एकदा पदवी पुर्ण केली की बऱ्याच विद्यार्थांना एमबीएला ऍडमिशन घ्यायचे अशी इच्छा असते, पण काय आहे एमबीए? का करावे एमबीए? या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे.

एमबीए हा संपुर्ण जगात मानलेला एक उत्कृष्ट पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे.

बऱ्याच वेळा असे होते की तुम्ही जे ग्रॅज्युएशन केले आहे ते तुम्हाला चांगला जॉब देण्यासाठी पुरेसे नसते. मग त्यानंतर काय करायचे? तर चांगला जॉब भेटावा म्हणुन लोक एमबीए करतात.

एमबीए कोर्स म्हणजे नेमकं काय?

मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन  (एमबीए) हा एक खुप जास्त पसंती दिलेला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे.

महाराष्ट्रामध्ये आता जवळ जवळ प्रत्येक शहरामध्ये एमबीएचे कॉलेज आहे. त्यामुळे एमबीएसाठी कॉलेज भेटणे खुप अवघड आहे असं काही नाही.

एमबीए कोर्स करण्यासाठी मी पात्र आहे का?

जर तुमचे ग्रॅज्युएशन पुर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमची पदवी 50 टक्के पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहात तर तुम्ही एमबीएसाठी प़ात्र आहात.

एमबीएसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् कोण्त्याही साईड मधुन तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले असले तर तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात.

अशी काही अट नाही की एमबीए करण्यासाठी तुमचे एडुकेशनल बॅकग्राउंड  कॉमर्स साईड चे असावे.

 एमबीएसाठी पात्र असण्यासाठी हया अटी आहेत:

 • सायन्स, आर्टस् किंवा कॉमर्स यामधील कोणत्याही क्षेत्रामधुन तुमची पदवी झालेली पाहीजे.
 • पदवी मध्ये तुम्हाला 50 टक्के पेक्षा जास्त गुण पाहीजे. जर तुम्ही रिजर्व्ह कॅटेगिरी मध्ये असाल, तर तुमचे 45 टक्के गुण पाहीजे.
 • आपण कोणतीही एक प्रवेश परिक्षा पास पाहीजे.

मी कोणती एमबीए प्रवेश परिक्षा दयावी?

महाराष्ट्रामध्ये कोणत्या ही कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही MAH CET ही प्रवेश परिक्षा देणे गरजेचे आहे.

काही कॉलेज त्यांची वेगळी स्वतंत्र एन्ट्रांन्स एक्झाम घेतात.

काही एमबीए प्रवेश परिक्षेची नावे आहेत.

 • MAH CET
 • CAT
 • SNAP
 • XAT
 • CMAT

जर तुम्ही महाराष्ट्रात एखादया कॉलेज मध्ये प्रवेश घेत आहात, तर MAH CET हया परिक्षेची मी शिफारस करतो कारण महाराष्ट्रातले जवळ जवळ सर्व कॉलेज हया परिक्षेच्या आधारे प्रवेश स्वीकारतात.

TARGET MH-CET (MBA / MMS) 2021

Solved Papers (2007 – 2020) + 5 Mock Tests 12th Edition

एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रीया आहे?

एमबीए कोर्सला प्रवेश घेण्याआधी तुम्ही याची पुष्टी करा की तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात का. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही एमबीएच्या प्रवेश परिक्षेचे फॉर्म भरा आणि परिक्षा दया.

परिक्षेचा निकाल जेव्हा जाहिर होतो, तेव्हा CAP राउंडला सुरूवात होते. तेव्हा तुमच्या जवळच्या एमबीए कॉलेजला जावुन तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला लांबच्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असेल (पुणे, मुंबई) तरीही तुम्ही जवळच्या एमबीए कॉलेजला जा आणि ऑपशन फॉर्म भरा. ऑपशन फॉर्म भरतांना तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे हे विचारले जाते तेथे आपली इच्छित महाविदयालये निवडा.

जेव्हा फर्स्ट राउंड डिक्लेर होतो तेव्हा तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे ते चेक करा आणि जर तुम्हाला ते कॉलेज पसंत असेल तर सिट कन्फर्म करा.

एमबीए कोर्सची फी कीती असते?

एमबीए कोर्सची सरासरी फी 1,50,000 आहे.

एमबीए कोर्ससाठी कॉलेज 50,000 ते 25,00,000 पर्यंत फि आकारू शकते. ते तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबुन आहे.

नाशिकचे के.के. वाघ कॉलेज एमबीएसाठी 2 वर्षाची 1,68,000 इतकी फि आकारते.

सिम्बॉइसिस कॉलेज एका वर्षाची 3,12,500 इतकी फि आकारते. म्हणजे 2 वर्षांची फि 6,25,000 इतकी होते. प्रत्येक कॉलेजचे फी स्ट्रक्चर वेगळे असते.

मला एमबीए कोर्समध्ये काय शिकवले जाईल?

एमबीए कोर्समध्ये हया तीन गोष्टींवर तुम्हाला शिक्षण दिले जाते:

 • थेअरी क्लासेस — यात तुमचे थेअरी क्लासेस होतात.
 • प्रॅक्टीकल क्लासेस — यात तुमचे प्रॅक्टीकल होतात.
 • इंटर्नशिप — यात तुम्हाला इंटर्नशिप करायचे असते.

एमबीए कोर्स करतांना तुम्हाला एक स्पेशलाईझेशन  निवडावे लागते.

एमबीए कोर्सचे जास्त पसंत केलेले 3 स्पेशलाईझेशन आहेत.

 • फायनांन्स
 • मार्केटिंग
 • हयुमन रिसोर्सेस

मी एमबीए कोर्स का करावा?

एमबीए करण्याचे वेग वेगळया लोकांचे वेगळी कारणं असतात.

पहिली आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे एमबीए केल्याने तुम्हाला जॉब भेटतो. खुप लोक एमबीए फक्त चांगला जॉब भेटावा म्हणुन करतात.

जे लोक ग्रॅज्युएशन करून जॉब करत आहे ते एमबीए करून त्यांचे स्कील वाढवतात.

असेही कीती लोक असतात की त्यांनी जे ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यावर त्यांना जॉब भेटत नाही.

परंतु एमबीए कोणतेही ग्रॅज्युएशन झालेले विदयार्थी करू शकता, त्यामुळे त्यांना एक संधाी भेटते एमबीए करून जॉब करण्याची.

विचार करा की तुमचा ग्रॅज्युएशन तुम्हाला जर जॉब देण्यासाठी सक्षम नाही आणि एमबीए करून जर तुम्हाला जॉब भेटत असेल तर का करू नये एमबीए?

असे काही लोक आहेत की जे एमबीए करून स्वतःचा बिझनेस चालु करतात.

एमबीए कोर्स केल्यावर मला नोकरी भेटेल का?

हो, एमबीए कोर्स पुर्ण झाल्यावर तुम्हाला नोकरी भेटण्याची खुप जास्त शक्यता असते.

पहिले म्हणजे जवळ प्रत्येक एमबीए कॉलेजचे स्वतःचे प्लेसमेंट सेल असते जे विदयार्थ्यांचे प्लेसमेंट कंपनी मध्ये करून देते.

कॅम्पस प्लेसमेंटसाठी खुप कंपनी येतात आणि विदयार्थांना जॉब ऑफर देवुन जातात.

जर कॅम्पस प्लेसमेंटनी तुम्हाला जॉब भेटला नाही तर बऱ्याच कंपनी त्यांच्या स्वतःच्या प्लेसमेंट ड्राईव्ह घेतात त्यात तुम्ही भाग घेवुन जॉबसाठी अर्ज भरू शकता.

तुमच्याकडे एमबीएची पदवी असल्यास तुम्हाला जॉब भेटण्याची खुप जास्त शक्यता आहे.

एमबीए नंतर सरासरी तुम्हाला 3 लाखाचे वार्षिक पॅकेज भेटते.

मी जॉब करून एमबीए करू शकतो का?

MBA course information in Marathi
MBA course information in Marathi

स्पष्ट सांगावे तर एमबीए करतांना फुल टाईम जॉब करणे शक्य नाही.

पण तुम्ही पार्ट टाईम जॉब करू शकता. खुप लोक एमबीए करतांना पार्ट टाईम जॉब करतात.

जर तुम्हाला फुल टाईम जॉब करायचा असेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्र्हर्सिटी व्दारे करू एक्स्टर्नल एमबीए करू शकता.

मी एक्स्टर्नल एमबीए केला पाहीजे का?

एक्स्टर्नल एमबीए शक्यतो ते लोक करतात ज्यांना जॉब भेटलेला आहे.

एक्स्टर्नल एमबीएसाठी तुम्ही पात्र आहात का? तुम्ही 50 टक्के पेक्षा जास्त एकुण गुण मिळवुन ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही एक्स्टर्नल एमबीए साठी पात्र आहात.

