CCC कोर्स माहिती |CCC Course Information in MarathiCCC Course Information in Marathi:

CCC हा एक कॉम्पुटर कोर्स आहे. CCC चा फुल फॉर्म कोर्स ऑन कॉम्पुटर कॉन्सेप्ट असा आहे. 

हा कोर्स आपल्या बेसिक आयटी ज्ञान प्रदान करतो. 

हया कोर्सस चे उदे्देश्य असे आहे की सामान्य माणसाला:

 • त्याचे वैयक्तीक/बिझीनेस लेटर तयार करता यावे.
 • इन्टरनेटचा वापर करता यावा.
 • इमेलचा वापर करता यावा.
 • बिझनेस प्रेझेन्टेशन बनवता यावेत.
 • डाटाबेस तयार करता यावेत.

हा कोर्स एक प्रॅक्टीकल ओरिएन्टेड कोर्स म्हणुन ओळखला जातो.

CCC (Course on Computer Concepts)

CCC (Course on Computer Concepts) Study Guide

जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर काही सरकारी नोकरी मध्ये CCC चे सर्टीफीकेट असणे गरजेचे आहे.

त्यामुळे बरेच लोक ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे ते हा कोर्स करतात.

जर तुम्हाला कॉम्पुटरचे बेसिक्स शिकायचे असतील तर MSCIT कोर्स हा पण एक चांगला कोर्स आहे.

विशेष म्हणजे, हा कोर्स कोणीही करू शकतो, याला वयाची काही अट नाही.

NILIT चे जागोजागी सेंटरर्स आहेत जिथे आपण हा कोर्स पुर्ण करू शकता. 

CCC Course Information in Marathi
CCC Course Information in Marathi

कोर्स बद्दल ​थोडक्यात:

कोर्स पुर्ण करण्यासाठी कालावधी2 ते 3 आठवडे
कोर्स पुर्ण करण्यासाठी लागणारे तास80 तास
(25 तास — थेअरी,
5 तास — टयुटोरीयल,
50 तास — प्रॅक्टीकल्स्)
CCC course information in Marathi

सीसीसी परीक्षेचे फॉर्म कुठे भरतात?

CCC परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हया संकेत स्थळावर जावे लागते— NIELIT – Student  Portal (http://student.nilelit.gov.in)

परीक्षेचे फॉर्म फक्त ऑनलाइन भरता येतात. फॉर्म भरल्यावर तुम्हाला तो फॉर्म कुठेही पाठवण्याची गरज नसते.

फॉर्म भरून झाल्यावर परीक्षेची फी ऑनलाइन भरावी लागते.

हे देखील वाचा:  BMLT कोर्स बद्दल माहिती | BMLT Course Information in Marathi

ऑनलाइन फी भरण्यासाठी तुम्ही खालील कोणताही मार्ग वापरू शकता:  

 • NEFT
 • RTGS
 • CSC-SPV
 • CREDIT CARD
 • DEBIT CARD
 • NET BANKING

CCC परीक्षेसाठी लागणारे ऍडमिट कार्ड तुम्ही बेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.

परीक्षेत एकुण 100 प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी असतो.

परीक्षा दिल्यावर 15 दिवसामध्ये तुमचा निकाल जाहिर होतो. तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 50 टक्के गुण लागतात.

जर तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळाले तर तुम्ही परत परीक्षा देवु शकता.

निकाल जाहिर झाल्यावर तुम्ही तुमचा रिझल्ट वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

सीसीसी कोर्स करणे गरजेचे आहे का?

जसे मी वर सांगितले, सीसीसी कोर्स हा कोर्स तुम्हाला इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीचे बेसिक शिकवतो.

जर तुम्हाला संगणक वापरता येत असेल तर तुम्ही हा कोर्स केला नाही तरी जमेल.

जर तुम्हाला सीसीसी कोर्सच्या सर्टीफीकेटची नोकरीसाठी गरज असेल तर तुम्हाला हा कोर्स करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. 

जर तुम्ही फक्त कॉम्पुटर शिकण्यासाठी हा कोर्स करत असाल तर तुम्ही एम एस सी आय टी हा कोर्स पण करू शकता.

फरक एवढाच आहे की एम एस सी आय टी कोर्स तुमचे 2 ते 3 महीने घेवु शकतो आणि CCC कोर्स हा 2—3 आठवडे मध्ये पुर्ण होतो. 

एमएससीआयटी आणि सीसीसी कोर्सेसमध्ये काय फरक आहे?

 • सरकारी नोकरीसाठी तुम्हाला सीसीसी चे सर्टीफीकेट मागितले जाउ शकते- ( ते तुम्ही कोणती नोकरी आणि कोणत्या राज्यात करत आहात त्यावर अवलंबुन आहे.)
 • एम एस सी आय टी कोर्सची फी 4500 रूपये आहेत, आणि सीसीसी कोर्सची एक्झाम फी 500 रूपये आहे. (CCC च्या क्लास ची फी कीती आहे हे तुम्हाला तुमच्या जवळच्या सेंटरला जाउन कळेल, पण सीसीसी हा 2—3 आठवडयाचा कोर्स आहे हे गृहीत धरले तर सीसीसी कोर्सचा खर्च एमएससीआयटी पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.)
 • जर तुम्हाला फक्त कॉम्पुटर येते याचे सर्टीफीकेट पाहीजे असेल तर 500 रूपयात सीसीसीची परीक्षा देवुन भेटेल, पण एमएससीआयटी ला तुम्हाला 4500 रूपये लागतील.
हे देखील वाचा:  हॉटेल मॅनॅजमेण्ट माहिती | Hotel Management Course Information in Marathi
Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.