SSC म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही SSC हे नाव नक्कीच ऐकून असाल. आपण नेहमी इंटरनेट वरती एस एस सी म्हणजे काय किंवा एस एस सी चा फुल फॉर्म मराठी मध्ये सर्च करत असतो. परंतु तुम्हाला हे SSC म्हणजे नक्की काय माहिती आहे का?

आजच्या लेखामध्ये आम्ही एसएससी म्हणजे काय? आणि SSC full form in Marathi घेऊन आलोत.

SSC full form in Marathi:

SSC चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Staff Selection Commission” असा होतो तर SSC full form in Marathi ” कर्मचारी निवड आयोग ” असा होतो.

SSC ही एक संघटना आहे याची भारत सरकार यासाठी काम करत असते. विविध प्रकारच्या पदांची भरती करणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे या संघटनेचे मुख्य कार्य असते. मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांचे स्वप्न असते की भविष्यामध्ये पोलीस व इन्स्पेक्टर, सब इंस्पेक्टर, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अशा पदांवर जायचे अशा सर्व प्रकारच्या पदांची भरती ही एसएससी या संघटनेमार्फत केली जाते.

SSC म्हणजे काय?

SSC म्हणजेच ” staff selection commission” मराठी भाषेमध्ये “कर्मचारी निवड आयोग” असे म्हटले जाते.

एसएससी ही भारत सरकारसाठी काम करणारे एक संघटना आहे. या संघटनेतून बारावी, दहावी आणि ग्रॅज्युएशन बेसवर तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी निवेदन करू शकता. भारत सरकारच्या विविध ministries आणि department मधील group-B आणि group-C च्या कर्मचाऱ्यांच्या विविध रिक्त पदांकरिता भरती करत असते.

SSC या संघटनेची स्थापना चार नोव्हेंबर 1975 रोजी केंद्र सरकारकडून करण्यात आली. सुरुवातीला एसएससी या संघटनेचे नाव “subordinate service Commission” असे होते. परंतु 26 सप्टेंबर 1977 रोजी हे नाव बदलून ” staff selection commission” असे ठेवण्यात आले. तेव्हापासून या संस्थेला एसएससी (SSC) या शॉर्टफॉर्म ने ओळखले जाऊ लागले.

SSC या संघटनेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

SSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा –

एसएससी ही संघटना भारत सरकारच्या विविध पदांच्या भरती करिता प्रक्रिया राबवते. एसएससी या संघटनेमार्फत भारत देशांमध्ये विविध परीक्षा घेतल्या जातात त्या पुढील प्रमाणे;

  1. SSC Combined Graduation level (SSC CGL): एकत्रित पदवीधर
  2. SSC Combined Higher Secondary Level (SSC HSL): एकत्रित उच्च माध्यमिक स्तर.
  3. SSC Junior Engineering: कनिष्ठ अभियंता
  4. SSC Central Armed Police Force (SSC CAPF): केंद्रीय सशस्त्र पोलीस दल.
  5. SSC Multi Tasking staff (SSC MTS): मल्टी टास्किंग स्टाफ.
  6. SSC stenography (SSC Steno): स्टेनोग्राफी
  7. SSC Junior Hindi Translator ( SSC JHT): कनिष्ठ हिंदी अनुवादक

तर मित्रांनो! “SSC full form in Marathi | एसएससी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments