नमस्कार मित्रानो तुमचं स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा विषय आहे सीए. चला तर मग जाणून घेऊ नक्की असत तर काय हे सीए म्हणजे .
CA म्हणजे नक्की काय ?
१९४९ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट (ICAI) ही चार्टर अकाउंटंट अॅक १९४९ ने प्रस्तापित झाली . भारतातील सर्व सीए हे ICAI चे मेंबर असतात.
खूप विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असेल की CA नक्की करायच तरी कोणत्या कॉलज मध्ये करायचा . तर CA हा
कोर्स करण्या साठी तुम्हाला ICAI या CA च्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यावा लागतो . सीए कोणतीही कॉलेज मध्ये मिळणारी पदवी नाही .
CA फाऊंडेशन
जर तुम्ही बारावी पास आसल तर तुम्ही सीए फाऊंडेशन परीक्षेला प्रवेश घेऊ शकता . आता तुमचा मनात प्रश्न आला असेल की मी जर कॉमर्स ने बारावी नसेन केली तर काय. जरी तुम्ही कोणत्या शाखेतून बारावी पूर्ण केली असेल तरी तुम्ही सीए ला प्रवेश घेऊ शकता.
सी ए फाऊंडेशन मध्ये तुम्हाला चार पेपर द्यायचे असतात.
1) Accounts (100)
2) Business Economic (60) and Businesses Commercial Knowledge (40)
3) Business Law (60) and English(40)
4) Math’s (40) + Statistics (40) + Reasoning (20)
सीए फाऊंडेशन ही परीक्षा एक प्रवेश परीक्षा आहे. सीए फाऊंडेशन मध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण मिळालेल्या गुणातून वाजा केले जातात .
सीए फाऊंडेशन पास होण्या साठी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये प्रत्येकी ४० गुण व चार पेपर चे मिळून २०० गुण झाले पाहिजे. सीए फाऊंडेशन परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणारे १० मुलांना ऑल इंडिया रँक यादीत जागा मिळते .
CA इंटर
सीए फाऊंडेशन पास झाल्यावर तुम्ही सीए इंटर मध्ये प्रवेश मिळतो. या मध्ये आठ पेपर असतात हे आठ पेपर दोन ग्रुप मध्ये विभाजित केले आहेत .
सीए इंटर चे पेपर हे लेखी स्वरूपात असतात. ते पास होण्या साठी तुम्हाला प्रत्येक ग्रुप मध्ये २०० गुण मिळवणे गरजेचे आहे व प्रत्येक पेपर मध्ये ४० गुण.
तुम्ही सीए इंटर परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला तीन वर्षं प्रॅक्टिकल ट्रेनिंग ( आर्टिकल शिप ) करावी लागते .
नंतर तुम्ही सीए फायनल मध्ये प्रवेश घेण्यासाठी पत्र होता.
CA फायनल
सीए फायनल मध्ये देखील दोन ग्रुप आणि आठ पेपर असतात.
त्यांचेही उत्तीर्ण होण्यासाठी नियम इंटर परीक्षे सारखेच आहेत.
सीए फायनल परीक्षा पास झाला नंतर तुम्ही तुमच्या नाव समोर सीए लावू शकता.
सीए खरच अवघड असतं का 🤔
तुम्ही हे देखील ऐकलं असेल की CA खूप अवघड असते . खूप वर्ष लागतात सीए परीक्षा पास होण्यासठी .
असे का म्हंटले जाते त्याच कारण आहे दर वर्षी पास होणाऱ्या मुलांची टकेवरी खूप कमी आहे.
- सीए फाऊंडेशन मध्ये ३५ – ४० टके आहे.
- सीए इंटर मध्ये २० – २२ टके आहे.
- सीए फायनल मध्ये १८ – २० टके आहे.
अस असेल तर प्रामाणिक पणे आभ्यास केला तर उत्तीर्ण होणे खूप सोपे आहे. तुम्ही विचार करत असाल की ग्रॅज्युएशन पास होण्या इतके . पेपर आधी एकदिवस अभ्यास करून पास होऊ शकतो . तर नाही तुम्हाला दररोज अभ्यास करावा लागेल तोही प्रामाणिक पने .
तुम्हाला विचलित करणाऱ्या गाष्टीन पासून लांब राहावे लागेन. स्मार्ट फोन , सोशल मीडिया यांचा वापर फक्त काम पुरता केला की तुम्हाला अभ्यास साठी अधिक वेळ मिळेल . तुमची सीए उत्तीर्ण होण्याचे मार्गाच्या आधिकं जवळ जाल.
सीए नक्की करतात काय 🤵
सीए पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकतात. एकाद्या मोठ्या कंपनीत सीएफओ, मॅनेजर अशा मोठया पोस्ट वर काम करू शकतात . ते शिक्षक देखील होऊ शकतात . ते मोठं मोठ्या कंपनीत “Tax Advisor” म्हणून काम करू शकतात.
पगार किती मिळतो 💰
सुरवातीला नवीन असताना तुम्हाला सरासरी ७ ते ८ लाख पर्यंत वार्षिक पॅकेज मिळेल. काहींना १८ – २० लाख पगार देखील काही कंपन्या देतात.
आणि नंतर म्हणाल तर जसा तुमचा अनुभव वाढत जातो तसे तुमचे पॅकेज वाढते त्याला कोणतीही मर्यादा नाही.
ग्रॅज्युएशन नंतर सीए
तुमचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर तुम्ही डायरेक्ट सीए इंटर मध्ये प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन कॉमर्स शाखेतून पूर्ण केलेले असावे व तुम्हाला ५५ टके असणे गरजेचे आहे. तुम्हाला सी ए इंटर परीक्षा देण्या आधी ९ महिने आर्टिकल शिप पूर्ण करावी लागेल.
व सीए इंटर परीक्षा देऊ शकता बाकीचे सर्व सारखेच असते बारावी नंतर प्रवेश घेतलेल्या मुलानं सारखे.
अधिक जाणून घ्या
काय असत कॉस्ट अकाउंटिंग (Cost accounting) || CMA म्हंजे नक्की असतं तरी काय
तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट करून विचारु शकता मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
आम्हाला फॉलो करा -

जय विजय काळे
नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.
आम्ही तुम्हाला परीक्षेच्या तारखा, निकालाच्या तारखा यासारख्या शिक्षणाबद्दल अपडेट देऊ. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर आमच्याशी कनेक्ट व्हा!