काय असत कॉस्ट अकाउंटिंग (Cost accounting) || CMA म्हंजे नक्की असतं तरी काय || What is Cost accounting || CMA Course information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 30/04/2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझा आणखी एका ब्लॉग मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत कॉस्ट अकाउंटिंग विषयी. नक्की असत तरी काय हे कॉस्ट अकाउंटिंग. कसा घ्यायचा प्रवेश हे सर्व जाणून घेणार आहोत.
photo of person holding pen 1028726

CMA म्हंजे Cost and Management Accountant ही संसदेच्या कायद्यानुसार कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा १९५९ च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था.
CMA मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमचा कडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे बारावी पास झल्यानंतर फाऊंडेशन मध्ये प्रवेश घेणे . व दुसरा पर्याय आहे डायरेक्ट प्रवेश त्याबद्दल आपण खाली सविस्तर रीत्या जाणून घेणार आहोत.

CMA Foundation

जर तुम्हीं बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही CMA फाऊंडेशन ला प्रवेश घेऊ शकता. त्यासाठी तुम्हीं कोणतीही शाखेतून बारावी पूर्ण केली असेल यावर बंधन नाही . ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते जून मध्ये व डिसेंबर मध्ये. तुम्ही ३१ जुलै च्या आगोदर डिसेंबर परीक्षे साठी तर ३१ जानेवारी आगोदर जून परीक्षे साठी प्रवेश घ्यावा लागतो.
तुम्ही प्रवेश इन्स्टिट्यूट च्या चॅप्टर ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ शकता तर  ICMAI  च्या ऑफिसियल संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश घेऊ शकता . फाऊंडेशन परीक्षे साठी तुम्हाला ४००० रुपय प्रवेश फी आहे.

तुम्हाला CMA फाऊंडेशन मध्ये चार पेपर द्यायचे असतात.

Paper 1 Fundamentals of Economics & Management (१०० Mark )

Paper 2 Fundamentals of Accounting (१०० mark)

Paper 3 Fundamentals of Laws and Ethics (१०० mark)

Paper 4 Fundamentals of Business Mathematics & Statistics (१०० mark)

CMA फाऊंडेशन उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपर मध्ये ४० गुण तर . चार पेपर चे मिळून २०० गुण मिळवावे लागतात. CMA फाऊंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही CMA इंटर ला प्रवेश घेऊ शकता.

CMA Inter

फाऊंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंटर ला प्रवेश  मिळतो . किंवा तुम्हीं डायरेक्ट प्रवेश घेऊ शकता त्याबद्दल आपण खाली जाणून घेणार आहोतच .

इंटर मध्ये ही तुम्ही फाऊंडेशन सारख्याच वर्षातून दोन वेळा परीक्षा देऊ शकता. आणि जून परीक्षे साठी तुम्हाला ३१ जनानेवरी आगोदर प्रवेश घ्यवा लागतो तर डिसेंबर परीक्षे साठी ३१ जुलै आगोदर प्रवेश घ्यावा लागतो.
CMA इंटर साठी २०००० रुपये फी आहे ती आपण दोन टप्प्यांत भरू शकतो पहिल्यांदा १२००० प्रवेश घेण्याच्या वेळी व नंतर ८००० रुपये जून परीक्षे साठी तुम्हाला ३१ जनानेवरी आगोदर  भरावे लागतात तर डिसेंबर परीक्षे साठी ३१ जुलै आगोदर भरावे लागतात.

numbers money calculating calculation 3305

इंटर परीक्षेत आठ पेपर हे दोन ग्रुप मध्ये विभागात केले आहेत. फाऊंडेशन परीक्षे सारखेच इंटर परीक्षेत सुधा एक ग्रुप पास होण्यासाठी त्या ग्रुप मध्ये २०० व प्रत्येक विषयात ४० गुण मिळवावे लागतात.
CMA इंटर परीक्षा पास झाल्यावर तुम्हाला फायनल परीक्षा देण्या आधी तुम्हाला १५ महिन्याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग (आर्टिकल शिप) पूर्ण करावी लागते . त्यानंतर तुम्ही फायनल परीक्षे साठी पात्र होता. ICMAI चे सदस्यता मिळवण्या साठी तुम्हाला ३ वर्षाची आर्टिकल शिप पूर्ण करावी लागते. तीन वर्षा पैकी राहिलेली आर्टिकल शिप ही फायनल परीक्षा पास झाल्यावर करावी लागते. जर तुम्हाला सदसत्व नसेल पाहिजे तर तुम्ही फायनल परीक्षे नंतर डायरेक्ट जॉब सुधा करू शकता.

CMA Final

इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही फायनल परीक्षे साठी पात्र होता. फायनल परीक्षे देखील इंटर परीक्षे प्रमाणे दोन ग्रुप व आठ पेपर असतात. त्यांची उत्तीर्ण होण्यासाठीचे नियम देखील सारखेच असतात. फी च म्हणाल तर फायनल परीक्षे साठी तुम्हाला १७००० रुपये फी भरावी लागते . फी भरण्यासाठी ची शेवटची तारीख ही इंटर व फाऊंडेशन परीक्षे सारखीच असते.

फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तुम्ही तुमच्या नावा समोर CMA असे लावू शकता.

person wearing white dress shirt signing contract 955390

CMA डायरेक्ट प्रवेश

जर तुम्हीं कोणतीही शाखेतून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही CMA इंटर  ला प्रवेश घेऊ शकता.
तुम्हाला फाऊंडेशन परीक्षा द्यावी लागणार नाही. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग चे दुसरे वर्ष उत्तीर्ण असाल तर तुम्ही डायरेक्ट CMA इंटर परीक्षेला प्रवेश घेऊ शकता.

Passing Percentage

फाऊंडेशन परीक्षेसाठी ७० ते ७५ टक्के

इंटर परीक्षेसाठी १० ते २० टक्के

फायनल परीक्षेसाठी १२ ते २२ टक्के आहे.

अधिक जाणून घ्या 
CA म्हणजे नक्की काय ? चार्टर अकाउंटंट नक्की करतो काय, कसा प्रवेश घ्याचा
 
कंपनी सेक्रेटरी (CS) असत तरी काय || कसा घ्यायचा प्रवेश || What is CS || CS Course Full Information in Marathi || New Syllabus introduce CSEET

तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट करून विचारु शकता मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Similar

Post Thumbnail

CCC कोर्स माहिती |CCC Course Information in Marathi


Post Thumbnail

कंपनी सेक्रेटरी (CS) असत तरी काय || कसा घ्यायचा प्रवेश || What is CS || CS Course Full Information in Marathi || New Syllabus introduce CSEET


Post Thumbnail

CA कोर्स पात्रता, फी, परीक्षा पॅटर्न | CA Information in Marathi


Popular Posts

Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?