नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी | Nursing course Information in Marathi

Author: जय विजय काळे | Updated on: ऑक्टोबर 17, 2023
नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी
नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी

सध्या भारतात मेडिकल आणि paramedical चे महत्व खूप वाढले आहे. त्या मुळे मेडिकल आणि नर्सिंग शिकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.  भारतात नर्सिंगचे विविध कोर्स उपलब्ध आहेत. ह्या आर्टिकल मध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी मध्ये (Nursing course information in Marathi).

10 वी नंतर नर्सिंग अभ्यासक्रम | दहावी नंतर नर्सिंग कोर्स डिटेल्स मराठी

दहावी नंतर नर्सिंग कोर्स करण्यासाठी तुम्हाला अकरावी मध्ये प्रवेश घ्यावा लागेल. दहावी नंतर नर्सिंग कोर्स नर्सिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही अकरावी Science मध्ये प्रवेश घ्यावा. काही नर्सिंग कोर्स तुम्हाला बारावी आर्टस् नंतर किंवा बारावी कॉमर्स नंतर देखील करता येतात. पण जर तुम्ही 12वी Science नंतर कोणत्याही नर्सिंग कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

खालील इन्फोग्राफमध्ये भारतात उपलब्ध असलेल्या सर्व नर्सिंग कोर्सची यादी दिली आहे.

Nursing course information in marathi

बारावीनंतर करावयाचे नर्सिंग कोर्स (Nursing course information in Marathi )

नर्सिंग ला प्रवेश घेण्यासाठी जरी तुम्ही सायन्स शाखेतून १२ वी केलेली नसेल आणि कॉमर्स नाहीतर आर्ट्स मधून १२ वी केली असेल तरी तुम्ही १२ वी नंतर नर्सिंग कॉलेज ल प्रवेश घेऊ शकता. बऱ्याच वेळा विद्यार्थ्याना १० वी ला टक्केवारी कमी असल्या कारणाने सायन्स विभागात प्रवेश मिळत नाही. मग त्या वेळी जरी तुम्ही सायन्स शाखेतून १२ वी केलेली नसेल तरी सुद्धा आर्ट्स आणि वाणिज्य विभागातून तुम्हाला १२ वी नंतर नर्सिंग डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक) 

ज्या विद्यार्थ्यांनी 10 + 2 दरम्यान विज्ञान शाखा निवडली आहे फक्त तेच विद्यार्थी बी. एस्सी. नर्सिंग करू शकतात. 10 + 2 सायन्स दरम्यान, विद्यार्थ्यांनी Physics, Chemistry, Biology व English विषय घेणे बंधनकारक आहे.

हा कोर्से 4 वर्षात पूर्ण होतो. B.sc नर्सिंग शिकत असताना विद्यार्थी मेडिकल विषयी सुद्धा बऱ्याच गोस्टि शिकतात.

बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक) पात्रता:

बी. एस्सी. (पोस्ट बेसिक)

ह्या कोर्सेला Admission घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे १०+२ Science किंवा Arts मध्ये करणे गरजेचे आहे. याबरोबर GNM पूर्ण असणे आवश्यक आहे व विद्यार्थी State Nurse Registration Council मध्ये नर्स म्हणून रजिस्टर असणे आवश्यक आहे. हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.

ANM नर्सिंग 

ज्या विद्यार्थीनी कला आणि वाणिज्य शाखेतून १२ वी केली आहे आणि त्यांना नर्सिंग चा कोर्स करायचं आहे त्यांना हा कोर्स उत्तम पर्याय आहे. ह्या कोर्स चा कालावधी २ वर्षाचा आहे. आणि हा डिप्लोमा कोर्स आहे. तुम्ही या नंतर जॉब करण्यास पात्र आहात, परंतु जर या नंतर पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही GNM ला सुद्धा अॅडमिशन घेऊ शकता.

GNM नर्सिंग 

हा कोर्स देखील १२ वी आर्ट्स आणि कॉमर्स विभागातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना खूप चांगला ऑप्शन आहे. GNM नर्सिंग ह्याचा कालावधी एकूण ३ वर्षाचा आहे. हा कोर्स पूर्ण झाला की याची डिग्री मिळते. आणि तुम्ही चांगल्या जॉब साठी पात्र होता. नुसतेच ANM नर्सिंग करून डिप्लोमा चे प्रमाणपत्र मिळते परंतु जर तुम्ही GNM नर्सिंग केला तर तुम्हाला डिग्री मिळेल तुमच्या क्षेत्रातील संधि तुम्हाला जास्त प्राप्त होतील.

GNM नर्सिंग कोर्स नंतर काय पर्याय आहेत?

पदवीनंतर करावयाचे नर्सिंग कोर्स

M.Sc नर्सिंग

या कोर्से मध्ये तुम्हाला B.sc नर्सिंग आणि बाकी कोणत्याही नर्सिंग निगडीत महाविद्यालची डिग्री मिळाली की या साठी तुम्ही पात्र होतात. आणि तुम्हाला कमीतकमी ५५% गुण प्राप्त असणं यात गरजेचे असते. तुम्ही सरकारमान्य महाविद्यलयातून डिग्री घेऊन यूनिवर्सिटी ला प्रवेश घेण्यास पात्र होतात. ह्या कोर्सचा कालावधी २ वर्षाचा आहे. M.Sc नर्सिंग या कोर्स ची सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की बी. एससी नंतर लगेच कमीतकमी १ वर्ष तरी तुम्ही प्रॅक्टिस करण गरजेचे आहे, तसेच तुमच्या कडे State Nursing Registration Council च्या यादी मध्ये तुमचे नाव नोंदणी असणे गरचेचे आहे अन्यथा तुम्ही या कोर्स साठी पात्र राहत नाही.

M.Phil नर्सिंग

जर तुम्हाला या कोर्स ल प्रवेश घ्याची असेल तर याची अट अशी आहे की तुम्ही INC ने मान्यता दिलेल्या कोणत्याही यूनिवर्सिटी कडून M.sc नर्सिंग ची डिग्री घेऊन त्यात तुम्हाला कमीतकमी ६०% गुण असलेच पाहिजेत. अन्यथा तुम्ही या कोर्सला प्रवेश घेण्यास पात्र राहत नाही. आणि ह्या कोर्स चा  कालावधी १ ते २ वर्षाचा आहे. यात सुद्धा दोन प्रकार आहेत, जर विद्यार्थी M.Phil. फूल टाइम करत आहे तर १ वर्ष आणि जर पार्ट टाइम कर आहे तर २ वर्षाचा कालावधी लागतो

नर्सिंग कोर्से केल्यावर मला कोणते काम भेटतात?

तुम्ही तुमची पदवी व्यवस्तीत पूर्ण केल्या वर तुम्हाला १ ते २ वर्षाची प्रॅक्टिस करणे बंधनकारक आहे. त्या नंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या नोकरी च्या संधि मिळतात. कारण हॉस्पिटल मध्ये नर्स अनेक प्रकारच्या असतात. ज्या पोस्ट च्या नर्स तुम्ही आहात साधारण तसा पगार  तुम्हाला त्या पोस्ट साठी  मिळतो.

सर्जिकल नर्स

या नर्स चे सगळ्यात महत्वाचे काम असते की operation च्या आधी आणि operation नंतर डॉक्टर ला assist करण. तसेच रुग्णाची काळजी घेणं.  त्यांना वेळच्या वेळीच मेडिसिन पुरवण. या काही महत्वाच्या जवाबदऱ्या असतात. आणि त्यांचा पगार हा साधरण ६ ते ७ लाख वर्षाला असू शकतात.

ICU  नर्स

आयसीयू नर्स रुग्णाची आयसीयू मध्ये काळजी घेते. शक्यतो अपघात झालेल्या केसेस मध्ये आयसीयू नर्स चे काम खूप महत्वाचे असते. त्या वेळी रुग्णांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचे असते. त्यांना त्या वेळी धीर देना सगळ्यात महत्वाचे असते. आयसीयू नर्स चा साधारण पगार २ -३ लाख वर्षाला असू शकतो.

स्कूल नर्स 

स्कूल नर्सेस शाळेत काम करतात. स्कूल नर्स शाळेतील मुलांची काळजी घेतात. ते त्यांचे सगळ्यात महत्वाचे काम असते. आणि लहान मुलांची नीट काळजी घेणं ही त्यांच्या वर मुख्य जवबदरी असते. त्यांना साधारण २ -३ लाख वर्षाला मिळू शकतात.

Emergency नर्स

Emergency नर्स दवाखान्यातल्या emergency रूम मधल्या केसची काळजी घेतात. या नर्स अॅक्सिडेंट, किव्हा बाकी काही गंभीर प्रसंग शांत पणे हॅंडल करून हॉस्पिटल चे वातावरण शांत करण ही मोठी जाबदरी असते. तसेच या वॉर्ड मधील रुग्णाची काळजी घेणे महत्वाचे काम असते. त्यांना साधारण पगार हा २ -२.५  लाख वर्षाला असू शकतो.

पेडिऍट्रिक नर्स 

पेडिऍट्रिक नर्स पेडिऍट्रिक दवाखान्यात काम करतात. गोळ्या लिहून देना त्यांची हिस्टरी लिहून doctor ल देना ही कामे त्यांना असतात.  

लेबर – डिलिव्हरी नर्स

ह्या नर्स लेबर – डिलिव्हरी नर्स स्त्रियांना लेबर आणि डिलिव्हरीच्या वेळेस मदत करतात.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: