MBA GUIDE – फी, पात्रता, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, SUBJECTS, इ.

mba information in marathi

पदवी पूर्ण केल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना MBAला प्रवेश घ्यायचा असतो. पण MBA म्हणजे काय (MBA Information in Marathi)? तुम्ही MBA कोर्स का करावा? मी या लेखात तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देईन. चला तर मग MBA बद्दल अधिक जाणून घेऊया जसे की MBA कोर्सची पात्रता, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि MBA अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पद्धती.

MBA हा जगातील सर्वोत्तम पदव्युत्तर अभ्यासक्रमांपैकी एक आहे. बऱ्याच वेळा असे होते की तुम्ही जे ग्रॅज्युएशन केले आहे ते तुम्हाला चांगला जॉब देण्यासाठी पुरेसे नसते. मग त्यानंतर काय करायचे? तर चांगला जॉब भेटावा म्हणुन लोक एमबीए करतात.

पात्रता – एमबीए कोर्स करण्यासाठी मी पात्र आहे का?

जर तुमचे ग्रॅज्युएशन पुर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमची पदवी ५०% पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहात तर तुम्ही एमबीएसाठी प़ात्र आहात. एमबीएसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् कोण्त्याही साईड मधुन तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले असले तर तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात. अशी काही अट नाही की एमबीए करण्यासाठी तुमचे एडुकेशनल बॅकग्राउंड  कॉमर्स साईड चे असावे.

 एमबीएसाठी पात्र असण्यासाठी हया अटी आहेत:

 • सायन्स, आर्टस् किंवा कॉमर्स यामधील कोणत्याही क्षेत्रामधुन तुमची पदवी झालेली पाहीजे.
 • पदवी मध्ये तुम्हाला ५०% पेक्षा जास्त गुण पाहीजे. जर तुम्ही रिजर्व्ह कॅटेगिरी मध्ये असाल, तर तुमचे ४५% गुण पाहीजे.
 • आपण कोणतीही एक प्रवेश परिक्षा पास पाहीजे.
Image contains MBA Eligibility Criteria:
Graduate Degree - You should be a graduate from any field 
50% Marks - You must have minimum 50% marks in your graduation. Reserved categories have relaxations. 
Entrance Exams - You must have enough percentile in respective MBA entrance exam.

प्रवेश परीक्षा – मी कोणती एमबीए प्रवेश परिक्षा दयावी?

महाराष्ट्रामध्ये कोणत्या ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही MAH-MBA/MMS CET ही प्रवेश परिक्षा देणे गरजेचे आहे. काही कॉलेज त्यांची वेगळी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतात.

काही एमबीए प्रवेश परिक्षेची नावे आहेत.

 • MAH CET
 • CAT
 • SNAP
 • XAT
 • CMAT

जर तुम्ही महाराष्ट्रात एखादया कॉलेज मध्ये प्रवेश घेत आहात, तर MAH-MBA/MMS CET हया परिक्षेची मी शिफारस करतो कारण महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्व कॉलेज हया परिक्षेच्या आधारे प्रवेश स्वीकारतात.

प्रवेश प्रक्रिया – एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रीया आहे?

एमबीए कोर्सला प्रवेश घेण्याआधी तुम्ही याची पुष्टी करा की तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात का. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही MBA प्रवेश परिक्षेचे फॉर्म भरा आणि परिक्षा दया.

परिक्षेचा निकाल जेव्हा जाहिर होतो, तेव्हा CAP राउंडला सुरूवात होते. तेव्हा तुमच्या जवळच्या एमबीए कॉलेजला जावुन तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला लांबच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असेल (पुणे, मुंबई) तरीही तुम्ही जवळच्या एमबीए कॉलेजला जा आणि ऑपशन फॉर्म भरा. ऑपशन फॉर्म भरतांना तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे हे विचारले जाते तेथे आपली इच्छित महाविदयालये निवडा.

जेव्हा फर्स्ट राउंड डिक्लेर होतो तेव्हा तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे ते चेक करा आणि जर तुम्हाला ते कॉलेज पसंत असेल तर सिट कन्फर्म करा.

कोर्स फी – एमबीए कोर्सची फी कीती असते?

एमबीए कोर्सची सरासरी फी १,५०,००० आहे. एमबीए कोर्ससाठी कॉलेज ५०,००० ते २५,००,०००+ फि आकारू शकते. ते तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबुन आहे.

मला एमबीए कोर्समध्ये काय शिकवले जाईल?

एमबीए कोर्समध्ये हया तीन गोष्टींवर तुम्हाला शिक्षण दिले जाते:

 • थेअरी क्लासेस — यात तुमचे थेअरी क्लासेस होतात.
 • प्रॅक्टीकल क्लासेस — यात तुमचे प्रॅक्टीकल होतात.
 • इंटर्नशिप — यात तुम्हाला इंटर्नशिप करायचे असते.

एमबीए कोर्स करतांना तुम्हाला एक स्पेशलाईझेशन  निवडावे लागते.

एमबीए कोर्सचे जास्त पसंत केलेले ३ स्पेशलाईझेशन आहेत.

 • फायनांन्स
 • मार्केटिंग
 • हयुमन रिसोर्सेस

मी MBA कोर्स का करावा?

