MSW Course Information in Marathi – पात्रता, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, कोर्स फी आणि बरेच काही

MSW Course Information in Marathi – अभ्यासक्रम, पात्रता आणि भविष्यातील संधी

बी एस डब्ल्यू तर पूर्ण झाले पण पुढे आणखी शिकायची इच्छा आहे? अगदी बरोबर ठिकाणी येऊन थांबले आहात तुम्ही! या जाणून घेऊ या, एम. एस. डब्ल्यू बद्दल! (MSW Course Information in Marathi)

एम. एस. डब्ल्यू. (MSW)  मास्टर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work). समाजातील विविध घटकांचा  ह्या अभ्यासक्रमात समावेश आहे.

MSW अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • कुठल्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून कमीत कमी 50% गुणांसह पदवीची परीक्षा उत्तीर्ण.
  • काही महाविद्यालयात ह्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला बी.एस.डब्ल्यू. मधील पदवी गरजेची आहे.

एम.एस.डब्ल्यू. कोर्स चा अभ्यासक्रम

  • हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असून या साठी परीक्षा 4 सेमिस्टर मध्ये घेण्यात येते.
  • चारही सेमिस्टरला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो.

एम. एस. डब्ल्यू. (MSW) अभ्यासक्रमासाठी लागणारे शुल्क

  • या अभ्यासक्रमासाठी उमेदवाराला जवळपास 1 ते 2 लाखांपर्यंत शुल्क लागू शकते.
  • तसेच उमेदवार कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहात यावर सुद्धा हे शुल्क  अवलंबून असते.

एम. एस. डब्ल्यू. (MSW) अभ्यासक्रमाचा कालावधी

  • या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षाचा आहे.
  • यात 2 वर्षांत विध्यार्थ्यांना 4 सेमिस्टर परीक्षा द्याव्या लागतात.

एम. एस. डब्ल्यू. (MSW) प्रवेश प्रक्रिया

MSW कोर्सला गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिला जातो.

काही महाविद्यालयांत प्रवेशासाठी पूर्व परीक्षा सुद्धा घेण्यात येते तर काही ठिकाणी मुलाखत घेण्यात येते.

परदेशातून एम एस डब्ल्यू (MSW from Abroad)

ज्या उमेदवारांना शक्य आहे ते उमेदवार मास्टर ऑफ सोशल वर्क हा अभ्यासक्रम परदेशातील नामांकित महाविद्यालय किंवा विश्वविद्यालय यातून सुद्धा पूर्ण करू शकतो.

इंग्लंड अमेरिका कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातील महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमासाठी विशेष संशोधनाच्या व इतर सोयी असतात म्हणून सुद्धा बरेच उमेदवार हे शिक्षण बाहेरच्या देशातून घेणे पसंत करतात.

तसेच बाहेरच्या देशातून शिक्षण पूर्ण केली त्याच देशात उमेदवारांना नोकरी लागण्याची शक्यता असते ही बाब लक्षात घेऊन सुद्धा उमेदवार परदेशाकडे आकृष्ट होतात.

बाहेरच्या देशात या अभ्यासक्रमाचा कालावधी 1-3 वर्षे इतका असतो.

एम. एस. डब्ल्यू. अभ्यासक्रमानंतर नोकरीच्या विविध  संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार खाली नमूद केल्या ठिकाणी काम करू शकतो.

  • महिला व बालकल्याण विभाग
  • सामाजिक न्याय आणि रोजगार विभाग
  • मानव संसाधन विभाग
  • सहाय्यक शिक्षक
  • गैर सरकारी संस्थेत (एन.जी.ओ) मध्ये प्रकल्प अधिकारी (Project Officer)
  • गैर सरकारी संस्थेत (एन.जी.ओ.) व्यवस्थापक
  • सामाजिक कार्यकर्ता इ.

मग प्रश्न उरतो कि ह्या अभ्यासक्रमासाठी काही विशेष गुण / कौश्यल्य ह्याची गरज आहे का?

ह्याचे उत्तर  हो असे आहे. आणि हि कौशल्ये अशी आहेत –

  • ह्या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारा जवळ काही विशेष गुण असणे आवश्यक असते, जसे तो ज्या भागात काम करणार असेल त्या भागातील सामाजिक समस्यांची जाणीव, उत्तम सम्पर्क कौशल्य, लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य, सहनशीलता, समन्वय साधण्याची क्षमता, सामोपचार, भावनिक प्रगल्भता,परानुभूती वगैरे.
  •  कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला हीच कौशल्य आवश्यक असतात परंतु एम एस डब्ल्यू झालेल्या उमेदवाराकडून या सर्व गोष्टींची जास्त अपेक्षा केली जाते कारण कुठल्यातरी एका विषयात तो प्रावीण्य संपादन करत असतो.

पुढील शिक्षण

उमेदवार मास्टर्स डिग्री नंतर संशोधन करून पुढील शिक्षणाचा भाग म्हणून पीएचडी करू शकतात. पण पीएचडी साठी त्यांना खालील परीक्षांना बसावे लागते. यूजीसी नेट, सी एस आय आर जे आर एफ, गेट व स्लेट च्या माध्यमातून. एचडी पूर्ण होण्यास तीन ते सहा वर्षाचा कालावधी लागू शकतो. साधारणपणे पीएचडी करण्यास रुपये 18,000 ते दोन लाख रुपये इतके शुल्क लागू शकते.

सामाजिक कार्य विषयात एम फिल

मास्टर ऑफ सोशल वर्क हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सामाजिक कार्य विषयात एम फिल करण्याची सुद्धा संधी असते. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असतो. उमेदवाराला नेट ची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.

अभ्यासक्रमाची फी रुपये पाच हजारापासून दोन लाखापर्यंत असू शकते. डब्ल्यू अभ्यासक्रमानंतर समाज कार्य व्यवस्थापनात एम बी ए हे शिक्षण सुद्धा पूर्ण केले जाऊ शकते.

मास्टर ऑफ सोशल वर्क मास्टर ऑफ सोशल वर्क या अभ्यासक्रमाला आल्यानंतर उमेदवाराला अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते कारण फील्ड वर्क ची अपेक्षा या उमेदवारांकडून खूप जास्त प्रमाणात असते.

नोकरी

नोकरीसाठी खुल्या असलेल्या काही मार्गांची सविस्तर चर्चा इथे करणे आवश्यक आहे.

सामाजिक कार्यकर्ता

या ठिकाणी कामाचे स्वरूप म्हणजे अडचणीत असलेल्या समाजातील घटकांना सुविधा, सल्ला व समर्थन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी. व्यक्तीची अडचण ही वैयक्तिक किंवा व्यावसायिक सुद्धा असू शकते. सामाजिक कार्यकर्ता हा समाजातील बऱ्याच दुर्बल घटक आर्थिक भावनिक व सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मदत करतो.

प्रकल्प समन्वयक

या कामासाठी गैर सरकारी संस्था (एन जि ओ) उमेदवारांना कामावर ठेवतात. प्रकल्प समन्वयक गैर सरकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या कामाचे नियोजन, आर्थिक नियोजन आणि देखरेखी च्या कामात मदत करतात. तसेच प्रकल्प समन्वयाचे हे सुद्धा बघणे काम आहे की काम हे ठरवून दिलेल्या चौकटीतच केले जात आहे. त्याचप्रमाणे कामाचे दस्तऐवजीकरण वेळेतच पूर्ण होत आहे याकडेही समन्वयकाला लक्ष द्यावे लागते. समन्वयक संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांच्या संपर्कात राहून ठरवून दिलेले कार्य ठरवून दिलेल्या वेळातच पूर्ण होत आहे याची खबरदारी घेतो.

प्राध्यापक

शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा समन्वयक आला अनेक शाळा किंवा महाविद्यालय या ठिकाणी नोकरीची संधी असते. इतर सर्व कौशल्य बरोबरच विषय मांडण्याची व शिकविण्याची हातोटी उमेदवाराकडून या क्षेत्रात अपेक्षित आहे. तसेच विषयाचे सातत्याने वाचन करून या क्षेत्रात येणाऱ्या सर्व बदलांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याची गरज असते. ही नोकरी करत असताना उमेदवाराला आपले पुढील शिक्षण देखील चालू ठेवता येते.

सध्या देशात सामाजिक कार्याची एक सतत लाट तयार होत असते स्वाभाविकच नोकरीच्या संधीही कितीतरी उपलब्ध असतात. आणि हे आता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. वैद्यकीय क्षेत्र, मानसिक सामाजिक कार्य, मानवी संसाधन प्रबंधन, गुन्हेगारी शास्त्र अशा खुपशा क्षेत्रात या उमेदवारांना वाव असतो.

समाजात कार्य करत असल्यामुळे या सर्व उमेदवारांची सामाजिक ओळख सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बनत असते.

अभ्यासक्रमाचे काठिन्य

या मुद्द्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही प्रकारे दिले जाऊ शकते.

ज्या उमेदवारांनी बीएसडब्ल्यू चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांना या विषयाची व्यवस्थित ओळख असल्याने त्यांना एम एस डब्ल्यू चा कोर्स कठीण जात परंतु जे उमेदवार इतर विषयात पदवी घेऊन मास्टर ऑफ सोशल वर्क करायला येतात त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम थोडा कठीण ठरू शकतो.

पण सामाजिक समस्या ची जाणीव असेल कार्य करण्याची इच्छा असेल तर विषयात गोडी निर्माण होऊन हा अभ्यासक्रम सुद्धा थोडा अधिक अभ्यास करता हाताळला जाऊ शकतो.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या महाविद्यालयात प्रवेश परीक्षा घेतली  जाते त्याची तयारी व विषय या संबंधी माहिती-

प्रवेश परीक्षेसाठी खालील विषय असतात

  • इंग्रजी- प्राथमिक व्याकरण, आकलन, स्पेलिंग, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द
  • तर्क (Reasoning)- समानता, वर्गीकरण, संख्या मालिका, दिशांचे कोडींग डिकोडिंग
  • सामान्य जागरूकता- चालू घडामोडी, नानाविध सामान्य ज्ञान, बातम्या व अलीकडील घटना

लेखी प्रवेश परीक्षेनंतर साधारणपणे प्रवेशासाठी मौखिक परीक्षा पण घेतली जाते.

तर अभ्यासक्रमाप्रमाणेच मास्टर ऑफ सोशल वर्क हा अभ्यासक्रम उमेदवाराने कुठल्या महाविद्यालयातून किंवा संस्थेतून पूर्ण केलेला आहे यावर सुद्धा बरेच वेळा नोकरी मिळण्याची शक्यता अवलंबून असते.

तर ही होती एम. एस.  डब्ल्यू  बद्दल ची मूलभूत आणि निर्णय घेण्यासाठी महत्वाची माहिती. आम्ही आपल्या भविष्यातील प्रयत्नांसाठी ते एमएसडब्ल्यू निवडण्याबाबत असो किंवा आपल्यास अनुकूल असे इतर काहीही क्षेत्र, साठी शुभेच्छा व्यक्त करतो!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments