MBBS कोर्स माहिती | MBBS Course Information in Marathi

कोर्सचा सारांश –

MBBS full form in Marathiबॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
कोर्स प्रकारपदवी
प्रवेश पात्रतापीसीबी विषयांसह विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण
NEET परीक्षा उत्तीर्ण
कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक शुल्कसरासरी 12,00,000 / वर्ष
पर्यायी अभ्यासक्रमBDS
Pharm D
B Pharm
BHMS
BAMS
BUMS
BPT  
Table of Contents

    एम बी बी एस काय आहे?

    MBBS (एम बी बी एस) full form – बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी

    एम बी बी एस (बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी) डॉक्टर बनण्यासाठी असलेला अभ्यासक्रम. अभ्यासक्रमाच्या नावात मेडिसिन व सर्जरी अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख असला तरी एम बी बी एस एकच डिग्री आहे ज्या मेडिसिन या विषया बरोबरच सर्जरीचा सुद्धा अभ्यास केला जातो.

    या अभ्यासक्रमाची माहिती करून घेताना खालील मुद्यांचा उहापोह प्रामुख्याने केला जाईल.

    ज्यांना आपण साधारणपणे डॉक्टर म्हणून ओळखतो ते सर्व प्रामुख्याने ॲलोपॅथी डॉक्टर असतात जे एम बी बी एस किंवा त्याहून पुढील शिक्षण घेऊन या क्षेत्रात कार्यरत असतात.

    या अभ्यासक्रमात केव्हा प्रवेश घेता येतो

    विद्यार्थ्याचे वय

    एम बी बी एस या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 17 व जास्तीत जास्त 25 वर्षे इतके असू शकते.

    आवश्यक शिक्षण

    बारावी चे शिक्षण – फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्रजी हे विषय घेऊन पूर्ण झाल्यानंतर या ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

    बऱ्याच विद्यार्थ्यांची ही समजूत असते की एमबीबीएस ला जाण्यासाठी किंवा जाताना भौतिक शास्त्राचे विशेष महत्त्व नाही परंतु वस्तुस्थिती मात्र एकदम विपरीत आहे.

    सायन्स व टेक्नॉलॉजी च्या प्रचंड प्रगतीमुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक डिजिटल उपकरणांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे याचा उपयोग करताना भौतिकशास्त्राचे मूलभूत प्रशिक्षण अत्यंत उपयोगी सिद्ध होते.

    NEET काय आहे? (Neet Exam Information in Marathi)

    प्रवेश परीक्षेला NEET National Eligibility Entrance Test एन इ इ टी (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) असे नाव आहे.

    ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा घेतली जाते. या परीक्षेनंतर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा BDS (बॅचलर ऑफ डेंटल सायन्स) या दंत विज्ञान शाखेत प्रवेश घेता येतो.

    NEET परीक्षेतील विषय, गुण व परीक्षा पद्धती

    NEET या परीक्षेसाठी विषय, प्रश्न व गुण खालीलप्रमाणे असतात.

    विषयप्रश्नगुण
    भौतिकशास्त्र (Physics)45180
    रसायनशास्त्र (Chemistry)45180
    जीवशास्त्र (Biology)90360
    एकूण180720
    NEET Exam information in Marathi

    जीवशास्त्र  हा विषय वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र या दोन भागात विभागला आहे. म्हणून यात 45 अधिक 45 असे 90 प्रश्न असतात.

    ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. परीक्षा थोडी कठीण असण्याचे कारण की यात उणे पद्धतीचा (Minus Marking) अवलंब केला जातो.

    NEET आकडेवारी

    आधीच्या परीक्षेचे आकडे सांगतात की 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले पैकी जवळजवळ आठ लाख विद्यार्थी उत्तीर्ण घोषित करण्यात आले.

    पण महत्त्वाची बाब ही की भारतभरातील सरकारी महाविद्यालयात केवळ 65000 जागाच या अभ्यासक्रमासाठी आहेत.

    याचा अर्थ उरलेल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो किंवा बीडीएस बॅचलर ऑफ डेंटल सायन्स अथवा फिजिओथेरपीचा अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो.

    अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले गुण

    एम बी बी एस चा कोर्स ला प्रात्यक्षिकांवर भर असल्यामुळे दूर परीक्षा पद्धतीने करता येत नाही. अभ्यासक्रम खूपच मोठा असल्याने विद्यार्थ्याला काही गुणांची आवश्यकता असते.

    उदाहरणार्थ सतत चिकाटीने अभ्यास करण्याचे कसब, मानसिक स्थिरता, तग धरण्याची क्षमता, सेवाभाव, लांब काळपर्यंत काम करण्याची कुवत, शिकण्याची तयारी वगैरे.

    NEET च्या परीक्षेत विचारणारे विचारले जाणारे प्रश्न साधारणपणे एनसीईआरटी वर अवलंबून असल्याने एनसीईआरटी चा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला हवा

    NEET ची परीक्षा इंग्रजी हिंदी आसामी बंगाली गुजराती कन्नड मराठी ओडिया तामिळ तेलगू तसेच उर्दू इत्यादी भाषांमधून देता येते.

