BAF कोर्स अकांउंटींग आणि फायनांशियल विषयावर फोकस करणारा एक अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे.
BAF 3 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF कोर्स करतांना या तीन वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतील. BAF कोर्सच्या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न पध्दतीने होतात म्हणजे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते.
BAF कोर्सची फी 15 हजार ते 1 लाखा पर्यंत असु शकते. (*BAF कोर्सेसची फी तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेतात त्यावर अवलंबुन आहे.)
BAF फ कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधुन बारावी केलेली पाहीजे आणि तुम्हाला बारावीमध्ये कमीत कमी 45 टक्के गुण असणे गरजेचे आहे. (* आरक्षित जागांना 5 टक्के सवलत दिली जाते.)
BAF ची प्रवेश प्रक्रीया मेरिट बेस असते पण काही महाविदयालये प्रवेश परीक्षा पण घेवु शकतात.
आज काल बरेच महाविदयालय प्रवेश प्रक्रीया ऑनलाइन पध्दतीने करतात त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजची प्रवेश प्रक्रीया ऑनलाइन आहे की ऑनलाइन आहे याची तुम्ही त्यांच्या वेबसाइट वर जाउन खात्री करू शकता.
BAF कोर्सेसची प्रवेश प्रक्रीया शक्यतो अशी असते:
ऑनलाइन फॉर्म सुटतात.
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.
संबधित डॉक्युमेंटस् च्या प्रती अपलोड करणे.
मेरिट लिस्टची वाट पाहणे
मेरिट लिस्ट लागल्यावर आपले नाव आहे का याची खात्री करणे.
मेरिट लिस्ट मध्ये नाव असल्यास कॉलेजला जाउन डॉक्युमेंट व्हेरीफीकेशन करणे आणि आणि फी भरून प्रवेश कन्फर्म करणे.
(*कृपया संबधीत कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी कॉलेजची ऑफिशिअल वेबसाइट पहा.)
बीएएफ कोर्स प्रामुख्याने हया विषयावर लक्ष देतो:
IT (आयटी)
TAXATION (टॅक्सेशन)
ECONOMICS (इकोनॉमिक्स)
BUSINESS LAW (बिझनेस लॉ)
COST ACCOUNTING (कॉस्ट अकांउंटींग)
FINANCE AND ACCOUNTING (फायनांन्स अँड अकांउंटींग)
BAF नंतर तुम्ही काय करू शकता?
एमबीए ( एमबीए एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे ज्याला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा दयावी लागते.)
अनॅलिस्ट(तुम्ही फायनान्स अनॅलिस्ट, इन्व्हेस्टमेंट बॅंकींग अनॅलिस्ट म्हणुन काम करू शकता)
स्ट्रॅटेजी ( तुम्ही फायनांशियल आणि इन्व्हेस्टमेंट कंन्सल्टींग देवु शकता.)
सेल्स् (तुम्ही इन्शुरन्स, बॅंकींग, रीसर्च क्षेत्रात सेल्स मॅनेजर म्हणुन काम करू शकता.)
लेखक - जय विजय काळे
जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात.
जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा