कसं व्हायचं पत्रकार || काय असत हे मास कम्युनिकेशन आणि मीडिया || Mass Communication and media full course information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 26/11/2022

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला तुमच्या करिअर विषयी काही प्रश्न आहेत. तुमचा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ” मराठी करिअर गुरु ” पोर्टल वर मिळतील.

आज आपण जाणून घेणार आहोत पत्रकारांना विषयी . कोण असतात हे पत्रकार . कसं बनायचं पत्रकार. मास कम्युनिकेशन आणि मीडिया विषयी च्या संपूर्ण कोर्स ची माहिती आपण ह्या ब्लॉग मध्ये घेणार आहोत.

तुमचा मनात काही प्रश्न नक्की असतील जसे –

 • काय असत मास कम्युनिकेशन आणि मीडिया?
 • मास कम्युनिकेशन आणि मीडिया कोर्स साठी कसा प्रवेश घ्यायचा?
 • प्रवेश घेण्यासाठी प्रवेश पात्रता काय असते?
 • लोकप्रिय कॉलेजेस कोणती?
 • किती कालावधी लागतो कोर्स पूर्ण करण्यासाठी?
woman talking video 1426044%2B%25281%2529 result

काय असत मास कम्युनिकेशन आणि मीडिया?

मास कम्युनिकेशन हे मोठ्या संख्येने माहिती पोहोचविण्याचे माध्यम आहे.

मास कम्युनिकेशन आणि मीडिया हे केवळ पत्रकारितापुरता मर्यादित नाही तर त्याच बरोबर बातम्या गोळा करणे आणि त्यांचा अहवाल सादर करणे, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती, कार्यक्रम व्यवस्थापन, जनसंपर्क, जाहिरात, कॉर्पोरेट कम्युनिकेशन यासारख्या इतर माध्यम क्षेत्रातही त्याची शाखा पसरली आहे.

काही वर्षाच्या काळात मास कम्युनिकेशन आणि मीडिया चे चित्र खूप बदले आहे.

मास कम्युनिकेशन आणि मीडिया हे आजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

मागं ते वर्तमान पत्र असो वा दूरदर्शन म्हणजे आपल्या घरातील टेलिव्हिन. आज स्मार्ट फोन मुळे प्रत्येक व्यक्ती इतरांशी सहज संपर्क करू शकतो. आपल्या भावना जागा समोर मांडू शकतो .

इंटरनेट मुळे सर्व जग मुठीत असल्या प्रमाणे आपण have तेव्हा कोणतीही माहिती मिळवू शकतो.

आता तुम्हीं देखील माझा ब्लॉग इंटरनेट च्या मदतीने वाचू शकत आहेत.

हा देखील मास कम्युनिकेशन आणि मीडिया चाच एक प्रकार आहे.

आज इंटरनेट मुळे मास कम्युनिकेशन आणि मीडिया एक लोकप्रिय मध्यम बनले आहे.

नवनवीन संधी युवकानं साठी उपलब्ध होत आहेत. नुसत पत्रकरिकेत नावे तर इतर ही क्षेत्रात हा कोर्स मोठ्या प्रमाणात युवकानं साठी संधी उपलब्ध करून देत आहेत.

मास कम्युनिकेशन आणि मीडिया कोर्स साठी कसा प्रवेश घ्यायचा?

मास कम्युनिकेशन आणि मीडिया मध्ये विविध कोर्स उपलब्ध आहे.

काही कोर्स हे पदवीधर आहेत तर काही उच्च शिक्षणा साठी आहेत.

त्याच बरोबर काही डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स देखील आहेत. खाली आपण सर्व कोर्स ची बरकाव्या सह माहिती पाहणार आहोत.

डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया

डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया हा दोन वर्षाचा कोर्स आहे जो बारावी नंतर करता येतो.

तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी पूर्ण केली असो तुम्हाला मास कम्युनिकेशन आणि मीडिया ला प्रवेश घेता येतो.

बी ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया

बी ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया मध्ये तुम्हाला बारावी नंतर प्रवेश घेता येतो.

तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेली असो तुम्हाला बी ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया ला प्रवेश घेता येतो.

एम ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया

एम ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बी ए इन मास कम्युनिकेशन आणि मीडिया मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे लागते.

काही लोकप्रिय मास कम्युनिकेशन आणि मीडिया कोर्सची नावे

 • BJMC (Bachelor of Journalism & Mass Communication)
 • BJ (Bachelor of Journalism)
 • BMC (Bachelor of Mass Communication)
 • MJMC (Master of Journalism & Mass Communication)
 • MJ (Master of Journalism)
 • MMC (Master of Mass Communication)
 • PG Diploma in Mass Communication

मास कम्युनिकेशन आणि मीडियासाठी लागणारी कौशल्य

 • सर्जनशीलता
 • आत्मविश्वास
 • संभाषण कौशल्य
 • कठोर मुदतीच्या अंतर्गत कार्य करण्याची क्षमता
 • नेटवर्किंग कौशल्ये
 • संशोधन कौशल्य
 • मुलाखतीची कौशल्ये
 • निरीक्षण कौशल्ये
 • समस्या सोडवण्याची कौशल्ये
 • व्याख्या कौशल्ये
 • गंभीर विचार
 • उग्र परिस्थितीत काम करण्याची क्षमता
 • मुलाखतीची चांगली कौशल्ये
 • कल्पना आणि विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याची क्षमता
 • अचूक आणि प्रभावी पद्धतीने माहिती सादर करण्यासाठी योग्यता

नोकरीच्या संधी व काही लोकप्रिय जॉब प्रोफाइल

मास कम्युनिकेशन आणि मीडिया कोर्स पूर्ण केल्या नंतर तुम्हाला विविध क्षेत्रात संधी मिळते जसे टेलिव्हिजन, चित्रपट, प्रकाशन, पत्रकारिता, संपादन, सार्वजनिक संबंध, इव्हेंट मॅनेजमेंट, चित्रपटमाली, उत्पादन, स्क्रिप्ट सर, दिग्दर्शक, जाहिरात आणि यासारख्या कारकीर्दीसाठी दरवाजे उघडते.

तुम्हीं एक जनसंपर्क व्यावसायिक पत्रकार, अभिनेता, रेडिओ जॉकी, व्हिडिओ जॉकी, दिग्दर्शक, संपादक, इव्हेंट मॅनेजर, जाहिरात एजंट, प्रतिकृती, मीडिया प्लॅनर आणि सूची सुरू होण्याची निवड करू शकतात.

विविध संचार आणि मीडिया संस्थान मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळते.

वरील कोर्ससाठी पर्याय:

LLB
BCA
BBA
BMS

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.