हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स इन्फॉर्मेशन |Hospital Management Course Information in Marathi

Hospital Management Course Information in Marathi

रुग्णालय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम छोटी-मोठी रुग्णालये डॉक्टर, नर्सेस, कंपाउंडर इंजेक्शन, औषधी इत्यादी चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात. आजच्या काळात याची अत्यंत आवश्यकता आहे. रुग्णालय म्हणजे जणु जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. श्रीमंता पासून गरिबा पर्यंत सगळ्यांनच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.

आता आपण हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स इन्फॉर्मेशन विषयी माहिती पाहूया.

हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स म्हणजे काय?

हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटल मध्ये डॉक्युमेंट्स मॅनेजमेंट, अकाउंटिंग, रेकॉर्ड मॅनेजमेंट, हॉस्पिटल संबंधी बँकेची कामे, ऑफिसची कामे इत्यादींसाठी तज्ञ लोकांच्या पथकांची आवश्यकता असते. ही सर्व कामे योग्य पद्धतीने आणि पूर्ण आत्मविश्वासाने अत्यंत आवश्यक असते.

आणि हे काम आपण हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्सच्या प्रशिक्षणातून योग्यरित्या शिकु शकतो. हा एक अल्प कालावधीचा आणि परवडणारा कोर्स आहे. वैद्यकीय क्षेत्रात या कोर्समुळे चागली नोकरी मिळण्यास मदत होते.

हा कोर्स करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

हा कोर्स करण्यासाठी कोणतेही फिल्ड मधून १२ वी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण हवा आणि पदवीधर.

संगणक ऑपरेटिंग आणि इंटरनेट विषय ज्ञान हवे

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या कोर्स विषयी मनापासून आवड आणि करण्याची जिद्द असायला हवी.

हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स करण्याचे प्रकार

  1. बॅचलर कोर्स
  2. मास्टर कोर्स
  3. डिप्लोमा कोर्स
  4. पीजी डिप्लोमा
  5. डॉक्टर डिग्री
  6. सर्टिफिकेट कोर्स

१. बॅचलर कोर्स :- हा कोर्स तीन वर्ष पूर्ण वेळ आहे. याचे 6 सेमिस्टर मध्ये विभागणी केली आहे. . या कोर्सची फी ८००० ते ५ लाखापर्यंत आहे पण कॉलेज कोणता आहे त्यावर डिपेंड आणि विद्यार्थ्यांच्या एंट्रन्स एक्झाम च्या मार्कांवर अवलंबून आहे. या कोर्ससाठी विद्यार्थ्याला बारावीत 50 टक्के तरी असायला पाहिजे. या कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थी सीईटी उत्तीर्ण हवा. काही महाविद्यालये थेट बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात.

२. मास्टर कोर्स – हा कोर्स दोन वर्षाचा आहे आणि 4 सेमिस्टर मध्ये विभागला आहे. या कोर्सची फी १ ते ७ लाखापर्यंत आहे. या कोर्ससाठी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन मध्ये 50% हवे. या कोर्ससाठी विद्यार्थी CET, CAT XAT, MAT आणि GMAT उत्तीर्ण हवा. विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण असेल तर ऍडमिशन लवकर होते.

३. डिप्लोमा कोर्स – हा 1 वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सची फी 40,000 ते १ लाखापर्यंत आहे. या कोर्स साठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण हवा.

४. पीजी डिप्लोमा – हा कोर्स दोन वर्षांचा पूर्णवेळ कोर्स आहे. या कोर्ससाठी ग्रॅज्युएशन ५० टक्क्यांनी उत्तीर्ण व्हावे. या कोर्से अडमिशन एट्नस एक्झाम बेसवर होते.

५. डॉक्टरेट डिग्री – हा कोर्स तीन वर्षांकरिता आहे. या कोर्सची फी २००० ते ३ लाखापर्यंत आहे. कोर्स एडमिशन मेरिट लिस्ट/CET बेसिस वर होते. एंट्रन्स पास झाल्यावर विद्यार्थ्याला पर्सनली कॉल करून इंटरव्यू साठी बोलावले जाते व नंतर ऍडमिशन होते.

६. सर्टिफिकेट कोर्स – भरपूर इन्स्टिट्यूटमध्ये सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स तीन तास ते 14 महिन्यांचा आहे पण तो इन्स्टिट्यूट वर निर्भर आहे. काही ठिकाणी हा कोर्स ऑनलाईन सुद्धा आहे आणि या कोर्सची फी २५,००० ते ५०,००० पर्यंत असू शकते.

हॉस्पिटल मॅनेजमेंट साठी सर्वात चांगले इन्स्टिट्यूट कोणते?

  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इन दिल्ली.
  • बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पिलानी, राजस्थान.
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई.
  • इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, न्यू दिल्ली.

इत्यादी कॉलेज देखील हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्ससाठी उत्तम आहेत.

माझ्यासाठी योग्य कारकीर्द आहे का?

या क्षेत्रात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी आपल्याकडे सेवा भीमुक मन आणि सतत काम करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या अत्यंत तान ग्रस्त वातावरणामध्ये आरामशीर राहण्यास आपल्याकडे उच्च भावनिक पातळी असावी.

इतर आवश्यक कौशल्य – कामाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, कामाचे दाब हाताळण्याची क्षमता यांचा समावेश आहे.

नोकरीची संधी आहे का?

आरोग्य सेवेचे महत्त्व कधीच कमी होत नाही आणि आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची संख्याही कधी कमी होत नाही. ती दिवसेंदिवस वाढत जाते. भारतात अडीच लाखाहून अधिक आरोग्यसेवा संस्था आहेत जेथे सर्वोत्तम हॉस्पिटल आहे.

भारतात उच्च व्यवसायिक आणि वाढत्या गरजेमुळे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स चे महत्व वाढले आहे. देशभरात सर्वसामान्यांना उत्तम दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी या कोर्सचे मागणी सर्वात अधिक होते.

अलीकडच्या काळात भारतात आरोग्यसेवा संकल्पनेत बरेच बदल झाले आहेत .आज काल लोक आरोग्य सेवेचे महत्त्व फार समजू लागले आहे.

लोकांची उच्चप्रतीची वैद्यकीय सेवा आणि सुविधांची मागणी सतत वाढत आहे. त्यामुळे हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स अशी पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गरज भासत आहे.

देशातील ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सेवा देण्यासाठी भारत सरकार विशेष आणि अथक प्रयत्न करत आहे. रुग्णालय आणि व्यवस्थापकांची मागणी वाढतच आहे.

महत्त्व

रुग्णालये, दवाखाने, पुनर्वसन केंद्रे आणि इतर वैद्यकीय आस्थापने कडे आजारी व पिडीत लोक मोठ्या आशेने पाहतात. इतर कोणत्याही व्यवसाया प्रमाणेच वैद्यकीय आस्थापने ही संघटना संस्था आहे. या संस्था त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत जटिल कार्यपद्धती पाहतात. त्यासाठी त्यांना नेहमीच एक कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.

भारतातील हॉस्पिटल औद्योगात लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाची संबंधित हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स ची मागणी जास्त वाढ झालेली आहे.

हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स केल्यानंतर आपण आपल्या जीवनाचे दोन उद्दिष्ट साध्य साधे करतो जसे की चांगले वेतन आणि मानवतेची सेवा दोन्ही एकत्रित.

अशाप्रकारे आपण हॉस्पिटल मॅनेजमेंट कोर्स विषयी माहिती पाहिली.

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments