BSW कोर्स माहिती | BSW Course Information in Marathi

बॅचलर ऑफ सोशल वर्क (बी एस डब्ल्यू) – अर्थ, अभ्यासक्रम आणि बरेच काही | (BSW Meaning, Information)

समाजासाठी काही करण्याची फार इच्छा आहे, पण व्यवस्थित रित्या समाज कल्याण करण्यासाठी व्यवस्थेची आणि परिस्थितीची देखील समज असणे गरजेचे असते. आणि ह्या ज्ञान प्राप्तीसाठी तयार करण्यात आला आहे, बॅचलर ऑफ सोशल वर्क (बी एस डब्ल्यू) चा अभ्यासक्रम.

बॅचलर ऑफ सोशल वर्क (बी एस डब्ल्यू) हा स्नातक पूर्व पदवी अभ्यासक्रम तीन वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमात इच्छुक उमेदवाराला सामाजिक कल्याणा विषयी व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते.

सामाजिक कल्याणाला वाहिलेल्या या प्रशिक्षणात उमेदवाराला यासंबंधी ज्ञान व कौशल्य विकसित करण्याची उत्तम संधी मिळते. हा अभ्यासक्रम 6 सेमिस्टर मध्ये विभागला असून प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर्स असे याचे स्वरूप असते.

उमेदवार या आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग करून समाजातील विविध प्रकारे त्रस्त झालेल्या व्यक्तींना,जसे की मानसिक रित्या असंतुलित व्यक्ती, एड्स ने आजार ग्रस्त व्यक्ती, घरेलू किंवा इतर अत्याचाराने पिडीत व्यक्ती,दारिद्र्य रेषेखालील समाज, कर्करोगाने ग्रस्त झालेले, अत्याचाराने पिडीत, बेघर व्यक्ती, अशा समाजातील विविध घटकांना योग्य ती मदत करण्याची संधी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो.

आवश्यक विशेष गुण

ह्या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारा जवळ काही विशेष गुण असणे आवश्यक असते, जसे तो ज्या भागात काम करणार असेल त्या भागातील सामाजिक समस्यांची जाणीव, उत्तम सम्पर्क कौशल्य, लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य, सहनशीलता, समन्वय साधण्याची क्षमता, सामोपचार, भावनिक प्रगल्भता,परानुभूती वगैरे.

हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे इथे वर्गातील अभ्यासाबरोबरच फील्ड वर्क म्हणजे समस्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काम करणे हा सुद्धा अभ्यासक्रमातील फार महत्त्वाचा भाग आहे.

अभ्यासक्रमाच्या पद्धती

काही ठिकाणी हा अभ्यासक्रम पूर्णवेळ किंवा अर्ध वेळ (दूरस्थ शिक्षण पद्धती किंवा पत्रव्यवहार शिक्षण पद्धत) पद्धतीने उपलब्ध असतो.

बॅचलर ऑफ सोशल वर्क हा अभ्यासक्रम काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ही शिकवला जातो ज्या उमेदवारांना एक ठरावीक वेळ किंवा तास अभ्यासासाठी देता येत नाहीत असे उमेदवार या पद्धतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात महाविद्यालयीन शिक्षण व ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या शिक्षण यांच्या पाठ्यक्रमात विशेष फरक नसतो तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम करताना, पत्रव्यवहारात द्वारे अभ्यासक्रम करताना उमेदवारांना ठराविक काळानंतर एका ठराविक संपर्क कार्यक्रमाअंतर्गत एका ठिकाणी बोलविले जाते ज्या ठिकाणी उमेदवाराच्या मनात असलेले प्रश्न व त्यांच्या अडचणी सोडविल्या जातात.

ज्या व्यक्ती सामाजिक बदल घडवून आणू इच्छितात समाजातील उपेक्षित व वंचित घटकांसाठी काही मोलाचे योगदान देऊ इच्छितात त्या उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम एक आदर्श माध्यम ठरू शकते.

नोकरीच्या संधी (Jobs after BSW)

या अभ्यासक्रमानंतर उमेदवाराला खाजगी कंपन्या तसेच विविध सरकारी खात्यांमध्ये सुद्धा नोकरीसाठी संधी मिळते.

अशा प्रकारच्या नोकरीतून प्रपंच चालविण्यासाठी लागणारा पैसा तर मिळतोच याशिवाय फारच मोलाचे मानसिक समाधान मिळते कारण समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करून त्यांच्या जीवनात फार मोठे बदल घडवून आणणे अशा उमेदवारांना शक्य होते.

ज्या उमेदवारांना अभ्यासक्रमानंतर प्रकल्प समन्वयक म्हणून नोकरी मिळते त्यांच्यावर त्या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी असते व इतर लोक प्रकल्प समन्वयक च्या हाताखाली काम करतात.

पुढील शिक्षण

बरेच उमेदवार बी एस डब्ल्यू नंतर काही विशिष्ट विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क हा अभ्यासक्रम पूर्ण करतात किंवा एखाद्या विषयात डिप्लोमा करतात.

या उमेदवारांना समाजातील विविध आर्थिक व सामाजिक समस्या हाताळण्यासाठी लागणाऱ्या ज्ञानसंवर्धनाचीदेखील उत्तम संधी मिळते. हा अभ्यासक्रम त्या उमेदवारांसाठी जास्त योग्य आहे ज्यांना इतरांची काळजी घेण्याची जास्त सवय/ आवड असते. कुठलाही मनुष्य किंवा प्राणी त्रासात असेल तर जे धावून जातात अशा व्यक्तींसाठी हा अभ्यासक्रम एक वरदानच आहे. नोकरी मिळविण्यासाठी असलेली स्पर्धा लक्षात घेता उमेदवाराने पुढे जाऊन या विषयात मास्टर्स डिग्री म्हणजे एम एस डब्ल्यू, मास्टर इन सोशल वर्क पूर्ण करणे फायद्याचे ठरते.

उमेदवाराला आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव असल्यास शिक्षण कुठे कामी येऊ शकते आणि समाजातील कुठल्या घटकांना मदत केली जाऊ शकते हे त्याच्या चटकन लक्षात येते. उमेदवाराला कायद्याचे व वैद्यकीय क्षेत्राचे कामचलाऊ ज्ञान असल्यास तो समाजाला आणखी जास्त उपयोगी पडू शकतो.

अभ्यासक्रमाचे नाव (BSW long form)बॅचलर ऑफ सोशल वर्क (बी एस डब्ल्यू)
अभ्यासक्रमाचा कालावधीतीन वर्षे
शैक्षणिक अहर्ताउमेदवार ज्यांनी 10+2 बारावीची परीक्षा मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून (recognized board) पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळवून पास केली आहे.
प्रवेश प्रक्रियागुणवत्तेवर, सरळ प्रवेश किंवा प्रवेश चाचणीच्या निकालाप्रमाणे (ही प्रक्रिया आधी जाहीर केली जाईल)
BSW Course Information in Marathi

शिक्षणाचे माध्यम (Medium of Instruction)

हे शिक्षण इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून घेतले जाऊ शकते.  इलेट्रॉनिक माध्यमांचा वापर करून घडविलेल्या चर्चा, फिल्ड वर्क साठी नेमून दिलेल्या कामावर चर्चा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहिती पुरविली जाते.

अभ्यासक्रमातील अनेक उत्तम संदर्भ ग्रंथ तसेच पाठ्यपुस्तके सुद्धा मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने उमेदवाराला इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल तर त्याची मदत होते.

बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाचे मूल्यमापन

मूल्यमापन हे विद्यापीठाने प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी घेतलेल्या परीक्षांवर अवलंबून असते. याशिवाय नेमून दिलेले कार्य, फील्ड वर्क, शोध प्रबंध याच्या मदतीने हे मूल्यमापन केले जाते तसेच मौखिक परीक्षेने सुद्धा मूल्यमापन केले जाते.

BSW अभ्यासक्रमाचे साधारण शुल्क – रु 6,500 ते 10,000*

अभ्यासक्रमाच्या उपरांत कामाचे स्वरूप- समुपदेशक, गुन्हेगारी शास्त्र निष्णात, सामाजिक सुरक्षा अधिकारी, शिक्षक-प्राध्यापक, सामाजिक कल्याण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, श्रमिक कल्याण अधिकारी, गैर सरकारी संस्था (NGOs), सरकारी प्रतिष्ठाने, विविध सरकारी विभाग, पुनर्वसन केंद्रे, वृद्धाश्रम, अनाथालय, सरकारी इस्पितळे, वेड्यांचे इस्पितळ,कौटुंबिक न्यायालये इत्यादी

ह्या क्षेत्रात काम करणारे काही उमेदवार फक्त ग्रामीण समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यात प्रावीण्य मिळवतात.

ज्या उमेदवारांना अभ्यासक्रमानंतर प्रकल्प समन्वयक म्हणून नोकरी मिळते त्यांच्यावर त्या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी असते व इतर रोग प्रकल्प समन्वयक च्या हाताखाली काम करतात.

अंदाजे वार्षिक उत्पन्न – रुपये 4 लाख (payscale.com)

BSW अभ्यासक्रमानंतर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधी- मास्टर ऑफ सोशल वर्क (एम एस डब्ल्यू)(विविध विषयात विशेषज्ञता),तसेच सामाजिक कार्य या विषयात विद्यावाचस्पती (पी एच डी) इत्यादी

आम्ही आशा करतो कि तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या प्रवासात तुम्हाला भरपूर यश, आनंद आणि संतुष्टी लाभो. हार्दिक शुभेच्छा!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments