IIT full form in Marathi| आय आय टी म्हणजे काय?

मित्रांनो! तुम्ही IIT हे नाव तर एकूणच असाल. 12 वी science नंतर काय करावे हा प्रश्न जर तुम्ही कोणालाही विचारला किंवा जर तुम्ही कोणाकडून करिअर मार्गदर्शन घेत असाल तर त्यांचा पहिला सल्ला असेल IIT साठी प्रयत्न करून पहा.

IIT ही एक अशी शैक्षणिक संस्था आहे जिथे बारावी उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान शाखेतून शिकणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना जायचे असतं. जवळजवळ भारतीय सर्वच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आय आय टी हे नाव ऐकले आसेल परंतु तुम्हाला IIT म्हणजे काय? आणि IIT ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जर माहिती नसेल तर निराश होण्याची गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही आय आय टी म्हणजे काय? आणि IIT full form in Marathi घेऊन आलो आहे.

IIT full form in Marathi:

IIT चा इंग्रजी अर्थ ” Indian Institute of Technology” असा आहे तर, IIT full form in Marathi ” भारतीय तंत्रज्ञान संस्था” असा होतो.

आयआयटी ही एक शैक्षणिक संस्था आहे जी बारावी उत्तीर्ण झाल्यावर विज्ञान शाखेतून शिकणार्‍या बहुतेक मुलांना विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण संधी प्राप्त करून देते. ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानामध्ये जाण्याची रुची असेल ते विद्यार्थी आयआयटी हे क्षेत्र निवडू शकता.

IIT म्हणजे काय?

IIT म्हणजेच Indian Institute of Technology ज्याला मराठी भाषेमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था असे म्हणतात.

आयआयटी ही तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम शिक्षण देणारी एक संस्था आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने आयआयटी ह्या संस्थेची स्थापना केली.

आयआयटी ही केवळ भारतातच नसून जगभरामध्ये सर्वात प्रतिष्ठित अशी तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरामध्ये कित्येक वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि अभियंता तयार होतात.

IIT मध्ये प्रवेश कसा घ्यावा?

आय आय टी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम JEE mains या परीक्षेमध्ये पास व्हावे लागते. त्यानंतर जे विद्यार्थी जेईई-मेन या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात त्यांना JEE Advance exam द्यावी लागते आणि जे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षा मध्ये उत्तीर्ण होतात त्यांना आयआयटी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.

IIT साठी आवश्यक या पात्रता:

आयआयटी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकरिता बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तिसरा विषय म्हणून रसायन शास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजी असल्यास बाहेरील विषय हा भौतिकशास्त्र आणि गणित असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर आयआयटीमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 75 टक्के विज्ञान शाखेतून मार्क असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती किंवा जमाती आणि राखीव जागांसाठी मार्का मध्ये काही सूट दिलेली असते.

तर मित्रांनो! “IIT full form in Marathi| आय आय टी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

जय विजय काळे

जय विजय काळे

जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा.