Ndrf full form in Marathi | एन डी एफ म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही वर्तमान पत्र आणि टीव्हीमध्ये एनडीआरएफ हे नाव ऐकलेच असेल ज्या ठिकाणी आपत्ती च्या घटना घडतात किंवा आपत्ती आलेली असते त्यासाठी अशा भागातील लोकांना वाचवण्यासाठी किंवा आपत्तीचे निवारण करण्यासाठी एनडीएफ ची टीम तिथे गेलेले असते. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना एनडीए म्हणजे काय आणि आपला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती नाही. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही ndrf full form in Marathi आणि एन डी आर एफ म्हणजे काय? घेऊन आलोत.

Ndrf full form in Marathi:

ndrf चा इंग्रजी अर्थ “National Disaster Response Force” असा आहे तर, ndrf full form in Marathi ” राष्ट्रीय आपत्ती निवारण दल” असा होतो.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच एनडीआरएफ. Ndrf ही यंत्रणा नेसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि आणि नैसर्गिक आपत्तीचे निवारण करण्यासाठी कार्यरत असते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करत असते व आपली महत्त्वाची भूमिका बजावत असते. भूकंप, महापूर, चक्रीवादळ आणि सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती वेळी एनडीआरएफचे मुख्य कार्य असते.

Ndrf म्हणजे काय?

Ndrf म्हणजेच “National Disaster Response Force” ज्याला मराठी भाषेमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल असे म्हणतात.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती निवारण या दलाची स्थापना करण्यात आली.

“आपदा सेवा सदैव” हे घोषवाक्य असलेला एनडीआरएफ हा दल कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी आपत्ती निवारण करण्यासाठी कार्य करत असते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ही यंत्रणा कार्यरत असते.

देशातील कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचे कार्य हे केंद्र सरकार बजावत असते. एन डी आर एफ हेदेखील केंद्र सरकारच्या आदेशावरून एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी आपली महत्त्वाची भूमिका बजावत असते.

Ndrf या दलामध्ये डॉक्टर, अभियंता, तंत्रज्ञ, श्वानपथक या सर्वांचा समावेश होत असतो. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवली तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची जबाबदारी एनडीआरएफ या पदाकडे असते. भूकंप , महापूर, वादळ अशा आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ हे पथक कौतुकास्पद मदत कार्य करत असते.

Ndrf मध्ये कसे भरती व्हावे?

एनडीआरएफ मध्ये भरती होण्यासाठी सुरुवातीला तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यानंतर BSF, CRPF, CISF, SSB यामध्ये कोणत्याही प्यारामिलिट्री फोर्स मध्ये भरती व्हावे लागेल. आणि या दलामध्ये तुम्हाला किमान तीन ते चार वर्षे सेवा करावी लागेल. त्यानंतर आपण या दलामध्ये राहूनच ndrf साठी अर्ज करू शकता. त्यानंतर अर्ज केलेल्या सैनिकांना एनडीआरएफचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. आणि जो विद्यार्थी यामध्ये पूर्णता प्रशिक्षित होतो त्याला एनडीआरएफ या दलामध्ये घेतले जाते.

तर मित्रांनो! “Ndrf full form in Marathi | एन डी एफ म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा