ITI full form in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 25/11/2022
ITI Full Form in Marathi
ITI Full Form in Marathi

मित्रानो तुम्ही नक्कीच आयटीआय हा शब्द ऐकूनच असाल कारण आजच्या आधुनिक काळामध्ये विद्यार्थी आयटीआय कोर्स कडे अधिकच ओढले जात आहेत.

हा कोर्स दहावी किंवा बारावीनंतर करता येतो त्यामुळे कमी वेळामध्ये एक डिग्री किंवा कोर्स पुर्ण होतो त्यामुळे विद्यार्थी आयटीआय करण्याकडे खूप भर देत आहे.

त्या लेखामध्ये आपण आयटीआय म्हणजे काय? आणि ITI full form in Marathi पाहणार आहोत.

ITI full form in Marathi:

मित्रांनो आयटीआयचा इंग्रजी फुल फॉर्म “Industrial Training institute” असा होतो. तर आयटीआय चा मराठीमध्ये फुल फॉर्म ” औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असा होतो.

Iti हा एक कोर्स आहे त्यामध्ये वेगवेगळे trades असतात यातील आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण कोणतेही trades निवडू शकतो.

आयटीआय म्हणजे काय?

आयटीआय ही एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे ज्यामध्ये वेगवेगळे कोर्स असतात ते शासनामार्फत घेण्यात येतात. यामध्ये घेतले जाणारे सर्व कोर्से शासनमान्य असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये आयटीआय कोर्स जवळ जवळ 417 संस्था आहेत.

आणि 381 संस्था खाजगी स्वरूपाचे आहेत. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ITI trades जे शिक्षण दिले जाते. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ दरवर्षी दीड ते दोन लाख विद्यार्थी आयटीआयचा कोर्समध्ये प्रवेश घेतात.

या कोर्स साठी आपण दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमची बारावी झाली असेल आणि तुम्हाला आय टी आय कोर्स साठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या शाखेतून बारावी केली त्याचा iti कोर्स च्या प्रवेशासाठी काहीही फरक पडत नाही.

आयटीआय कोर्स मार्फत विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून लवकरात लवकर काम मिळवणे सोपे होईल.

आयटीआय या कोर्सचा मुख्य उद्देश म्हणजे कुशल कार्यबल विकसित करणे हा आहे.

ITI चे प्रकार:

आयटीआय कोर्स साधारणता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. टेक्निकल आयटीआय:

टेक्निकल आय.टी.आय. कोर्स म्हणजे त्यामध्ये गणित आणि विज्ञान विषयात संबंधित प्रशिक्षण दिले जाते.

उदाहरणार्थ, computer operator and programming assistant

2. नॉन टेक्निकल आयटीआय:

नॉन टेक्निकल आयटीआय कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.

उदाहरणार्थ, बूक बाईंडर, पेंटर.

आयटीआय कोर्स साठी आवश्यक ती पात्रता:

आयटीआय या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आपण दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आयटीआय कोर्स ला तुमचे वय कमीत कमी 14 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.

आयटीआय अंतर्गत असलेले कोर्स:

औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय यामध्ये विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध असतात ते पुढील प्रमाणे:

  • Computer operator and programming assistant
  • Desktop publishing operator
  • Carpenter
  • Electrician
  • Draughtsmen civil
  • Draughtsmen mechanical
  • Electronic mechanic
  • Electroplator
ITI Full Form

तर मित्रांनो! “ITI full form in Marathi | आयटीआय म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

धन्यवाद!

Disclosure

या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.

Image contains man with a beard

जय विजय काळे

जय काळे हे MarathiHQ.comचे दूरदर्शी संस्थापक आहेत. हा ब्लॉग विविध करिअर पर्यायांचे एक विशाल ग्रंथालय आहे. हा ब्लॉग विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा याविषयी माहिती देतो. विविध करिअर पर्यायांचा शोध घेणाऱ्यांसाठी हे व्यासपीठ एक विश्वासू साथीदार बनले आहे.

Popular Posts

Post Thumbnail

12 वी कॉमर्स नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी arts नंतर काय करावे?


Post Thumbnail

12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स