BDS कोर्स काय आहे? (BDS Course Information in Marathi)
BDS हा एक प्रोफेशनल डेंटल कोर्स आहे.
BDS चा फुल फॉर्म आहे – Bachelor of Dental Surgery (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)
ज्या विद्यार्थ्यांना डेंटिस्ट व्हायचे आहे ते विद्यार्थी BDS हा कोर्स करतात. BDS हा विद्यार्थ्यांना MBBS नंतरचा सगळ्यात जास्त पसंत असलेला दुसरा कोर्स आहे पण ज्या विद्यार्थ्यांना डेंटिस्ट व्हायचे आहे त्यांच्यासाठी BDS हा सगळ्यात जास्त पसंतीचा कोर्स आहे.
आजकाल दातांच्या स्वास्थ्य बद्दल खूप जागरूकता होत आहे आणि लोक आपल्या दातांकडे जास्त लक्ष देत आहेत. जर दातांचे डॉक्टर व्हायचे असेल तर BDS कोर्सची डिग्री असणे आवश्यक आहे.
BDS कोर्समध्ये काय शिकवतात?
BDS कोर्समध्ये तुम्हाला डेंटल विज्ञान आणि सर्जेरी हे विषय शिकवले जातात.
BDS हा ५ वर्षाचा पदवीधर कोर्स आहे. ह्या ५ वर्षांमध्ये तुमचे ४ वर्ष classroom क्लास होतात आणि १ वर्ष rotating इंटर्नशिप होते.
BDS कोर्समध्ये सेमिस्टर प्रमाणे परीक्षा होते.
BDS कोर्सदरम्यान तुम्हाला दातांच्या रोगांबद्दल प्रॅक्टिकल ज्ञान आणि प्रशिक्षण दिले जाते.
BDS डॉक्टर काय काम करतो?
BDS कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थी डेंटिस्ट होतो.
डेंटिस्ट दातांचे रोग प्रतिबंधित करतो, रोगांचे निदान करतो आणि दात रोगमुक्त करतो. (Prevents, diagnoses and cures all dental related diseases.)
दातांचा कोणताही प्रॉब्लेम असला कि लोक डेंटिस्टकडे जातात आणि डेंटिस्ट त्यांना मदत करतो.
BDS डॉक्टर स्वतःच्या क्लिनिकमध्ये, सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी दवाखान्यात काम करतात. BDS कोर्स पूर्ण झाल्यावर काही विद्यार्थी फार्मा कंपनीमध्ये पण काम करतात.
BDS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का?
BDS कोर्स हा बारावी science नंतर करता येणार कोर्स आहे. फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो.
BDS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष आहेत:
प्रवेश NEET परीक्षेच्या गुणांच्या आधारे होतात.
BDS कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय आहे?
BDS कोर्सला प्रवेश घेण्यासाठी NEET परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला NEET परीक्षेला रजिस्टर करावे लागते.
NEET परीक्षा दिल्यावर NEET च्या गुणांच्या आधारे तुम्हाला AIR (All India Rank) दिला जातो. ह्या रँकच्या आधारे तुम्हाला प्रवेश दिला जातो. जितका चांगला रँक तितके चांगले कॉलेज भेटण्याची संधी भेटते.
CAP राऊंडला रजिस्टर केल्यावर तुम्हाला कळते कि तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला आहे. जर तुम्हाला कॉलेज पसंद असेल तर तुम्ही फी भरून तुमच्या प्रवेशाची पुष्टी करू शकता. जर तुम्हाला दुसरे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडला बसू शकता.
BDS कोर्सनंतर कोणते काम भेटतात?
BDS कोर्सनंतर तुम्हाला खालील कामे भेटू शकतात –
BDS नंतर काय करावे?
BDS कोर्सनंतर तुमच्याकडे खालील पर्याय आहेत:
आम्हाला फॉलो करा -

जय विजय काळे
नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.
आम्ही तुम्हाला परीक्षेच्या तारखा, निकालाच्या तारखा यासारख्या शिक्षणाबद्दल अपडेट देऊ. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर आमच्याशी कनेक्ट व्हा!