एमबीए करण्याचे वेग वेगळया लोकांचे वेगळी कारणं असतात. पहिली आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे एमबीए केल्याने तुम्हाला जॉब भेटतो. खुप लोक एमबीए फक्त चांगला जॉब भेटावा म्हणुन करतात. जे लोक ग्रॅज्युएशन करून जॉब करत आहे ते एमबीए करून त्यांचे स्कील वाढवतात.

असेही कीती लोक असतात की त्यांनी जे ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यावर त्यांना जॉब भेटत नाही. परंतु एमबीए कोणतेही ग्रॅज्युएशन झालेले विदयार्थी करू शकता, त्यामुळे त्यांना एक संधाी भेटते एमबीए करून जॉब करण्याची.

विचार करा की तुमचा ग्रॅज्युएशन तुम्हाला जर जॉब देण्यासाठी सक्षम नाही आणि एमबीए करून जर तुम्हाला जॉब भेटत असेल तर का करू नये एमबीए? असे काही लोक आहेत की जे एमबीए करून स्वतःचा बिझनेस चालु करतात.

MBA नंतर काय? एमबीए कोर्स केल्यावर मला नोकरी भेटेल का?

हो, एमबीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला नोकरी भेटण्याची खुप जास्त शक्यता असते. पहिले म्हणजे जवळ प्रत्येक एमबीए कॉलेजचे स्वतःचे प्लेसमेंट सेल असते जे विदयार्थ्यांचे प्लेसमेंट कंपनी मध्ये करून देते. कॅम्पस प्लेसमेंटसाठी खुप कंपनी येतात आणि विदयार्थांना जॉब ऑफर देवुन जातात.

जर कॅम्पस प्लेसमेंटनी तुम्हाला जॉब भेटला नाही तर बऱ्याच कंपनी त्यांच्या स्वतःच्या प्लेसमेंट ड्राईव्ह घेतात त्यात तुम्ही भाग घेवुन जॉबसाठी अर्ज भरू शकता. तुमच्याकडे एमबीएची पदवी असल्यास तुम्हाला जॉब भेटण्याची खुप जास्त शक्यता आहे.

मी जॉब करून एमबीए करू शकतो का?

स्पष्ट सांगावे तर एमबीए करतांना फुल टाईम जॉब करणे शक्य नाही. पण तुम्ही पार्ट टाईम जॉब करू शकता. खुप लोक एमबीए करतांना पार्ट टाईम जॉब करतात. जर तुम्हाला फुल टाईम जॉब करायचा असेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्र्हर्सिटी व्दारे करू एक्स्टर्नल एमबीए करू शकता.

एमबीए कोर्स पूर्ण करण्याचे मार्ग –

This image contains 2 different ways to complete MBA course.

एमबीए कोर्स पूर्ण करण्याचे तीन मार्ग आहेत –

 • Regular MBA – नियमित एमबीएमध्ये, तुम्ही कॉलेजमध्ये तुमचा एमबीए कोर्स पूर्ण करता.
 • Distance MBA – Distance Learning एमबीएमध्ये, तुम्ही तुमचा एमबीए कोर्स घरून किंवा नोकरी करत असताना पूर्ण करता.
 • Online MBA – ऑनलाइन एमबीएमध्ये, तुम्ही तुमचा एमबीए कोर्स प्रॉक्टोर्ड परीक्षांसह ऑनलाइन पूर्ण करता.

मी एक्स्टर्नल एमबीए केला पाहीजे का?

एक्स्टर्नल एमबीए शक्यतो ते लोक करतात ज्यांना जॉब भेटलेला आहे.

एक्स्टर्नल एमबीएसाठी तुम्ही पात्र आहात का? तुम्ही 50 टक्के पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही एक्स्टर्नल एमबीए साठी पात्र आहात. एक्स्टर्नल एमबीएसाठी त्याच अटी आहेत ज्या रेगुलर कॉलेज एमबीएसाठी असतात.

एक्स्टर्नल एमबीएसाठी पात्र होण्यासाठी काही अटी:

 • ग्रॅज्युएशन झालेले पाहीजे (कोणतेही ग्रॅज्युएशन चालते)
 • ग्रॅज्युएशन मध्ये तुमचे एकुण गुण 45 टक्के पेक्षा जास्त पाहिजे.(रिजर्व्ह कॅटेगिरीसाठी 40 टक्कयांपेक्षा जास्त पाहिजे)
 • YCM ची एन्ट्रांन्स एक्झाम दिलेली असली तर उत्तम. (YCM प्रवेश परिक्षेची फि फक्त 500 रूपये आहे.)

एक्स्टर्नल MBA हया कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रीया कोणती आहे? | External MBA Information in Marathi

YCMOU व्दारे जर तुम्हाला एक्स्टर्नल एमबीए करायचे असेल तर YCMOU  त्यासाठी प्रवेश परिक्षा घेते. हया प्रवेश परिक्षेची फि 500 रूपये आहे. ही प्रवेश परिक्षा 100 गुणांची असते.

हया प्रवेश परिक्षेचे फॉर्म् कधी सुटतील, परिक्षा कधी होइल हया माहीतीसाठी तुम्ही YCMOU  ची अधिकृत (official) वेबसाईटवर लक्ष ठेवा.

रेगुलर MBA आणि एक्स्टर्नल MBA या मधे कोणता एमबीए कोर्स फायदयाचा ठरेल?

हया प्रश्नाचे उत्तर तुम्ही सध्या काय करत आहात त्यावर अवलंबुन आहे.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments