Marathihq.com बद्दल थोडक्यात

मी कोण आहे?

IMG 20220115 120336 229 1

“नमस्कार! विद्यार्थ्यांना करिअरचा योग्य मार्ग निवडण्यात मदत करण्याच्या हेतूने मी डिसेंबर, २०२० मध्ये MarathiHQ.com ही वेबसाइट सुरू केली.”

– जय विजय काळे (संस्थापक)

प्रेरणा –

एक विद्यार्थी म्हणून मी माझ्या करिअरबद्दल नेहमीच गोंधळात होतो. मला करिअर मार्गदर्शन करण्यासाठी फार मर्यादित स्रोत होते.

आपणा सर्वांना माहित आहे की गोंधळामुळे वाईट निर्णय होतात. विद्यार्थी म्हणून मला नेहमी प्रश्न पडायचा कि आता मी काय करावे? मी कोणता कोर्स निवडावा? कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया काय आहे? मी त्याची तयारी कशी करू? जर मला एखादया कोर्सला प्रवेश मिळाला नाही तर मला पुढे काय ऑपशन आहेत?

मला इतरांसारखे सामान्य प्रकारे शिक्षण घेता आले नाही, माझ्या शैक्षणिक जीवनात खूप चढ-उतार आले. आर्थिक कारणांमुळे मला माझ्या दुसऱ्या वर्षात इंजिनीअरिंग सोडावं लागलं.

माझा ठाम विश्वास आहे की माझा शैक्षणिक प्रवास योग्य रित्या न होण्याचे कारण म्हणजे – गोंधळ, संशोधन आणि तयारीचा अभाव. जर मला स्पर्धा माहित असती, मला पुढे काय करायचे आहे हे माहित असते, जर मला खर्च माहित असते, मला माझे सगळे ऑपशन्स जर माहित असते तर मी माझे करिअर योग्य रित्या निवडले असते.

हे इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये अशी माझी इच्छा आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांबद्दल माहिती देणार्‍या इंग्रजी वेबसाइट्स असताना, मला त्या योग्य वाटल्या नाहीत. म्हणून, मी “MarathiHQ.com – करिअर मार्गदर्शन केंद्र” सुरू केले.

MarathiHQ.com चे मिशन

विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती देऊन योग्य करिअरचा मार्ग निवडण्यात मदत करणे हे माझे ध्येय आहे. MarathiHQ.com चा त्या पातळीवर विकास करण्याचे माझे लक्ष्य आहे जेणेकरुन या वेबसाइटला भेट देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला तो शोधत असलेली सर्व माहिती मिळेल तसेच त्याला माहिती असायला हवी अशी सर्व माहिती त्याला मिळेल.