BMM कोर्स माहिती | BMM Course Information in MarathiBMM कोर्सबद्दल थोडक्यात माहिती:

BMM हा एक पदवीधर कोर्स आहे. (undergraduate course)

बारावी नंतर हा कोर्स करता येतो. कोणत्याही शाखेतून बारावी झालेली असली तर BMM कोर्सला प्रवेश घेता येतो.

कोर्सचा कालावधी ३ वर्ष इतका आहे. BMM कोर्स सेमिस्टर पॅटर्न कोर्स आहे, ३ वर्षाच्या ह्या कोर्समध्ये ६ सेमिस्टर्स आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना मीडिया मध्ये काम करायचे आहे ते विद्यार्थी BMM कोर्स करू शकतात.

BMM कोर्स तुम्हाला वृत्तपत्र, TV, रेडिओ आणि इंटरनेट बद्दल शिक्षण देते. कोर्स करतांना तुम्हाला journalism, advertising, reporting, इ., गोष्टींबद्दल शिकवले जाते.

कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही कोणत्याही TV चॅनेल मध्ये, वृत्तपत्रामध्ये, वेबसाईटसाठी काम करू शकतात.

BMM कोर्सला  प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?

BMM कोर्सला बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. काही कॉलेज प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षादेखील घेऊ शकता.

BMM कोर्सला प्रवेश घेण्यासाठी –

 • तुमची कोणत्याही शाखेतून बारावी झालेली पाहिजे.
 • तुम्हाला बारावीमध्ये किमान ५०% गुण  असणे आवश्यक आहे.
 • काही कॉलेज प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकता

शक्यतो तुम्हाला बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल पण काही कॉलेज प्रवेश परीक्षा घेतात.

त्यामुळे ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज प्रवेश परीक्षा घेते कि नाही याची माहिती आधी काढून घ्यावी.

BMM कोर्सची प्रवेश  प्रक्रिया काय आहे?

बारावीचे परिणाम घोषित झाल्यावर कॉलेज BMM कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया चालू करतील.

जर तुमचे कॉलेज बारावीच्या आधारे प्रवेश देत असेल तर प्रवेश प्रक्रिया अशी असेल –

 • कॉलेज प्रवेश प्रक्रिया चालू करेल
 • तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचा प्रवेश फॉर्म जमा करणे
 • कॉलेज मेरिट लिस्ट जाहीर करेल
 • मेरिट लिस्टमध्ये नंबर लागल्यास फी भरून प्रवेशाची पुष्टी करून घेणे
हे देखील वाचा:  BBI कोर्सची माहिती | BBI Course Information in Marathi

जर तुमचे कॉलेज प्रवेश परीक्षा घेत असेल तर –

 • प्रवेश परीक्षेचे फॉर्म सुटतील
 • प्रवेश परीक्षा होईल
 • प्रवेश परीक्षेचे परिणाम जाहीर होतील
 • कॉलेज मेरिट लिस्ट जाहीर करेल
 • जर तुमचा नंबर असेल तर फी भरून प्रवेशाची पुष्टी करून घेणे

*प्रवेश प्रक्रिया तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. कृपया आपल्या कॉलेजच्या वेबसाइटवर प्रवेश प्रक्रिया काय आहे याची खात्री करून घ्या.

BMM कोर्समध्ये काय शिकवले जाते?

BMM कोर्समध्ये तुम्हाला मीडिया क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारे स्किल्स शिकवले जातात.

BMM मध्ये शिकवले जाणारे काही विषय आहेत –

 • Communication skills
 • Mass communication
 • Political concepts
 • Creative writing
 • Advanced computers
 • Advertising
 • Journalism
 • Reporting
 • Agency management
 • Press law and ethics

BMM कोर्स पूर्ण झाल्यावर मला कोणते जॉब/काम भेटतात?

BMM कोर्सनंतर शक्यतो तुम्हाला News Channel, Newspaper, Online Magazines, Websites मध्ये काम भेटतात.

BMM नंतर भेटणाऱ्या काही जॉब प्रोफाइल आहेत –

 • Content writer
 • News anchor
 • Photographer
 • Journalist
 • Event manager
 • Proofreader
 • Sound engineer

BMM कोर्सला स्कोप आहे का?

BMM कोर्सनंतर नोकरीच्या खूप उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

त्यामुळे आपण असे म्हणू शकतो कि मीडिया क्षेत्रात भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

BMM कोर्स पूर्ण झाल्यावर किती पगार भेटतो?

BMM कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये काम भेटते आणि कोणते काम भेटते त्यावर तुमचा पगार अवलंबून असतो.

तरी तुम्ही सुरवातीला ३-३.५ लाख प्रति वर्ष इतका पगाराची अपेक्षा ठेऊ शकता पण हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे जसे तुमच्या कंपनीचा प्रकार, तुम्हाला भेटलेले काम, इ.

मी BMM  कोर्सनंतर MBA करू शकतो का?

MBA कोर्सला कोणता हि पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. BMM हा एक पदवीधर कोर्स असल्यामूळे तुम्ही BMM कोर्स पूर्ण झाल्यावर तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी MBA कोर्स करू शकता.

हे देखील वाचा:  बी कॉम म्हणजे काय? बी कॉम नंतर काय करावे? BCom Course Information in Marathi

Read: (MBA Course Information in Marathi)

BMM नंतर MBA चे काही specializations आहेत –

 • Media Management
 • Social Media
 • Event Management
 • Advertising

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.