BE Course information in MarathiBE म्हणजे नेमकं काय? 12 वी सायन्स नंतर इंजिनियरींग करायचीय? इंजिनियर कसे व्हायचे? इंजिनियरींग नंतर मला जॉब भेटेल का? इंजिनियरींग पुर्ण करायला मला किती खर्च येइल. हे प्रश्न पडलेत? खाली या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहेत.

इंजिनियरींग करायची हे खुप विदयार्थांचं स्वप्न असतं. बरेच विदयार्थी दहावी झाली की लगेच इंजिनियरींग प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागतात.

काही विदयार्थांना आय.आय.टी मध्ये ऍडमिशन भेटावे असे वाटते तर काही लोक सी.वो.इ.पी चे स्वप्न पाहतात.

BE/बी.टेक कोर्स काय आहे? (BE course information in Marathi)

BE/बी.टेक कोर्स हया इंजिनिरींग डिग्री कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला प्रदान केलेली पदवी आहे.

काही लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की गव्हर्नमेंट कॉलेज मधुन इंजिनियरींग केली की इंजिनियरींगची बी.टेक डीग्री भेटते आणि खाजगी कॉलेज मधुन केली की इंजिनियरींगची BE डीग्री भेटते. पण असे काही नाही. हा फक्त एक गैरसमज आहे.

काही कॉलेज BE डीग्री देतात आणि काही कॉलेज बी.टेक.

तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज कोणती डीग्री देते याची चौकशी तुम्ही त्या कॉलेजला जावुन करू शकता किंवा कॉलेजच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.

तुम्हाला BE आणि बी.टेक मध्ये काय फरक आहे हा प्रश्न पडला असेल.

BE मध्ये थेअरी वर जास्त लक्ष देतात आणि बी.टेक मध्ये प्रॅक्टीकलस् वर जास्त लक्ष देतात. एवढाच फरक आहे दोन्ही मध्ये. जॉब opportunity दोन्हीसाठी सारखीच आहे.

हे देखील वाचा:  बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर ( Bsc. Agriculture ) कृषि क्षेत्रातील एक उत्तम करिअर || Bsc. Agriculture full Course information in Marathi

इंजिनियरींग डीग्रीसाठी मी पात्र आहे का?

इंजिनियरींग डीग्रीसाठी पात्र असण्यासाठी तुमचे एकतर 12 वी सायन्स पुर्ण झालेले पाहीजे किंवा तुमचा डीप्लोमा पुर्ण झालेला पाहीजे.

जर तुमचा डीप्लोमा पुर्ण झालेला असेल तर तुम्हाला इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश भेटतो.

जर तुमची 12 वी सायन्स ह्या साइड मधुन पुर्ण झालेली असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षाला प्रवेश भेटतो.

12 वी नंतर प्रवेश घेण्यासाठी अटी खालिलप्रमाणे आहेत.

 • तुमची 12 वी सायन्स हया स्ट्रीम मधुन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही १२वी कॉमर्स किंवा १२वी आर्ट्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही इंजिनीरिंगसाठी अपात्र आहेत.
 • 12 वी सायन्स मध्ये तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथस् हे तीन विषय असणे आवश्यक आहे.
 • 12 वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथस् चे मिळुन तुमचे 50 टक्के पेक्षा जास्त गुण पाहीजे (रिजर्व्ह कॅटेगीरीसाठी 45 टक्के)
 • तुम्ही कोणतीही एक इजिनिरींग प्रवेश परिक्षा दिलेली पाहीजे. (महाराष्ट्रामध्ये इंजिनीरिंगच्या ऍडमिशनसाठी MHT-CET हि परीक्षा घेतली जाते.)

इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी मी कोणती प्रवेश परीक्षा दयावी?

इंजिनियरींगला ऍडमिशन घेण्यासाठी भरपूर प्रवेश परीक्षा आहेत. पण जर तुम्हाला महाराष्ट्रा मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही MHT-CET ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे.

जर तुम्ही JEE Mains ही प्रवेश परीक्षा दिलेली असेल तरीही तुम्ही हया परीक्षेव्दारे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनीरिंग कॉलेजला प्रवेश घेवु शकता.

पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की JEE च्या स्कोर वर खुप लिमिटेड सिटस् वर ऍडमिशन होते.

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनियरींग कॅालेजला प्रवेश घेण्यासाठी हया दोन परीक्षा गरजेच्या आहे:

 • MHT-CET
 • JEE Mains

बिरला सारखे कॉलेज त्यांच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात. बिरला इन्स्टीटयुट मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला BITSAT ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

इंजिनियरींगला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

तुमची सर्वात आधी प्रवेश परीक्षा होते.

हे देखील वाचा:  BHMS कोर्स माहिती | BHMS Course Information in Marathi

प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर त्याबरोबर तुमचा रॅंक पण तुम्हाला क्ळतो.

त्या रॅंकच्या आधारे कॅप राउंड होतात.

कॅप राउंड चा फॉर्म भरतांना तुम्हाला कोणते कॉलेज पाहीजे, कोणती स्ट्रीम पाहीजे याचा तुमच्याकडून एक ऑपशन फॉर्म भरून घेतला जातो.

कॅपचे 3 राउंड होतात.

जेव्हा तुम्ही कॅप मध्ये लागलेले कॉलेजची निवड करता, तेव्हा तुम्हाला कॉलेजला जावुन ऍडमिशन घ्यावे लागते.

इंजिनियरींग डीग्री करण्यासाठी कीती खर्च येतो?

इंजिनियरींग कॉलेजची फी एका वर्षाची सरासरी 1,10,000 इतकी असते.

जर तुम्ही घरून इंजिनियरींग करत असाल तर तुम्हाला एका वर्षाचा एवढा खर्च येइल: 

कॉलेज फि1,10,000 /-
पुस्तके4,000 /-
कॉलेजसाठी लागणाऱ्या इतर वस्तू2,000 /-
कॉलेज युनिफॉर्म2,000 /-
एक्झाम फि1,000 /-
इतर1,000 /-
एकूण1,20,000 /-
BE course expenses information

जर तुम्ही घरापासुन लांब कुठेतरी हॉस्टेल वर राहुन कॉलेज करणार असाल तर तुमचा वार्षिक खर्च वरचे 1,20,000 धरून असा असेल:

1,20,000 /-
हॉस्टेल फि (3,000 x 12) 36,000 /-
मेस फि (4,000 x 12)48,000 /-
इतर खर्च20,000 /-
एकूण2,24,000 /-
BE course expenses information

टीप: वरील खर्च सरासरी मोजलेला आहे. तुम्ही कुठून कॉलेज करत आहात त्याप्रमाणे हा खर्च कमी किंवा जास्त लागू शकतो याची नोंद घ्यावी.

मला इंजिनिरींग डीग्री कोर्स मध्ये काय शिकवले जाईल?

इंजिनिरींग डीग्री कोर्स हा 4 वर्षांचा कोर्स आहे. इंजिनियरींगला सेमिस्टर पॅटर्न follow  करतात. एक सेमिस्टर 6 महिन्यांचा असतो. म्हणजे 4 वर्षांत तुम्हाला 8 सेमिस्टर असतात.

या 4 वर्षांत खुप काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळया ब्रांचेसला वेगवेगळया गोष्टी शिकवल्या जातात.

काही इंजिनियरींगच्या ब्रांचेस आहेत:

 • Computer engineering
 • Civil engineering
 • IT/software engineering
 • Mechanical engineering
 • Electrical engineering

4 वर्षांमध्ये तुमचे:

 • थेअरी क्लासेस होतात
 • प्रॅक्टीकल क्लासेस होतात.
 • फिल्ड व्हीजिट होतात.
 • प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग होते.
 • प्रोजेक्ट होतात.
 • इंटर्नशिप होतात.

इंजिनियरींग केल्यावर मला जॉब भेटेल का?

हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल कारण सगळे आजकाल हेच म्हणतात की खुप लोक इंजिनियर झालेत, इंजिनियरला जॉब नाहीत, इत्यादी…

हे देखील वाचा:  बँकिंग कोर्सबद्दल माहिती

पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जर क्वालिटी असली तर जॉब भेटतोच.

आणि इंजिनियरची खुप जास्त मागणी आहे मोठ्या कंपन्यांमध्ये.

जर जॉब कमी असते तर का बऱ्याच कॉलेज मधल्या 70 टक्के पेक्षा जास्त मुलांना जॉब भेटतात? हो, काही कॉलेज मध्ये नाही भेटत जॉब कारण त्या कॉलेजचे प्लेसमेंट सेल विदयार्थांना जॉब देण्यास सक्षम नसते. 

पण प्रवेश घ्यायच्या आधी जर तुम्ही कॉलेजचे प्लेसमेंट रेकॉर्डस् पाहीले आणि मग प्रवेश घेतला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही.

प्रवेश घेतांना मुळात अशा कॉलेज मध्ये प्रवेश घ्या ज्या कॉलेजचे प्लेसमेंट सेल विदयार्थांना जॉब मिळवुन देऊ शकते.

मी इंजिनियरींग करतांना पार्ट टाइम जॉब करू शकतो का?

खरं सांगायचं म्हटलं तर हो तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता. पण इंजिनीरिंगचे प्रॅक्टीकल्स, viva, आणि खुप साऱ्या परीक्षा, या मध्ये जर तुम्ही जॉब करणार असाल तर तुमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची खुप शक्यता असते.

पण यावर एक उपाय आहे, तुम्ही फ्रीलांन्सीग किंवा ब्लॉगिंग करू शकता. हया दोन्ही गोष्टी तुम्ही तुम्हाला मोकळा वेळ भेटेल तेव्हा करू शकता.

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

MarathiHQ.com

MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *