LLB कोर्सची माहिती, पात्रता, LLB Full Form in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

आज आपण बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का? असल्या कसा घ्यायचा हे जाणून घेणार आहोत.

तुमचा मनात अनेक प्रश्न असतील जसे.

 • काय असते हे BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB?
 • कसा घ्यायचा BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी प्रवेश?
 • बारावी नंतर डायरेक्ट एलएलबी साठी प्रवेश घेता येतो का?
 • कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?
 • BA. LLB / BCom. LLB / Bsc. LLB साठी लोकप्रिय कॉलेजेस कोणती?
lawyer 3819044 1920

LLB Full Form in Marathi

एल एल बी चा फॉर्म आहे – Bachelor of Law.

LLB ला Legum Baccalaureus पण म्हणतात. 

BA. LLB

BA. LLB म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लॉ ( Bachelor of Arts – Bachelor of Law ) हा बारावी नंतर केला जाणारा पाच वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला बी ए ग्रॅज्युएशन सोबत लॉ चे पण विषय असतात.

या कोर्स मध्ये तुम्हाला Economics, History, Political Science, Sociology along with law subjects like Civil Law, Criminal Law, Labour Law, Tax Law, Administrative Law, Corporate Law, Patent Law सारखे विषय शिकायला मिळतात.

BA LLB साठी प्रवेश पात्रता

BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असावे लागते मंग तुम्ही कोणत्या शाखेतून तुमची बारावी पूर्ण केली असो तुम्हाला BA LLB साठी प्रवेश घेऊ शकता.

BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी सर्व सामान्य पने सर्वच कॉलेज मध्ये तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. बरेच कॉलेज राष्ट्रीय प्रवेश परीक्षे नुसार प्रवेश देतात तर काही कॉलेजेस मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते व त्यातील गुनांन नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

काही लोकप्रिय प्रवेश परीक्षा

 • Common-Law Aptitude Test (CLAT)
 • LSAT India
 • MH CET Law 
 • ILSAT
 • TS LAWCET
 • AP LAWCET

महाराष्ट्र राज्य मध्ये तुम्हाला BA LLB साठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला MH CET Law हि प्रवेश द्यावी लागते. त्यातील गुणांना नुसार प्रवेश दिला जातो.

LLB विषयी अधिक जाणून घेऊया – कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔

BCom. LLB

BCom. LLB हा पाच वर्षाचा कोर्स आहे. या मध्ये तुम्हाला लॉ च्या विषायान बरोबर कॉमर्स शाखेचेही विषय असतात. BA LLB प्रमाणेच Bcom LLB साठी तुम्हाला प्रवेश परीक्षा दयवी लागते.

जसे BA LLB मध्ये Law च्या विषयान सोबत BA ग्रॅज्युएशन चे विषय असतात त्याच प्रमाणे Bcom LLB madhe तुम्हाला Law च्या विषयान सोबत कॉमर्स शाखेच्या अभ्यास क्रमातील विषय असतात.

Bsc LLB

बॅचलर ऑफ सायन्स अँड बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ (Bachelor of Science and Bachelor of Law) हा एक पाच वर्षाचा कायदा अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला बारावी (१०+२) विज्ञान शाखेतून पूर्ण केल्या नंतर करता येतो.

Bsc LLB कोर्स मध्ये BA LLB व BCom LLB प्रमाणे कायद्याच्या विषयांन बरोबर तुम्हाला विज्ञान शाखेच्या विषयांचा अभ्यास करायला मिळतो. जसे Chemistry, Electronic Devices, Biotechnology इत्यादि.

Bsc LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावे लागते. त्याच बरोबर BA LLB व BCom  LLB सारखीच बस्क LLB मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

LLB नंतर नोकरीच्या संधी कोठे कोठे आहेत. लोकप्रिय संस्था, LLB साठी लागणारे कौशल्य हे सर्व जाणून घ्या –  कसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय ? 🤔|| Who to Become Lawyer || What is LLB?

वरील कोर्ससाठी पर्याय

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.