बीसीए अभ्यासक्रमाची माहिती | BCA Course Information in MarathiTable Of Contents

बीसीए अभ्यासक्रमाची माहिती | BCA Course Information in Marathi

आताच्या काळात आपल्याला कोणतीही कामे हे संगणकाद्वारे पूर्ण होतांना दिसत आहे. आजचा काळा हा तंत्रज्ञानाचा काळ बणलेलाआहे. या आधुनिक काळात सर्व तरुण पिढी ही संगणका कडे आकर्षित झालेली आहे.

मोठाले एजन्सी व आयटी कंपनी या ज्यांचे संगणकामध्ये शिक्षण झाले आहे त्यांना नोकरीची संधी देत आहे व त्या विद्यार्थ्यांची मागणी जास्त आहे.

या कंपन्या विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची व भक्कम पगार मिळण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. म्हणून ज्यांना संगणकाचे आवळ आहे ज्यांना परदेशी जायचे आहे आणि भरपूर पगार कमवायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी बीसीए कोर्स करावा.

तर आता आपण बी.सी.ए कोर्स काय आहे? त्याबद्दल माहिती पाहूया (BCA course information in Marathi):-

विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण व कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रश्न पडतो की आता कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यावी व कोणता कोर्स आपल्यासाठी योग्य असेल. अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे आपण पाहूया.

बी. सी. ए म्हणजे काय? त्याचा फुल फॉर्म काय होतो?

हा कोर्स संगणकाशी निगडित कोर्स आहे आणि हा पदवीधर कोर्स आहे.

बी.सी.ए चा फुल फॉर्म “बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन” असा होतो.

बी.सी.ए कोर्स कोण करू शकते?

ज्यांना संगणकाची आवड आहे व ज्यांना आयटी कंपनीमध्ये काम करायचे आहे व संगणकाशी निगडीत भरपूर काही माहिती शिकायची आहे अशा विद्यार्थ्यांनी BCA हा कोर्स करणे योग्य ठरेल.

आर्ट व सायन्स क्षेत्रातून 12 वी झालेली विद्यार्थी BCA हा कोर्स करू शकतात.

बी. सी. ए कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता किती असायला हवी?

हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थी 12 वी मध्ये आर्ट्स व सायन्स या क्षेत्रात गणित व इंग्रजी या विषयांसह 50 टक्के गुणांनी पास असायला हवा.

हे देखील वाचा:  12 वी arts नंतर काय करावे?

काही कॉलेजेस मध्ये हा कोर्स करण्याआधी एट्रन्स एक्झाम द्यावी लागते. या एक्झाम च्या गुणांन वरुन विद्यार्थ्यांची पात्रता ठरवली जाते.

बी. सी. ए कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा किती असायला हवी?

हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याचे वय हे 17 वर्षे असायला हवे किंवा 22 ते 25 वर्ष तरी असायला हवे.

बी.सी.ए कोर्स हा किती वर्षांचा कोर्स आहे?

हा कोर्स 3 वर्षाचा पदवीधर कोर्स आहे.

सेमिस्टर पॅटर्न चा हा कोर्स आहे. यात 6 सेमिस्टर आहेत.

BCA full form बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (Bachelor of Computer Application)
Career SideComputer, IT, Digital Marketing, Developer, etc
Eligibility12th Pass with English and Mathematics
Course Duration 3 वर्ष
BCA Course Information in Marathi

BCA कोर्स अभ्यासक्रम कसा आहे?

BCA कोर्स अभ्यासक्रम कसा आहे ते आपण पाहूया:-

या कोर्समध्ये संगणकाशी जोडलेली विषयांचा समावेश असतो. हा कोर्स 6 सेमिस्टरचा कोर्स आहे आणि प्रत्येक सेमिस्टर मध्ये ही वेगवेगळे विषय शिकवले जातात ते पुढील प्रमाणे:-

सेमिस्टर 1:- * डिजिटल संगणकाचे मूलभूत तत्त्वे, *इंग्रजी, *गणित, *प्रोग्राममीगचा परीचय, * पीसी सॉफ्टवेअर लॅब, *सी लॅब.

सेमिस्टर 2 :- *संवादात्मक इंग्रजी, *गणित *ऑपरेटिंग सिस्टिम, *डेटा स्ट्रक्चर, * व्हिजुअल प्रोग्रामिंग लॅब, *केस टूल्स लॅब.

सेमिस्टर 3:- * परस्पर संवाद, *प्रस्ताविक बीजगणित, *सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, *C++ वापरून ओरिएंटेड प्रणाली, *C++ लॅब.

सेमिस्टर 4:- *व्यावसायिक इंग्रजी, *आर्थिक व्यवस्थापन, *संगणक नेटवर्क, *जावा प्रोग्रामिंग व लॅब *वेब तंत्रज्ञान प्रयोगशाळा, *भाषा प्रयोगशाळा.

सेमिस्टर 5 :- * युनिक्स प्रोग्रामिंग, *इंटरफेस डिझायनर, *ग्राफिक्स व ॲनिमेशन, *व्यवसाय बुद्धिमत्ता, *वेब डिझाईनिंग प्रोजेक्ट.

