डी फार्मसी म्हणजे काय? | D Pharmacy Information in Marathi

Author: जय विजय काळे | Updated on: ऑक्टोबर 12, 2023
d pharmacy information in marathi

१२वी पूर्ण होताच, करियर संबंधित अनेक प्रश्न आणि पर्याय डोळ्या समोर उभे राहतात, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा कला क्षेत्राकडे नेणाऱ्या पर्यायातून स्वतःसाठी उपयुक्त शाखा निवडणे बरेच वेळा कठीण होते.

पदवी, पदविका शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला किंवा वाणिज्य, भरपूर पर्याय आणि भरपूर गोंधळ सुद्धा!

आज जाणून घेऊया एका करियर पर्यायाबद्दल, डी फार्म (D Pharmacy) बद्दल!!!

डी फार्मसी म्हणजे काय?

डी फार्मसी म्हणजे काय? औषध निर्माण शास्त्रत पदविका म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी (D Pharmacy),  हा फार्मास्युटिकल सायन्स च्या क्षेत्रात करिअर-आधारित पदविकेचा कोर्स आहे.

दोन वर्षाच्या कालावधीत ह्या कोर्स द्वारे  विद्यार्थ्यांना औषध आणि औषध निर्मिती आणि संदर्भित मूलभूत संकल्पनांसह परिचित करण्यासाठी हा कोर्स निर्माण करण्यात आला होता.

मी D Pharmacy मध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहे का?

दोन वर्षांची D Pharmacy पदविका, बारावी उत्तीर्ण म्हणजेच १० + २ उत्तीर्ण विद्यार्ध्यांसाठी विकसित केलेला प्रास्ताविक अभ्यासक्रम आहे.

ह्या अभ्यासक्रमाची पात्रता खालील प्रमाणे आहे.

अभ्यासक्रमाचे नावडिप्लोमा इन फार्मसी (D Pharmacy)
(औषध निर्माण शास्त्र पदविका)
अभ्यासक्रमाचे स्वरूपपदविका
शैक्षणिक पात्रता१२ वी पास. (कमीत कमी ५०% गुणांसह)
(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र
किंवा गणित विषयांसह)
कालावधी२ वर्षे.
D Pharmacy Course Information in Marathi

डी फार्म मध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे?

१२वी नंतर D Pharmacy च्या पदविकेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, इच्छुक उमेदवारांना  प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागते.

ह्या प्रवेश प्रक्रियेचे दोन मुख्य प्रकार असतात, राज्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा तसेच, प्रवेश परीक्षेचा दुसरा प्रकार, म्हणजे विद्यापीठ प्रवेश परीक्षा (University Entrance Exam).

हि परीक्षा विद्यापीठांमध्ये परचलित असली तरीही  काही विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच मेरिट बेसिस वर देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

दोन्ही प्रकारच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतो.

राज्यस्तरीय प्रवेश परिक्षेतुन प्रवेश:

प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम १२वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असला तरीही नव्या जोमाने तयारी करण्याची गरज आहे. 

MH – CET प्रवेश परीक्षा ची तयारी करण्यासाठी अनेक शिकवणी वर्ग प्रस्थापित आहेत आणि अनेक पुस्तके देखील बाजारात उपलब्ध आहेत.

असे असतांना एक नवीन पर्याय देखील जन्माला आला आहे – ऑनलाईन प्रशिक्षण. अनेक प्रशिक्षण संस्थान आपली प्रशिक्षण सामग्री इंटरनेट च्या माध्यमाने पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, या प्रयत्नांच्या मागचे कारण म्हणजे, घरून, आपल्या वेळेत, आपल्या गतींने शिक्षण घेऊ इच्छितांचा वाढत आकडा आहे.

युट्युब चॅनेल्स वर मोफत उपलब्ध असणाऱ्या सामग्रीपासून तर ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड पद्धतीने घेतल्या जाणारे शिकवणी वर्ग (online class) असो, रिमोट पद्धतीनी शिक्षण अत्यंत सोपे, खर्चाला परवडणारे आणि लवचिक असल्याचे दर वेळी ठरत आले आहे आणि म्हनुनच MH – CET साठी तयारी करताना ऑनलाईन शिक्षणाकडे  एक उत्तम पर्याय म्हणून बघितले जाते.

मला डी फार्म मध्ये काय शिकायला मिळेल?

डी  फार्म, हा एक पदविका अभ्यासक्रम आहे, ज्या द्वारे दोन वर्षांच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र आणि औषध विर्की बाबत महत्वाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते.

जसे,

D Pharmacy पदविकेच्या समाप्ती नंतर, विद्यार्थी फार्मसी संबंधित थेट विक्री किंवा निर्माण क्षेत्रात काम करण्यास तयार आणि पात्र होईल.

डी फार्म पूर्ण केल्यावर नोकरी/व्यवसायाच्या कोणत्या संधी आहेत?

D Pharmacy एक व्यावसायिक दृष्ट्या फार अष्टपैलु आभ्यासक्रम आहे, ह्या शिक्षणा दरम्यान विद्यार्थी औषधनिर्माण शास्त्रातील अनेक नोकरी व व्यवसायाच्या संधींसाठी तयार होतो.

तसे करण्याआधी, विद्यार्थ्यांने स्वतःची  नोंद फार्मसीस्ट म्हणून करून घेणे आवश्यक आहे.

नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणजे एक असा व्यक्ती आहे ज्याचे फार्मसी क्षेत्रामध्ये शैक्षणिक पात्रता आहे आणि त्याचे नाव, त्याच्या राज्यातील राज्य फार्मसी कौन्सिल अंतर्गत नोंदणीकृत आहे.

हि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच, नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून सर्व नोकरी आणि व्यावसायिक संधींना संपूर्ण पात्र ठरतो.

आपल्या यशाची शक्यता वाढविण्यासाठी आपण डी फार्म च्या पुढील अभ्यासक्रम म्हणजे फार्मसी मध्ये पदवी चे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकता.

जर तुम्हाला फार्मास्युटिकल क्षेत्रात तुमचा आनंद आणि आवड सापडली असेल तर आपण फार्मसीमध्ये पदवी घेऊ शकता.

असे ठरवतांना लक्ष्यात घ्या की जर तुम्ही डी.फार्म आधीच पूर्ण केले असेल तर तुम्ही थेट बी.फार्म च्या दुसर्‍या वर्षासाठी अर्ज करू शकता. हा अर्ज करण्या पूर्वी आपल्या आवडीच्या कॉलेज किंवा विद्यापीठासोबत संपर्क साधायला विसरू नका.

इतकाच नव्हे तर तुम्ही पदव्युत्तर, म्हणजेच एम फार्म चे शिक्षण घेण्याचा निर्णय देखील घेऊ शकता.

तुमच्या करिअर ला एक चांगले आणि आगळे वेगळे वळण म्हणून तुम्ही डी फार्म नंतर, कायद्याची पदवी देखील घेऊ शकता. तसेच पदव्युत्तर शिक्षणासाठी व्यवसाय व्यवस्थापन देखील निवडल्या जाऊ शकते.

आम्ही सर्व वाचकांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो त्यांचे शिक्षण संबंधित सर्व निर्णय समाधानकारक आणि यशस्वी ठरतील.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: