EWS full form in Marathi | पी डब्ल्यू एस म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 08/01/21 •  1 min read

Ews ही भारतामध्ये निघालेले नुकतीच एक योजना आहे. ईडब्ल्यूस प्रमाणपत्राला मराठी भाषेमध्ये आर्थिक दुर्बलता घटक प्रमाणपत्र आसे म्हणतात. ईडब्ल्यूएस हे प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनविले जाते. आपल्या समाजातील प्रत्येक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तीला ईडब्ल्यूएस हे प्रमाणपत्र बद्दल माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे आजच्या लेखामध्ये आम्ही डब्ल्यू एस म्हणजे काय? आणि ews full form in Marathi घेवून आलोत.

Ews full form in Marathi:

ईडब्ल्यूएस चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म “Economically Weaker section” होतो तर मराठी मध्ये डब्ल्यू चा फुल फॉर्म “आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक” असा होतो.

ईडब्ल्यूएस ही भारत सरकारने नुकतीच चालू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बलता असलेल्या सामान्य वर्गाला सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले जाते.

ई .डब्ल्यू.एस म्हणजे काय?

ईडब्ल्यूएस म्हणजेच इकॉनोमिकली विकर सेक्शन. ज्याला दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र म्हणून देखील म्हटले जाते. ई.डब्ल्यू.एस या प्रमाणपत्राला प्रत्यक्ष स्वरूपाने “इन्कम अँड अँसेटस प्रमाणपत्र” असे म्हटले जाते.

ईडब्ल्यूएस एक भारत सरकारने चालू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण मिळते. त्यामुळे हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे ठरते. ईडब्ल्यूएस ला आरक्षणाचा पुरावा देखील म्हणतात.

आपणास जर ईडब्ल्यूएसहे प्रमाणपत्र हवे असेल तर आपण आपल्या स्थानिक सरकारी प्रधीकरणाकडून हे प्रमाणपत्र मिळवू शकता.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रा करिता आवश्यक या पात्रता:

ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र करता सरकारने नवीन ईडब्ल्यूएस श्रेणी अंतर्गत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराला हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील पात्रता किंवा अटी लागू असणे आवश्यक आहे.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र करिता आपण “सामान्य” या वर्गाचे उमेदवार असायला हवे.( एससी, एसटी किंवा ओबीसी या वर्गाच्या आरक्षणाला खाली उमेदवारांना हे प्रमाणपत्र दिले जात नाही)

आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हे 13 ऑक्टोंबर 1967 रोजी चे किंवा त्या अगोदर चे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे

कुटुंबास पाच एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेतजमीन नसावी.

आपल्या कुटुंबाकडे एक हजार स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा अधिक निवासी प्लॉट नसावा.

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढण्याकरता आवश्यक कागदपत्रे:

आपणास जर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढायचे असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. जातीचे प्रमाणपत्र / दाखला
  4. मिळकत प्रमाणपत्र किंवा उत्पन्न दाखला
  5. बीपीएल कार्ड
  6. बँक स्टेटमेंट

तर मित्रांनो! “ews full form in Marathi | पी डब्ल्यू एस म्हणजे काय?” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.