CET full form in Marathi | सिईटी म्हणजे काय?

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022

मित्रांनो! तुम्ही सिईटी या या परीक्षा बद्दल नक्कीच ऐकले असेल कारण बारावीनंतर किंवा पदवी नंतर आपणाला कुठल्याही शाखेत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला सीईटी म्हणजे काय? आणि सीईटी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का? जरी माहिती नसेल तर निराश होण्याची गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही सीईटी म्हणजे काय? आणि CET full form in Marathi घेऊन आलोत.

CET full form in Marathi:

CET चा इंग्रजी अर्थ “Common Entrance Exam” असा होतो तर CET full form in Marathi ” सामान्य प्रवेश परीक्षा” असा होतो.

CET ही एक प्रकारची परीक्षा आहे. बारावीनंतर किंवा पदवीत्तर शिक्षण झाल्यानी कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी ही परीक्षा पास होणे अत्यंत गरजेचे आहे. CET ही परीक्षा भारतातील बहुतांश कॉलेज मध्ये पहिले वर्ष किंवा पहिला सेमिस्टर मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली एक प्रतियोगिता परीक्षा आहे.

CET म्हणजे काय?

CET म्हणजेच common entrance exam ज्याला मराठी भाषेमध्ये सामान्य प्रवेश परीक्षा असे म्हटले जाते.

CET ही देशभरातील विविध व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्याकरिता, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रथम वर्ष किंवा पहिल्या सेमिस्टर च्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याच्या हेतूने आयोजित केलेली ही एक स्पर्धा परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांना वरील क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी सीईटी ही परीक्षा देणे अत्यंत गरजेचे आहे.

केवळ बारावीचे विद्यार्थी ज्यांनी अनिवार्य विषयांमध्ये आवश्यक गुण प्राप्त केले आहेत तेच विद्यार्थी सीईटी या स्पर्धा परीक्षा साठी पात्र ठरतात.

CET या परीक्षेच्या चाचण्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली घेतल्या जातात.

एखादा विद्यार्थी सीइटी या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला साला संबंधित शिक्षण शाखेमध्ये प्रवेश दिला जातो. राज्य विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय दरवर्षी सीईटीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना प्रवेश देतात.

राष्ट्रीय स्तरावरील काही सामान्य प्रवेश परीक्षा पुढील प्रमाणे;

  1. JEE- संयुक्त प्रवेश परीक्षा
  2. NEET- राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा
  3. CLAT- सामान्य कायदा प्रवेश परीक्षा
  4. NATA – नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
  5. CMAT- सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा
  6. NCHMCT- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी
  7. NIFT- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तर मित्रांनो! “CET full form in Marathi | सिईटी म्हणजे काय?” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स


Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?