एमबीबीएस म्हणजे काय? | MBBS full form in Marathi

तुम्ही बराच वेळा एमबीबीएस हा शब्द ऐकला असेल. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर डॉक्टर च्या नावासमोर एमबीबीएस हा शब्द असतो. परंतु तुम्हाला एमबीबीएस म्हणजे काय? आणि MBBS full form in Marathi म्हणजे काय माहिती आहे का?

या लेखात आपण सखोलपणे MBBS म्हणजे काय ते पाहूया.

MBBS Full Form in Marathi
MBBS Full Form in Marathi

MBBS full form in Marathi

MBBS चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Bachelor of Medicine and Bachelor of Surgery” असा होतो.

एमबीबीएस हा ५.५ वर्षांचा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम आहे. डॉक्टर बनण्याची इच्छा असलेले अनेक विद्यार्थी सरकारी किंवा नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सला प्रवेश घेऊ इच्छितात.

MBBS म्हणजे काय?

एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध पदवी आहे. एमबीबीएस हा course पूर्ण करण्यासाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो.

तुम्ही एमबीबीएस कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या नावासमोर डॉ. लावू शकता. नावासमोर डॉ. हे कोणीही लावू शकत नाही.

एमबीबीएस केलेला विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये काम करू शकतो किंवा स्वतःचे वैयक्तिक हॉस्पिटल देखील उभारू शकतो.

MBBS ची प्रवेश परीक्षा

एमबीबीएस या वैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना NEET ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळतो.

एमबीबीएस या कोर्सचा कालावधी साधारणता 5.5 वर्षाचा असतो. ज्यामध्ये 4.5 वर्ष एमबीएचे शिक्षण दिले जाते तर एक वर्ष ही इंटर्शिप असते.

MBBS साठी आवश्यक पात्रता

एम बी बी एस या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  1. MBBS साठी प्रवेश घेण्याकरता बारावी सायन्स या शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. तुम्हाला बारावी सायन्समध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. OBC/SC/ST साठी तुम्हाला 12वी विज्ञानात किमान 40% गुण आणि PwD उमेदवारांना 12वी विज्ञानात किमान 45% गुण असणे आवश्यक आहे.
  3. MBBS साठी कमीत कमी सतरा वर्षे असणे गरजेचे आहे. एमबीबीएस कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.
  4. याव्यतिरिक्त एमबीबीएस या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET या परीक्षेमध्ये पास होणे आवश्यक आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

एमबीबीएस कोर्स किती वर्षांचा आहे?

एमबीबीएस अभ्यासक्रमाचा कालावधी ५.५ वर्षे आहे.

मी NEET शिवाय MBBS करू शकतो का?

तुम्ही भारतात NEET शिवाय एमबीबीएसला प्रवेश घेऊ शकत नाही.

एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी आहे का?

नाही, एमबीबीएस ही एमबीबीएसमधील सर्वोच्च पदवी नाही.

MBBS ला प्रवेश घेण्यासाठी मला 12वी मध्ये कोणत्या विषयांची आवश्यकता आहे?

एमबीबीएससाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला पीसीबी विषयांसह विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एमबीबीएससाठी सर्वात जास्त पसंतीचे पर्याय कोणते आहेत?

एमबीबीएससाठी सर्वाधिक पसंतीचे पर्याय आहेत: BDS, BAMS, , BHMS, BUMS, BPT, BYNS.

तर मित्रांनो! “एमबीबीएस म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.