बीएससी नर्सिंग (बेसिक) कोर्स | BSc Nursing Information in Marathi

By: जय विजय काळे •  Last modified: 15/12/2022

बीएससी नर्सिंग (बेसिक) कोर्ससाठी मी पात्र आहे का? (BSc Nursing Course Information in Marathi)

Bsc Nursing Information in Marathi
Bsc Nursing Information in Marathi

बीएससी नर्सिंग (बेसिक) कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काही अटी आहेत.

वयाची अट:

प्रवेश घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 35 वर्षे पाहिजे.

जर तुमचे वय 17 वर्षा पेक्षा कमी किंवा 35 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही नर्सिंग कोर्स साठी अपात्र आहात.

शिक्षणाची अट:

तुम्ही 10 + 2 मध्ये सायंन्स स्ट्रिम निवडणे अनिवार्य आहे. सायंन्स मधे  तुमचे खालील विषय असणे बंधनकारक आहेः

जर तुम्ही यामधील एकही विषय घेतला नसेल तर तुम्ही बीएससी (बेसिक) कोर्स साठी अपात्र आहात.

तुमचे 45 टक्के एकुण गुण भरले पाहिजे. जर तुमचे 45 टक्के एकुण गुण भरले नाही तर तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही.

तुमचे 10+2 चे कॉलेज AISSCE, CBSE, ICSE, SSCE, HSCE  किंवा अन्य समांतर बोर्डानी प्रमाणित केलेले पाहिजे.

तुम्ही तुमच्या कॉलेजला या बद्दल चैकशी करू शकता.

वरिल सगळया अटी जर तुम्ही पुर्ण करत असाल तर तुम्ही कोर्स साठी पात्र आहात.

Read – Nursing Course Information in Marathi

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्सची एडमिशन प्रोसेस कशी असते?

Admission साठी NEET एंन्ट्रांन्स एक्जाम दयावी लागेल. 

जर तुम्हाला ऑनलाइन सापडायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही कॉलेज वर जावुन चैकशी करू शकता. तुम्हाला कॉलेज प्रशासन सगळी माहीती देईल.

Admission वर्षांतुन एकदाच होत असते त्यामुळे एक्जाम डेटस् आणि फॉर्म भरण्याच्या डेटस् वर लक्ष ठेवणे.

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्स ची फिस किती असते? हा कोर्स पुर्ण करायला कीती खर्च येतो?

कोर्सची फिस तुम्ही कोणत्या कॉलेजला Admission घेत आहात त्यावर अवलंबुन आहे.

सरासरी फिस 20 हजार ते 1 लाख पर्यंत असते. फिसची माहीती तुम्ही कॉलेजला कॉल करून किंवा भेट देवुन मिळवु शकता.

जर तुम्ही हॉस्पिटलला राहणार असाल तर तो खर्च वाढेल.

जर तुम्ही मुंबई, पुणे, नागपुर सारख्या शहरांमध्ये कोर्स पुर्ण करणार असल तर तुमचा इतर खर्च 10 हजार असु शकतो.

हा खर्च तुमच्या राहण्याच्या पध्दतीवर पण अवलंबुन असतो.

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्स पुर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतात?

कोर्स पुर्ण होण्यासाठी 4 वर्षे लागतात.

कोर्स नंतर तुम्ही जॉब करू शकता किंवा पुढे शिकण्याचे हि खुप मार्ग आहेत.

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्स केल्यावर मला नोकरी भेटते का? जर नोकरी भेटत असेल, तर पगार किती भेटेल?

हो, BSc (बेसिक) नर्सिंग कोर्स केल्यावर तुम्हाला नोकरी भेटू शकते.

सरासरी 2-4 लाख पर्यंत पगार भेटतो. तुम्हाला कोण नोकरी देतंय यावर तुमचा पगार अवलंबुन आहे.

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्स केल्यावर मला कुठे नोकरी भेटेल?

हा कोर्स केल्यावर, तुम्हाला हया ठिकाणी नोकरी भेटू शकतेः

BSc (बेसिक) नर्सिंग कोर्सचे कॉलेज कोणते?

आपल्या जवळील नर्सिंग कॉलेजची माहिती काढण्यासाठी तुम्ही गुगलचा वापर करू शकता.

गुगलवर जा आणि ‘‘नर्सिंग कॉलेज निअर मी’’ सर्च मारा.

तुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये तुमच्या जवळचे नर्सिंग कॉलेजचे नाव वा पत्ता गुगल दाखवेल.

आम्हाला फॉलो करा -

Image contains man with a beard

जय विजय काळे

नमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.

Keep Reading