    परीक्षेला बसण्याची आधी पूर्वीच्या परीक्षा मध्ये आलेले प्रश्न सोडविणे व आधीच्या परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचे इंटर्व्ह्यूज बघून शिकण्याचा प्रयत्न करणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा आवश्यक आहे. NEET परीक्षेत वेळेच्या नियोजनाला फार महत्त्व आहे त्यामुळे सतत टेस्ट पेपर्स सोडवत राहिल्याने वेळेचा योग्य अंदाज विद्यार्थ्याला येतो

    बरेच वेळा असेही आढळून आले आहे की चांगला बुद्धिमान विद्यार्थी या परीक्षेत अयशस्वी होतो व ज्या विद्यार्थ्यांचे वेळेचे नियोजन टेस्ट परीक्षा देऊन चांगले झाले आहे तो यशस्वी होतो

    कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा?

    कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी त्या महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI), यूनिवर्सिटी ग्रँड कमिशन (UGC) व इंडियन मेडिकल कौन्सिल (IMC) यांची मान्यता आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे.

    काही चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयांची नावे ह्या प्रमाणे आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) भारतात  20 ठिकाणी AIIMS महाविद्यालय आहेत. अजून 4-5 ठिकाणी नजीकच्या भविष्यात AIIMS या संस्था सोडून सुरू होणार आहेत.

    यानंतर आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) पुणे, सी एम सी वेल्लोर, मौलाना आझाद मेडिकल कॉलेज व हार्डिंग ए मेडिकल कॉलेज यांचा सुद्धा चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात समावेश होतो.

    एम बी बी एस अभ्यासक्रम साडेचार वर्षाचा असतो त्यानंतर एक वर्षाची अनिवार्य इंटरंशिप असते.

    एमबीबीएस नंतर पुढे काय?

    नोकरी – सरकारी किंवा खाजगी. निरनिराळ्या संस्थानमध्ये. भारतीय सेनेत.

    काही महत्वाच्या खाजगी कंपन्या ज्या एमबीबीएस नंतर नोकरीसाठी नावाजलेल्या जातात.

    • फोर्टिस हेल्थ केअर लिमिटेड
    • सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज
    • अपोलो म्युनिक हेल्थ इंडस्ट्रीज
    • श्री गंगाराम हॉस्पिटल
    • लीलावती हॉस्पिटल
    • वोक्हार्ट लिमिटेड
    • अपोलो हॉस्पिटल
    • सिप्ला लिमिटेड

    अशी अनेक नावे सांगता येतील.

    एमबीबीएस झाल्यानंतर रुपये तीस हजारापासून ते दोन लाखापर्यंत दरमहा पगार मिळू शकतो. फक्त तो अनुभव व कौशल्यावर अवलंबून असतो. काही विद्यार्थी एमबीबीएस झाल्यानंतर परदेशात सुद्धा नोकरी करू शकतात फक्त येथील मेडिकल कौन्सिलची परवानगी मात्र लागते.

    आजकाल बरेच विद्यार्थी एमबीबीएस नंतर पुढे शिकणे पसंत करतात. त्यासाठी त्यांना विविध पर्याय उपलब्ध आहेत.

    • एम एस- M.S.- मास्टर ऑफ सर्जरी- ही मास्टर्स डिग्री सुद्धा वेगवेगळ्या विषयात केली जाऊ शकते.
    • एम डी – M.D. डॉक्टर ऑफ मेडिसिन-ही मास्टर्स डिग्री सुद्धा वेगवेगळ्या विषयात केली जाऊ शकते
    • वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस

    मास्टर्स डिग्री नंतर सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पुढे चालू ठेवता येते

    जसे की –

    • एम सी एच- हा अभ्यासक्रम सर्जरी संबंधी आहे
    • डी एम – हा अभ्यासक्रम मेडिसिन संबंधी आहे

    मास्टर डिग्री किंमत पुढील शिक्षण झाले असल्यास प्रचंड प्रमाणावर संधी उपलब्ध असतात व वेतन सुद्धा तितकेच भरपूर मिळते. तसेच स्वतःचा  खाजगी व्यवसाय सुद्धा केला जाऊ शकतो. संशोधनासाठी मार्ग मोकळे होतात.

    एम बी बी एस अभ्यासक्रमात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील लोक गुन्हा तपासासाठी सुद्धा करून कायद्याची व त्या अनुषंगाने समाजाची विशेष मदत करत असतात. एखाद्या गुंतागुंतीच्या केसमध्ये वैद्यकीय मत सर्व चाचण्यांनंतर काय निघते यावर बऱ्याच वेळा तपासाची दिशा ठरते. ही वैद्यकीय शिक्षणाची एक वेगळीच बाजू आहे ज्याला मेडिको लीगल जुरिस्प्रुडंस अशी सज्ञा आहे. ज्या ठिकाणी कायदा व वैद्यकीय ज्ञानाचे सुंदर मिश्रण बघायला मिळते.

    जय विजय काळे

    जय विजय काळे

    जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा
    जय विजय काळे

    जय विजय काळे

    जय एक अनुभवी लेखक आहे ज्यांना शिक्षणाचे जग आणि विविध करिअरचे मार्ग शोधण्याची आवड आहे. पाच वर्षांच्या प्रभावी अनुभवासह जय अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि करिअर पर्यायांशी संबंधित सर्व बाबींवर विषयाची सखोल माहिती देणारे लेख लिहितात. जय बद्दल अधिक माहिती येथे वाचा

    Related Posts

    This Post Has 2 Comments

    1. Sayali

      आपण NEET शिवाय MBBS करू शकतो का?

      1. नाही, NEET प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तुम्ही भारतात एमबीबीएस करू शकत नाही. खालील काही वैद्यकीय कोर्स आहेत जे तुम्ही NEET परीक्षेशिवाय करू शकता – B.Sc (नर्सिंग, बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग इ.), बी फार्मसी इ.

    Leave a Reply