एक्स्टर्नल एमबीएसाठी त्याच अटी आहेत ज्या रेगुलर कॉलेज एमबीएसाठी असतात.

एक्स्टर्नल एमबीएसाठी पात्र होण्यासाठी काही अटी:

 • ग्रॅज्युएशन झालेले पाहीजे (कोणतेही ग्रॅज्युएशन चालते)
 • ग्रॅज्युएशन मध्ये तुमचे एकुण गुण 45 टक्के पेक्षा जास्त पाहिजे.(रिजर्व्ह कॅटेगिरीसाठी 40 टक्कयांपेक्षा जास्त पाहिजे)
 • YCM ची एन्ट्रांन्स एक्झाम दिलेली असली तर उत्तम.(YCM प्रवेश परिक्षेची फि फक्त 500 रूपये आहे.)

एक्स्टर्नल एमबीए हया कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रीया कोणती आहे?

YCMOU व्दारे जर तुम्हाला एक्स्टर्नल एमबीए करायचे असेल तर YCMOU  त्यासाठी प्रवेश परिक्षा घेते. हया प्रवेश परिक्षेची फि 500 रूपये आहे.

ही प्रवेश परिक्षा 100 गुणांची असते.

हया प्रवेश परिक्षेचे फॉर्म् कधी सुटतील, परिक्षा कधी होइल हया माहीतीसाठी तुम्ही YCMOU  ची अधिकृत (official) वेबसाईटवर लक्ष ठेवा.

एक्स्टर्नल एमबीएसाठी प्रवेश शुल्क किती लागतो?

YCMOU  मध्ये तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये 15,000 इतके शुल्क भरावे लागेल. दुसऱ्या वर्षामध्ये प्रोजेक्टचे शुल्क पण आकारले जाते त्यामुळे दुसऱ्या वर्षाचे पुर्ण शुल्क 17,500 इतके आहे. जर तुम्ही एखादया विषयामध्ये नापास झाला तर त्याची परत परिक्षा देण्यासाठी तुमच्याकडुन 150 रूपये इतके शुल्क आकारले जाते.

एक्स्टर्नल एमबीए केल्यावर मला नोकरी भेटेल का?

हो एक्स्टर्नल एमबीए केल्यावर नोकरी भेटते.

पण माझे स्वताचे असे मत आहे की ग्रॅज्युएशन करून डायरेक्ट एक्स्टर्नल एमबीए केले तर नोकरी सापडणे अवघड जाईल कारण, कारण तुम्ही ज्यांच्या बरोबर जॉब इंटरव्हयु देत असाल त्यांनी रेग्युलर कॉलेज करून एमबीए केले असेल त्यामुळे ते इंटरव्हयु मध्ये तुम्हाला जड भरू शकता.

जर तुमच्याकडे आधीच जॉब असेल तर तुम्ही एक्स्टर्नल एमबीए नक्की करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी मध्ये प्रोमोशनसाठी त्याचा फायदा होईल.

आपण नवीन पदवीधर असल्यास मी एक्स्टर्नल एमबीए करणे रेकेमेंड करत नाही.

तुम्ही या गोष्टीचाही विचार करणे गरजेचे आहे कि काही वर्षांपूर्वी कोर्टने एक्स्टर्नल इंजिनीरिंग अवैध घोषित केली आहे.

रेगुलर एमबीए आणि एक्स्टर्नल एमबीए या मधे कोणता एमबीए कोर्स फायदयाचा ठरेल?

हया प्रश्नाचे उत्तर तुम्ही सध्या काय करत आहात त्यावर अवलंबुन आहे.

जर तुम्ही नविन पदवीधर असाल तर तुम्ही एक्स्टर्नल एमबीए करावा असा सल्ला मी देत नाही कारण पुढे तुम्हाला जॉब सापडायला प्रॉब्लेम येवु शकतो.

कॉलेज मधुन रेगुलर एमबीए केल्याने तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट मध्ये जॉब भेटण्याचे खुप संधी असते. असे खुप कॉलेजेस आहेत जे त्यांच्या 75 टक्के पेक्षा जास्त मुलांना कॅम्पस मधुनच नोकरी मिळवुन देतात.

जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एक्स्टर्नल एमबीए करायला काही हरकत नाही कारण त्यामुळे तुम्हाला फक्त फायदाच होतो.