ITI Information in Marathi – प्रकार, पात्रता, प्रवेश प्रक्रिया, करिअर पर्याय आणि फायदे

Author: जय विजय काळे | Updated on: सप्टेंबर 23, 2023

आय. टी आय. कोर्स माहिती (ITI course details in Marathi)

ITI course meaning in MarathiITI full form आहे – इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूट (Industrial Training Institute)

ITI  कोर्स दहावी नंतर किंवा बारावी नंतर करता येतो. ITI कोर्स विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि लवकरात लवकर काम मिळवणे सोप्पे करतात.

ITI कोर्सचा उद्देश्य कुशल कार्यबल विकसित करणे आहे. (To develop skilled workforce)

ITI कोर्सला आपण short term job oriented कोर्स म्हणू शकतो कारण तो कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशिक्षण देते ज्यामुळे लवकरात लवकर काम भेटते.

ITI Information in Marathi | ITI Trade list Marathi | ITI courses list in Marathi
ITI Information in Marathi

ITI कोर्सचे प्रकार (ITI Information in Marathi)

ITI  कोर्स दोन प्रकारचे असतात –

टेक्निकल ITI कोर्स म्हणजे गणित, विज्ञानासही संबंधित कोर्स. टेक्निकल ITI  कोर्सचे काही उदाहरण आहेत – COPA (Computer Operator and Programming Assistant), Desktop Publishing Operator, पंप ऑपरेटर, इ.

नॉन-टेक्निकल ITI  कोर्सचे काही उदाहरण आहेत – बुक बाईंडर, पेंटर, Sewing Technology, इ.

आपण टेक्निकल कोर्सला इंजिनीरिंग कोर्स आणि नॉन-टेक्निकल कोर्सला नॉन-इंजिनीरिंग कोर्स म्हणू शकतो.

ITI कोर्स कोण करू शकते?

दहावी किंवा बारावी झालेला कोणताही विद्यार्थी ITI कोर्स करू शकतो. ITI कोर्सला तुमचे वय कमीत कमी age १४ वर्ष इतके असणे आवश्यक आहे.

तुमची दहावी झालेली असो किंवा बारावी तुमचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतो.

दहावी नंतर चे कोर्स ITI (ITI course after 10th in Marathi) –

जर तुमची दहावी झालेली असेल आणि तुमचे वय १४ वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ITI कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

बारावी नंतर ITI कोर्स –

बरेच विद्यार्थी बारावी नंतर ITI कोर्सला प्रवेश घेतात.

ITI कोर्ससाठी सरकारी आणि खाजगी कॉलेज आहेत जिथे जाऊन आपण अधीक माहिती घेऊ शकता.

ITI कोर्स प्रवेश निकष (eligibility criteria) –

ITI कोर्सची  प्रवेश प्रक्रिया कशी आहे?

ITI कोर्सची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन  पद्धतीने होते.  दहावी -बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरु होते.

प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे असते –

ITI कोर्स पूर्ण झाल्यावर काय?

ITI कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही जॉब करू शकता, स्वतःचा धंदा टाकू शकता किंवा पुढे शिक्षण चालू ठेऊ शकता.

थोडक्यात –

ITI कोर्सचे फायदे

ITI कोर्स केला तर तुम्हाला तुमची शाळा/कॉलेज संपल्यावर लवकरात लवकर काम भेटते आणि पगार चालू होतो. याचे मुक्य कारण म्हणजे ITI कोर्सचा कमी कालावधी आणि कोर्सदरम्यान दिले जाणारे व्यावसायिक प्रशिक्षण.

ITI कोर्स केल्यामुळे तुम्ही इतरांच्या तुलनेत लवकर कामाला लागतात. दहावी झाल्यावर एका इंजिनेर डिग्री असलेल्या विद्यार्थ्याला काम भेटण्यासाठी ६ वर्ष लागतात तर ITI कोर्स केलेल्या विद्यार्थ्याला दहावी नंतर काम भेटायला ६ महिने ते ३ वर्ष लागतात.

दोन्हीही उदाहरणात जॉब भेटलाच असे नाही कारण ते बाकी भरपूर गोष्टींवर अवलंबून आहे. पण साधारणतः दहावी नंतर इंजिनेर डिग्री असलेल्या विद्यार्थ्याला ६ वर्ष आणि ITI कोर्स केलेल्या विद्यार्थ्याला ३ वर्ष इतका वेळ जॉब भेटायला लागतो.

मी कोणते ITI कोर्स करू शकतो? (Maharashtra ITI courses list / Trade list in Marathi)

ITI कोर्सची यादी खाली दिलेली आहे –

ITI कोर्सची यादी खाली दिलेली आहे –

काही ITI कोर्सबद्दल थोडक्यात (ITI Course Information in Marathi)

ITI COPA course / COPA trade information in Marathi

COPA – Computer Operator and Programming Assistant

कोर्सचा कालावधी: 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

हा कोर्स केल्यावर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल बेसिक ज्ञान भेटेल आणि तुम्हाला कॉम्पुटर ऑपरेटर आणि डेटा ऑपरेटर सारखे जॉब भेटू शकतात. ह्या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्पुटर हार्डवेर, सॉफ्टवेर, कॉम्पुटर प्रोग्रामिंग सारखे विषय शिकवले जातात.

ITI Fitter course / Fitter trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: २ वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

ह्या कोर्समध्ये तुम्हाला फिटिंग बद्दल शिकवले जाते. हा एक इंजिनीरिंग ट्रेडचा टेक्निकल कोर्स आहे.

Electrician course / Electrician trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: २ वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

ह्या कोर्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल वायरिंग, उपकरणांवर काम कसे करायचे, सेफ्टी, इ. हे शिकवले जाते.

Wireman course / Wireman trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: २ वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

ह्या कोर्समध्ये तुम्हाला विद्युत घटकांबद्दल शिकवले जाते. तुम्हाला विद्युत घटकांचे मेन्टेनन्स, रिपेरिंग कशी करायची हे देखील शिकवले जाते.

इलेक्ट्रिशियन लाइटिंग आणि इतर इलेक्ट्रिकल सिस्टीमचे चांगले कार्य करत असल्याची खात्री करतो. त्याच्या नोकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीम स्थापित करणे, त्यांचे निराकरण करणे, इलेक्ट्रिकल सिस्टमची देखभाल करणे इत्यादींचा समावेश आहे आणि ते मर्यादित नाही.

Draughtsman Mechanical ITI information in Marathi

कोर्सचा कालावधी: २ वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

ड्राफ्ट्समनच्या काही जबाबदाऱ्या म्हणजे साहित्य आणि वजन मर्यादांची गणना करणे, वास्तुविशारद आणि अभियंते यांच्याशी संवाद साधणे आणि रेखाचित्रांमध्ये मिळवलेले ज्ञान समाविष्ट करणे इ.

ITI Diesel Mechanic information in Marathi

कोर्सचा कालावधी: 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

डिझेल मेकॅनिकच्या काही जबाबदाऱ्या म्हणजे इंजिन आणि ट्रान्समिशन दुरुस्त करणे किंवा बदलणे, स्टीयरिंग आणि ब्रेकिंग सिस्टमची दुरुस्ती/बदलणे, वाहनांची स्थिती तपासणे इ.

Mechanic Motor Vehicle ITI information in Marathi

कोर्सचा कालावधी: २ वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

मोटार वाहन मेकॅनिक वाहनाचे खराब झालेले भाग आणि यंत्रणा दुरुस्त करतो/बदलतो, तो वाहनांच्या सुरक्षित आणि योग्य ऑपरेशनची पुष्टी करण्यासाठी वाहनांची चाचणी घेतो, वाहनाच्या समस्यांचे निदान करतो इ.

ITI Turner trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता:

टर्नरच्या काही नोकऱ्या – मशीनचे सुटे भाग तयार करणे किंवा पुनरुत्पादन करणे, मशीनच्या देखभाल आणि दुरुस्तीमध्ये फिटर मेकॅनिकला मदत करणे, सर्व कार्यरत मशीनचे भाग चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करणे इ.

Mechanist course / Mechanist trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

मशीनिस्टच्या काही नोकऱ्या – सीएनसी मशीन टूल्स चालवणे, जसे की लेथ आणि मिलिंग मशीन, मशीनचे अचूक भाग कापून तयार करणे, मॅन्युअल आणि ऑटोमेटेड उपकरणांची दुरुस्ती/उत्पादन, प्रभावी उत्पादन ऑपरेशन्स सुनिश्चित करणे इ.

ITI Welder trade information in Marathi

कोर्सचा कालावधी: 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता: 10th pass

ITI Information in Marathi पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा