाईल चे कपडे घालतो याला खूप महत्त्व असते. मागील काही वर्षात फॅशन डिझाइनिंग ला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. फॅशन डिझायनिंग ही कला आहे. या क्षेत्रामध्ये कल्पकतेला आणि सर्जनशील सर्जनशीलतेला मोठा वाव आहे. फॅबऱ्यापैकी शन जगात चांगला पैसा मिळत असल्याने या क्षेत्राची दिवसागणिक उलाढाल वाढत आहे. फॅशनमध्ये फक्त कपडे शिवणे हा त्याचा भाग नसून त्याच्या पलीकडे या क्षेत्राचा आवक आहे. आज सोशल मीडियाच्या काळात फॅशन आणि स्टाईल बाबत सगळे जागरूक आहेत. आकर्षक पोशाख परिधान करून चालणाऱ्या मॉडेल पाहून फॅशन याक्षेत्रातील जगाचे आकर्षण अनेकांना वाटते. फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रोडक्शन मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटी हाऊस मॅन्युफॅक्चरिंग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. अनुभवानंतर स्वतःचा व्यवसाय सुद्धा करतात.

फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला ह्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत –

  • फॅशन मीडिया,
  • क्वालिटी कंट्रोल,
  • फॅशन डिझाईन आणि ब्रँड प्रमोशन,
  • कॉस्च्युम डिझायनर,
  • फॅशन कन्सल्टंट,
  • टेक्निकल डिझायनर,
  • ग्राफिक डिझाईनर,
  • प्रोडक्शन पॅटर्न मेकर,
  • फॅशन कोऑर्डिनेटर

फॅशन डिझायनिंगचा कोर्स आणि अभ्यासक्रम –

फॅशन डिझाईन मध्ये गारमेंट लेदर ॲक्सेसरीज, आणि ज्वेलरी डिझाईन, तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फॅशन डिझाइनिंगचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आपण आपल्या आवडीनुसार निवड करू शकता. परंतु आपण कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घेत आहात त्याची योग्य पडताळणी करूनच कोर्स निवडावा. अभ्यासक्रमात तंत्रज्ञान मार्केटिंग, व्यवस्थापन यांचा पण समावेश असल्यामुळे तंत्र, कला आणि व्यवसाय यांची सुद्धा प्रशिक्षण मिळते. परंतु सिद्धांताबरोबरच व्यावहारिक प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे आणि हे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. या संबंधीच्या प्रशिक्षणासाठी नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाचणी परीक्षेची निकष पार करावे लागतात. यालाच फॅशन डिझायनर कोर्स असे म्हणतात.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments