आर्किटेक्चर म्हणजे काय? आर्किटेक्चर कसे करावे? आर्किटेक्चर कोर्से बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये!

आर्किटेक्चर व्हायचंय? Interior  designer  व्हायचंय? त्यासाठी करावी लागते आर्किटेक्चरची डिग्री किंवा डिप्लोमा. मी तुम्हाला आज आर्किटेक्चरच्या कोर्से बद्दल सगळी माहिती देणार आहे.

१२वी नंतर आर्किटेक्चर कसे करावे?

१२वी नंतरआपण आर्किटेक्चरच्या डिग्री साठी प्रवेश घेऊ शकता. तुमचा कोर्से पूर्ण झाल्यावर तुम्हाला B.Arch ची डिग्री दिली जाते.

आर्किटेक्चर डिग्री कोर्से कसा करावा?

आर्किटेक्चर कोर्से करण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या आर्किटेक्चर कॉलेज मध्ये ऍडमिशन घेणे गरजेचे आहे.

तुम्ही जेव्हा आर्किटेक्चरचा कोर्से पूर्ण करतात तेव्हा तुम्हाला B.Arch ची डिग्री प्रदान केली जाते.

किती वर्षाचा असतो B.Arch कोर्से?

B.Arch कोर्से ५ वर्षाचा असतो. होय, ५ वर्षाचा मोठा कोर्से आहे आर्किटेक्चर डिग्रीचा. आर्किटेक्चर कॉलेजेस मध्ये सेमिस्टर पॅटर्न follow केला जातो. ५ वर्षाचा कोर्से म्हणजे पूर्ण कोर्से मध्ये तुम्हाला १० सेमिस्टर असतात. एका वर्षात २ सेमिस्टर असतात.

आर्किटेक्चर डिग्री कोर्सला ऍडमिशन कसे घ्यावे?

आर्किटेक्चर कोर्सेला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही एक आर्किटेक्चर entrance exam द्यावी लागते. ऍडमिशन प्रोसेस तुम्ही कोणत्या कॉलेज ला ऍडमिशन घेत आहात त्यावर अवलंबून असते. तुम्ही आधी ठरवा कि तुम्हाला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आहे आणि चौकशी करा कि तुम्ही निवडलेले कॉलेज कोणत्या entrance exam च्या बेसिसवर ऍडमिशन घेतात.

काही आर्किटेक्चर entrance exams आहेत:

  • JEE Mains
  • NATA

आर्किटेक्चर कोर्सेसाठी मी पात्र आहे का?

आर्किटेक्चर पदवीसाठी पात्र ठरण्याची requirements पुढीलप्रमाण आहेत:

जर आपण १०वी नंतर १२वी केलीली असेल तर:

  • तुम्ही तुमची १२वी ससान्स मधून केलेली असावी. त्याबरोबर PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) हे ३ विषय तुमच्या १२वीच्या विषयांमध्ये असणे आवश्यक आहे.
  • आपल्याला १२वीमध्ये कमीत कमी 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. आरक्षण असण्याऱ्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 45% मार्क्स असणे आवश्यक आहे.
  • आपण architecture  एंट्रन्स एक्साम देणे आवश्यक आहे.

जर आपण १०वी नंतर डिप्लोमा केलेला असेल तर:

  • आपण recognized  कॉलेज मधून डिप्लोमा करणे आवश्यक आहे.
  • आपल्या अभ्रासक्रमामध्ये गणित विषय असणे आवश्यक आहे.
  • आपण architecture  एंट्रन्स एक्साम देणे आवश्यक आहे.

आर्किटेक्चर डिग्री entrance exams ला काय syllabus असतो?

आर्किटेक्चर degree entrance exams ला शक्यतो PCM(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) हे ३ विषय असतात. Logical reasoning आणि अँटिट्यूड टेस्ट्स पण असू शकतात. ते आपण कोणती exam देत आहेत त्यावर अवलंबून असते.

तुम्ही ११वी आणि १२वी ला जो अभ्यास केलेला असतो त्यावरच प्रश्न पडतात. तरी जर तुम्हाला तयारी करण्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही तुमच्या परिसरातले ट्युशन कडून मदत घेऊ शकता. Entrance Exam च्या तयारीसाठी आता online अभ्यास करण्याची हि सोय आहे.

आर्किटेक्चर डिग्री कॉलेजची प्रवेश फी किती असते?

आर्किटेक्चर कॉलेज ची फी तुम्ही कोणत्या आर्किटेक्चर कॉलेजला प्रवेश घेत आहात ठावर अवलंबून असते. ४ लाख ते ७ लाखापर्यंत फी असू शकते. हि फक्त कॉलेज फीस आहे. जर आपण होस्टेलला राहून कॉलेज करणार असाल तर आपला राहायचा आणि जेवणाचा खर्च वेगळा असतो.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments