बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर | BSc Agriculture Information in Marathi

Author: जय विजय काळे | Updated on: जुलै 26, 2023

बी.एस्सी. कृषी, ज्याला बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर म्हणूनही ओळखले जाते. हा एक undergraduate पदवी कार्यक्रम आहे जो कृषी विज्ञानाच्या विविध पैलूंवर आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला “BSc Agriculture Information in Marathi” बद्दल जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आहात. या लेखात, मी तुम्हाला BSc Agriculture कोर्सला कोण प्रवेश घेऊ शकता, कोर्सला प्रवेश कसा घ्यायचा, त्यासाठी किती खर्च येतो, तुम्ही कशाचा अभ्यास कराल, तुम्हाला कोणत्या नोकऱ्या मिळू शकतात आणि तुमची पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही काय करू शकता याबद्दल सर्व महत्त्वाची माहिती देईल.

कोर्सबद्दल थोडक्यात | BSc Agriculture Information in Marathi

भारत हा कृषि प्रधान देश आहे. बरेच विद्यार्थी करिअर निवडत असताना BSc Agriculture हा कोर्स निवडता. BSc Agriculture हा अनेक उप शाखान मध्ये विस्तारित कोर्स आहे जो तुम्हाला उत्तम क्षमतेचे करिअर मिळऊन देण्यास समर्थ आहे. BSc Agriculture हा कोर्स अन्नधान्य उत्पादन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास, पर्यावरणीय आरोग्य अशा अनेक बाबींशी संबंधित क्षेत्रात विस्तारला आहे.

अभ्यासक्रमाचे नाव BSc Agriculture
अभ्यासक्रमाचा प्रकार बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर
पात्रता निकषविज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण
प्रवेश कसा होतोMHT CET स्कोअरवर आधारित
अभ्यासक्रम कालावधी४ वर्षे (८ सेमिस्टर)
BSc Agriculture Information in Marathi
BSc Agriculture Information in Marathi

BSC Agri प्रवेश पात्रता

B.Sc Agriculture साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांना खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे –

अभ्यासक्रम कालावधी

बीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर चा  अभ्यासक्रम हा आठ सेमेस्टरमध्ये विभागलेला आहे. चार वर्षांच्या कार्यक्रमाचे उद्दीष्ट संबंधित ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि शेतीत कौशल्य प्रदान करणे असते. ही पदवी विद्यार्थ्यांना कृषी उद्योग आणि इतर संबंधित उद्योगांशी संबंधित विविध कारकीर्दसाठी तयार करते.

BSc Agriculture मधील अभ्यासक्रम व विषय

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्सचा अभ्यास करणारा विद्यार्थी अ‍ॅग्रोनॉमी, माती विज्ञान, फलोत्पादन (फळ विज्ञान आणि भाजीपाला), वनस्पती प्रजनन व अनुवंशशास्त्र, कीटकशास्त्र, वनस्पती पॅथॉलॉजी, पशु विज्ञान, विस्तार शिक्षण, वनस्पती जैव रसायनशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, मूलभूत बायोटेक्नॉलॉजी अशा विविध विषयांचा अभ्यास करतात. BSc Agriculture ही पदवी विद्यार्थ्याला ज्ञान-कौशल्ये प्रदान करून सुसज्ज करते.

BSc Agri मध्ये सामान्यत: शेतीशी संबंधित मुख्य विषय, तसेच निवडक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक प्रशिक्षण यांचा समावेश असतो. कोर्स ऑफर करणार्‍या विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या आधारावर विशिष्ट विषय बदलू शकतात, परंतु येथे काही सामान्य विषय आहेत जे तुम्हाला BSc Agri चा पाठपुरावा करताना आढळू शकतात –

बीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर नंतर करिअर स्कोप व नोकरीच्या संधी

Bsc Agri पदवीधर सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी शोधू शकतात. Bsc Agri पदवीधरांना सरकार तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांना कृषी विकास अधिकारी (एडीओ) आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) म्हणून नियुक्त करता येते. त्याच बरोबर खाली दिलेल्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत –

बीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर नंतर उच्च शिक्षणा साठी संधी

कृषी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ( मास्टर डिग्री ) अभ्यासक्रमा साठी प्रवेश घेणे सहज शक्य आहे ज्यामुळे कृषीशास्त्र, माती विज्ञान, फलोत्पादन, वनस्पती प्रजनन व अनुवंशशास्त्र, कीटकशास्त्र, वनस्पती पॅथॉलॉजी, प्राणी विज्ञान, विस्तार शिक्षण, वनस्पती जैव रसायनशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी इ. विविध कृषी कार्यक्रमात एमएससी हा २ वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

त्यासाठी तुम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कृषी / बागायती / वनीकरण या विषयात बीएससी पदवी प्राप्त करवून घ्यावा लागेल.

भारतीय विद्यापीठातून किंवा परदेशात पदव्युत्तर पदवी ( मास्टर डिग्री ) मिळविण्यामुळे कृषी क्षेत्रात अधिक नोकरीचे मार्ग खुले होतील.

शकता.

लेखक - जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

Recommended Reads: