ED Full Form in Marathi | ईडी म्हणजे काय?

By Jay Vijay Kale •  Updated: 10/06/21 •  1 min read

मित्रांनो! आपण बराच वेळा वर्तमानपत्र वाचत असताना येडी समाजाच्या बातम्या वाचत असतो जसे की, अमुक नेत्याला किंवा अधिकाऱ्याला ईडी ची नोटीस मिळाली. परंतु आपल्यातील बरेच जणांना नेमके ईडी म्हणजे काय किंवा ईडीची नोटीस म्हणजे काय याबद्दल माहिती नसते त्यामुळे असे व्यक्ती तिकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे मित्रांनो आम्ही आजच्या लेखामध्ये ed Full from in Marathi आणि ईडी म्हणजे काय? त्या बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो.

ED Full Form in Marathi | what is ED meaning in Marathi:

ED म्हणजेच Enforcement Directorate म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये अंमलबजावणी संचालनालय असे म्हणतो.

आर्थिक घोटाळे आणि पैशाचा गैरवापर किंवा व्यवसाय यांचा तपास करणे हे ईडी चे मुख्य कार्य असते. केंद्र सरकार मधील महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत ईडी चे कामकाज चालतात.

ईडी म्हणजे काय?

ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय ज्याची स्थापना 1956 मध्ये दिल्ली येथे करण्यात आली.

ईडी ची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे,

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, 1999 (FEMA)

प्रिवेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट,2002 (PMLA)

वरील दोन कायद्यांचे उल्लंघन कुठल्याही क्षेत्रामध्ये होत असेल तर, त्या प्रकरणांमध्ये ईडी द्वारे तपासणी केली जाते. तसेच आर्थिक घोटाळे आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे असे विविध अधिकार ईडीला दिलेले आहेत.

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी ईडी कडून सक्त कारवाई केली जाते.

तसेच आपल्या देशामध्ये चाललेला काळाबाजार, बेहिशेबी मालमत्ता, कर कर चुकवणे आणि पैशांमध्ये घोटाळी इत्यादी संबंधीचे सर्व तपास ईडी द्वारे घेतले जातात.

ईडी चे संचालनालय महसूल विभागाच्या अंतर्गत येते. आणि महसूल विभागाच्याच प्रशासकीय नियंत्रणाखाली ईडीचे सर्व कामकाज चालतात.

ED अधिकारी नेमणूक:

पूर्वी ED मध्ये कार्यरत असणारे रिझर्व बँक मार्फत केली जात होती. पण सध्याच्या काळामध्ये ईडी महसूल विभागाच्या अंतर्गत काम करते. म्हणून ईडी महसूल विभागाच्या अंतर्गत असल्यापासून कस्टम, प्राप्तिकर विभाग, पोलीस आशा संस्थेतून ईडी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. ईडी मध्ये नेमणूक केलेले प्रत्येक अधिकारी हा निडर आणि निर्भय असतो. यातील अधिकार्‍यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो.

तर मित्रांनो! “ED Full Form in Marathi” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

धन्यवाद!

Jay Vijay Kale

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.