BMLT कोर्स बद्दल माहिती | BMLT Course Information in Marathi

BMLT कोर्स काय आहे? (BMLT Course Information in Marathi)

BMLT चा फुल फॉर्म आहे – बॅचलर इन मेडिकल लॅबोरेटरी टेकनॉलॉजि.

BMLT हा ३ वर्षाचा एक पदवीधर कोर्स आहे जो विज्ञान शाखेतील विद्यार्त्यांना त्यांच्या बारावी नंतर करता येतो.

हा कोर्स ३ वर्षाचा असून त्यात ६ सेमिस्टर्स असतात. कोर्सचे ३ वर्ष पूर्ण झाल्यावर ६ महिन्याची इंटर्नशिप करावी लागते.

ज्या विद्यार्थ्यांना लॅब टेक्निशियन व्हायचे आहे ते विद्यार्थी हा कोर्स करू शकता.

BMLT हा DMLT कोर्ससाठी एक चांगला पर्याय आहे. DMLT  हा एक डिप्लोमा कोर्स आहे आणि BMLT हा एक पदवीधर कोर्स आहे.

Related – DMLT Course Information in Marathi

BMLT कोर्सला  प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?

BMLT कोर्सला फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता. जर तुम्ही तुमची बारावी आर्टस् किंवा कॉमर्स शाखेतून केलेली असेल तर तुम्ही BMLT कोर्सला प्रवेश घेऊ शकत नाही. BMLT कोर्स तुम्हाला बारावी science नंतर करता येतो.

BMLT कोर्सला प्रवेश घेण्यासाठी फक्त बारावी विज्ञान शाखेतून केलेली चालत नाही तर तुम्ही बारावी physics, chemistry आणि biology  हे विषय घेऊन केलेली पाहिजे आणि तुम्हाला कमीत कमी ५०% असणे अनिवार्य आहे.

BMLT कोर्सला प्रवेश देण्यासाठी शक्यतो प्रवेश परीक्षेची गरज पडत नाही पण काही कॉलेज प्रवेश देण्यासाठी स्वातंत्र्य प्रवेश परीक्षा घेऊ शकता.

थोडक्यात

– तुम्ही तुमची बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
– तुम्हाला बारावी मध्ये किमान ५०% असणे आवश्यक.
– बारावी मध्ये तुमचे physics, chemistry आणि biology हे विषय असणे आवश्यक.

[snippet]

कृपया लक्षात घ्या की काही महाविद्यालये कोणत्याही प्रवाहातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

[/snippet]

BMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी आहे?

BMLT  कोर्ससाठी शक्यतो प्रवेश मेरिटच्या आधारे होतात. तुमच्या बारावीच्या गुणांवर तुम्हाला BMLT कोर्सला प्रवेश दिला जातो.

तुम्ही कॉलेजला जाऊन ऍडमिशन फॉर्म भरून मेरिट लिस्ट लागल्यावर जर तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल तर कॉलेज फी भरून तुमच्या प्रवेशाची पुष्टी करू शकता.

काही कॉलेज प्रवेश परीक्षा घेऊ शकता. जर तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज प्रवेश परीक्षा घेत असेल तर तुम्हाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल. प्रवेश परीक्षेच्या आधारे मेरिट लिस्ट लागेल.

प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्ही तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजला जाऊन माहिती घेऊ शकता.

BMLT कोर्समध्ये मला काय शिकवले जाते?

BMLT कोर्समध्ये शिकवले जाणार काही विषय आहेत:

  • Muscoloskeletal, Respiratory  and Digestive system
  • Inflammation
  • Cancer
  • Haemoglobin
  • Blood Groups, Blood Count, Blood Banking
  • Human Anatomy
  • Biochemistry
  • Diagnostic Techniques

BMLT कोर्स पूर्ण झाल्यावर मला जॉब भेटेल का?

हो. BMLT कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला जॉब भेटू शकतो.

BMLT कोर्स नंतर भेटणारे काही job profiles आहेत:

  • Medical lab technician
  • Clinical lab technician
  • X-ray technician
  • Lab technologist
  • System analyst
  • Bio chemist

BMLT कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला खालील संस्थाने काम देऊ शकता:

  • सरकारी दवाखाने
  • खाजगी दवाखाने
  • नर्सिंग होम
  • फार्मा कंपनी
  • वेगवेगळ्या लॅब

BMLT कोर्स पूर्ण झाल्यावर मी काय करू शकतो?

BMLT कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही:

  • जॉब करू शकता
  • स्वतःची लॅब चालू करू शकता
  • पुढे शिकू शकता – BMLT कोर्स नंतर शक्यतो विद्यार्थी पुढे शिकायचे असेल तर MMLT (Master of medical laboratory technology) ह्या कोर्सला प्रवेश घेतात.
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा