BA कोर्सची माहिती, पात्रता । BA Course Information in Marathi

Author: जय विजय काळे | Updated on: September 23, 2023

BA कोर्सबद्दल थोडक्यात माहिती (BA Course Information in Marathi):

बारावी नंतर बरेच लोक बीए डीग्री करतात. तर काय आहे ही बीए डीग्री?

मी बीए डीग्री साठी पात्र आहे का? बीए डीग्री पुर्ण करण्यासाठी कीती खर्च येतो? बीए डीग्रीचे स्पेशलाइझेशन काय? अशे काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हे आर्टीकल वाचल्यावर तुमचे ​हया प्रश्नांचे तुम्हाला उत्तर भेटेल.

बीए चा फुल फॉर्म आहे: बॅचलर ऑफ आर्टस् (Bachelor of Arts)

बीए  (बॅचलर ऑफ आर्टस् )  हा 3 वर्षांचा पदवीधर कोर्स आहे. 3 वर्षांत तुम्हाला हया कोर्समध्ये 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक वर्षाला तुम्हाला 2 सेमिस्टर असतात.

बीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधुन बारावी केलेली पाहीजे. बारावीत तुम्हाला कमीतकमी 50 टक्के गुण पाहीजे. राखीव जागांसाठी 5 टक्के सवलत दिली जाते.

बीए कोर्सची फी 5000 रूपये ते 50000 रूपये वार्षिक आकारली जाउ शकते. बीए कोर्सची फी तुम्ही कोणत्या कॅालेजला प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबुन आहे.

बीए कोर्स तुम्ही रेग्युलर पध्दतीने कॉलेज मधुन करू शकता. बीए कोर्स डीस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन लर्निंग मोडचा वापर करून देखील बीए कोर्स पुर्ण केला जाउ शकतो.

बी ए कोर्स कोणत्या पद्धतीने करता येतो?

बीए कोर्स करण्याचे प्रकार आहेत:

  • रेग्युलर  ( कॉलेज मधुन )
  • डीस्टंन्ट लर्निंग  ( YCMOU )
  • ऑनलाइन लर्निंग  ( खुप महाविदयालये ऑनलाइन लर्निंगने बीए कोर्स प्रदान करतात. )

बीए स्पेशलाइझेशन

बीए कोर्सला भरपुर स्पेशलाइझेशन आहेत. त्यातले पसंत केले जाणारे काही स्पेशलाइझेशन आहे:

  • English ( इग्लिश )
  • History(हिस्ट्री  )
  • Sanskrit( संस्कृत  )
  • Philosophy( फीलॉसॉफी  )
  • Journalism(जर्नालिझम  ) 
  • Economics( इकोनॉमिक्स  )
  • Sociology( सोशिओलॉजी  )

BA नंतर काय करावे?

बीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही कंपनी मध्ये जॉब करू शकता किंवा फ्रीलांन्सिंग करून पैसे कमाउ शकता.

बीए कोर्सनंतर भेटणारे काही जॉब आहेत:

  • HR Manager
  • Content Writer
  • Executive Assistant
  • Operations Manager
  • Graphic Designer
  • Computer Operator
  • Customer Service Representative

बीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्ही पुढे शिक्षण पण चालु ठेवु शकता. तुम्ही सर्टीफीकेट कोर्सेस करू शकता, डीप्लोमा कोर्सेस करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करू शकता.बीए झाल्यावर करण्यासाठी पसंत केले जाणारे काही कोर्स आहेत:

  • एमबीए ( एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा दयावी लागते. प्रवेश परीक्षेची तयारी विदयार्थी बीए कोर्सच्या तिस—या वर्षी चालु करतात. )
  • एमए
  • बी.एड
  • एल एल बी

बीए कोर्सला पर्याय:

Read: 12 वी arts नंतर काय

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: