आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्याला टिकून जर राहायचे असेल तर आपल्याला उच्च शिक्षण घ्यावे लागते. आताचा काळ हा पूर्ण टेक्नॉलॉजीचा काळ झालेला आहे. या टेक्नॉलॉजीचा जगात आपल्याला टिकून राहायचे असणार तर एम. सीए कोर्स हे आपल्याला एक अत्यंत उत्तम संधी आहे. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला संगणकाचे संपूर्ण ज्ञान मिळते आणि या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यास मदत होते.
ज्यांना संगणकाची आवड आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अतिशय उत्तम संधी घेऊन आला आहे.
आता आपण एम. सीए कोर्स विषयी थोडक्यात माहिती पाहूया:-
एम. सीए म्हणजे काय? | MCA meaning in Marathi
एम.सीए म्हणजे “मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन”होय.
एम.सीए कोर्स साठी विद्यार्थ्यांची पात्रता किती असायला हवी?
बारावीनंतर विद्यार्थ्यांना जर हा कोर्स करायचा असेल तर विद्यार्थ्यांना बारावीमध्ये किमान 55 ०/० गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुणअसायला हवे. जर विद्यार्थ्यांना हा कोर्स ग्रॅज्युएशन नंतर करायचा असेल तर त्याला कमीत कमी 50 ते 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर ग्रॅज्युएशन मध्ये गणित हा विषय असणे आवश्यक आहे.
एम. सीए कोर्सचा कालावधी किती असतो?
हा कोर्स जर आपण बारावी नंतर केला तर हा कोर्स 3 वर्षांचा कोर्स असतो आणि यात 6 सेमिस्टर असतात.
ग्रॅज्युएशन नंतर हा कोर्स करायचा असेल तर हा कोर्स 2वर्षांचा असतो.
एम.सीए च्या 3 वर्षांमध्ये कोणकोणते विषय असतात ते आपण पाहूया :-
1) एम सीए च्या पहिल्या वर्षातील विषय:-
१.आयटीची मुलभूत तत्वे, २.सि ++ मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ३. संगणक संस्था, ४. ऑपरेटिंग सिस्टीम, ५. सि मध्ये प्रोग्रामिंग, ६. डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली, ७. डेटा आणि फाइल्स स्ट्रक्चर, ८. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, ९. स्वतंत्र गणित, इत्यादी.
2) एम.सीए च्या द्वितीय वर्षातील विषय:-
१. गणना चा सिद्धांत, २.डेटा वेअर हाऊसिंग आणि डेटा मायनिंग, ३. डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग, ४.ऑब्जेक्ट ओरिएंटेड विश्लेषण आणि डिझाईन,५.संगणक ग्राफिक्स, ६. वेब तंत्रज्ञान,
७. अल्गोरिदम चे डिझाईन आणि विश्लेषण, ८. संगणक नेटवर्क, ९. जावा प्रोग्रॅमिंग, इत्यादी.
3) एम. सीए च्या तिसऱ्या वर्षातील विषय:-
१. लिनक्स प्रोग्रामिंग, २.जावा सह एंटरप्राईज संगणक, ३.सॉफ्टवेअर चाचणी, ४. सहा(6)महिन्यांची इंटर्नशिप, इत्यादी.
एम. सीए कोर्स करण्यासाठी उत्तम कॉलेजस कोणते:-
मोठ्या शहरांमध्ये ही एम. सीएची कॉलेजेस असतात. जसे की, अमरावती, शेगाव,पुणे इत्यादी
१. मुंबईचे ‘के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ कॉलेज
२. बेंगलुरु चे ‘स्विस्त विद्यापीठ’
३. नोयडा चे ‘मिटी विद्यापीठ’
हे भारतातील चर्चेत एम.सीएचे कॉलेजेस आहेत.
एम. सीए कोर्स करण्यासाठी फि कीती लागले?
कॉलेज कोणते आहेत त्यावर फि अवलंबून असते. प्रत्येक कॉलेज ची फि ही वेगवेगळी असते. परंतु या कोर्स ची फि साधारण 20,000 ते 1 लाख पर्यंत असते. काही कॉलेजस मध्ये 30,000 ते 2.5 लाख प्रती वर्ष घेतली जाते.
एम सीए कोर्स च्या काही स्पेशलायझेशन आहेत ते पुढीलप्रमाणे:-
१. प्रणाली विकास,२. प्रणाली अभियांत्रिकी, ३. नेटवर्किंग, ४.प्रणाली व्यवस्थापन, ५.इंटरनेट कार्यरत, ६.सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ७.समस्या निवारण, ८.व्यवस्थापन माहिती प्रणाली, इत्यादी.
एम.सीए कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणती
कौशल्ये असायला हवी?
पुढील कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी:-
१. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. त्याचबरोबर चांगला संवाद आणि चांगले वर्तना चे कौशल्य असायला हवे.
२. विद्यार्थ्याला तांत्रिक प्रणालीचे भरपूर ज्ञान असायला हवे त्याचबरोबर आत्मविश्वास खंबीर असायला हवा.
३. प्रोग्रामिंग चे काम उत्तम प्रकारे यायला हवे. तसेच सी,सी प्लस प्लस, जावा, नेट इत्यादी प्रोग्रामिंग व भाषांवर योग्य ती कमांड असायला हवी.
४. नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती हवी. तसेच
नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता हवी.
इत्यादी कौशल्याचे ज्ञान जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तर हा कोर्स त्यांना करणे सोपे जाते तसेच पुढे नोकरीमध्ये या कौशल्याचा त्यांना अत्यंत फायदा होतो.
एम. सीए कोर्स करण्याचे फायदे कोणते?
हा कोर्स करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-
१. हा कोर्स केल्यामुळे आपल्याला संगणकीय ज्ञानात वाढ होण्यास मदत होते.
२. आपल्याला परदेशी नोकरी करण्याची संधी मिळते.
३. हा कोर्स केल्यामुळे आपले संगणकीय ज्ञान वाढले असते त्यामुळे आपल्याला कुठल्याही ठिकाणी नोकरीची संधी सहज उपलब्ध होते.
४. संगणकाचे ज्ञान असल्यामुळे आजच्या आधुनिकतेच्या जगात व स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यास मदत होते.
५. या कोर्सनंतर आपण जी नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्याला पगार अपेक्षेपेक्षा जास्त मिळू शकतो.
इत्यादी फायदे आपल्याला एम.सीए चा कोर्स केल्यानंतर मिळतात.
एम. सीए कोर्स केल्यानंतर नोकरीची संधी आहे का?
हो हा कोर्स केल्यानंतर आपल्या नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. भारतात व भारताबाहेर एम. सिए कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांची भरपूर मागणी आहे. त्यामुळे आपल्याला भारतात व भारताबाहेर सहज नोकरी मिळू शकते.
आपल्याला आयटी कंपनीमध्ये सहजरीत्या नोकरी मिळू शकते. ॲप डेव्हलपर, व्यवसाय विश्लेषक, डेटाबेस अभियंता, तांत्रिक लेखक इत्यादी पदांवर आपल्याला नोकरी मिळू शकते.
आपल्याला पगार किती पर्यंत भेटू शकतो?
ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळाली आहे आणि आपल्याला जे पद मिळाले आहे त्यावर आपला पगार निर्भर असतो.
तसे पाहिले तर सरासरी वेतन पॅकेज दर वर्षी 4
ते 5 लाख आहे. सुरुवातीला पगार हा 15,000 ते 36,000पर्यंत दर महिन्याला भेटतो. तसेच कंपनी आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या आधारावर आपल्या पगार हा दर वर्षी वाढवते.
अशाप्रकारे आपण एम.सीए कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली.