सेमिस्टर 6 :- * अल्गोरिदम चे डिझाईन आणि विश्लेषण, * संगणक आर्किटेक्चर, *मल्टी मीडिया अनुप्रयोग, प्रगत डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली.

इत्यादी विषय बी.सी.ए च्या 3 वर्षाच्या 6 सेमेस्टर मध्ये असतात.

BCA कोर्स करण्यासाठी कोणती कॉलेजेस चांगली आहेत?

कोणतेही शिक्षण घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची असते उत्तम प्रकारची कॉलेज जीथे आपल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल असेच कॉलेज आपण निवडतो.

बी.सी.ए कोर्स करण्यासाठी पुढील कॉलेजेस उत्तम दर्जाची आहेत:-

 • मुंबईचे, BCA कॉलेज.
 • गव्हर्मेंट बी.सी.ए कॉलेज, मुंबई.
 • बंगलोरचे, ए.आय.टी कॉलेज.
 • यू.पी.ई.ए कॉलेज, डेहराडून.

हे आपण मोठे शहरातील नामांकित कॉलेज यांची नावे पहिले पण प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांमध्ये बी.सी.ए ची कॉलेज उपलब्ध आहेत. आणि तिथे सुद्धा उत्तम दर्जाचे शिक्षण आपल्याला मिळू शकते. परंतु प्रायव्हेट कॉलेज च्या तुलनेमध्ये गव्हर्मेंट कॉलेज मध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण कमी फीस मध्ये मिळते.

BCA कोर्स करण्यासाठी किती फी भरावी लागते?

BCA कोर्स करण्यासाठी सर्वसाधारण 70,000 ते 2 लाखापर्यंत फी लागते. परंतु प्रत्येक ठिकाणी कॉलेज कशा प्रकारचे आहेत यावर फी अवलंबून असते. काही प्रायव्हेट कॉलेजमध्ये दरवर्षाला 30,000 रुपये फी भरावी लागते.

प्रायव्हेट कॉलेज च्या तुलनेत गव्हर्मेंट कॉलेजची फी ही कमी असते गव्हर्नमेंट कॉलेजची फी 20,000ते 40,000 पर्यंत असते.

BCA कोर्स करण्याचे फायदे कोणते आहेत?

BCA कोर्स करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:-

1. आताच्या काळात सर्व प्रकारची कामे हे डिजिटल व तंत्रज्ञानामुळे लवकर होतात या काळात टिकून राहायचं असेल तर हा कोर्स करणे अधिक फायद्याचे आहे.

2. ज्यांना संगणकाची आवड आहे व संगणकामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशांसाठी हा कोण फायद्याचा आहे.

हे देखील वाचा:  बारावी विज्ञान ( सायन्स ) नंतर काय ? | बारावी Science नंतरचे कोर्स

3. ज्यांना आयटी क्षेत्रात जॉब करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स फायद्याचा आहे.

4. भारतात व भारताबाहेर आयटी कंपन्यांमध्ये संगणकाशी निगडीत कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी भरपूर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या कोर्सचा फायदा होऊ शकतो.

5. बी.सी.ए कोर्स केल्यामुळे आपल्याला संगणकाबद्दल माहिती मिळते व आपल्याला खूप काही शिकायला मिळते म्हणून हा कोर्स फायद्याचा आहे.

6. चांगली नोकरी व चांगला पगार मिळण्यासाठी हा कोर्स एक उत्तम संधी म्हणून फायद्याचा ठरतो.

7. ज्यांना परदेशी जाऊन उत्तम प्रकारची नोकरी करण्याची इच्छा आहे व भरपूर पैसा कमावण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स एक उत्तम संधी घेऊन आलेला आहे.

इत्यादी फायदे आपल्याला बी. सी.ए कोर्स करण्याचे होतात.

BCA कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कौशल्याची आवश्यकता असायला हवी?

पुढली कौशल्ये असायला हवी:-

1. चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलता यावे.

2. संगणकाबद्दल चे बेसिक ज्ञान असायला हवे.

3. उत्तम संवादाचे व व्यवस्थापनाचे कौशल्य हवे.

4. भरपूर आत्मविश्वास असायला हवा.

5. सॉफ्टवेअर व प्रयोग बनवण्याची क्षमता असायला हवी.

6. उत्तम प्रकारे टिम र्वक करता यायला हवे.

7. कोणत्याही प्रकारचे काम समोर आले तर ते काम करण्याची मानसिक व शारीरिक क्षमता असायला हवी.

BCA कोर्स केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत?

बी.सी.ए कोर्स केल्यानंतर आयटी कंपनी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. हा कोर्स केल्यानंतर आयटी कंपन्या स्वतःहून आपल्याला नोकरीची संधी देतात.

तसेच आपण हा कोर्स केल्यानंतर गुगल-फेसबुक व इत्यादींमध्ये नोकरी मिळवू शकतो.

BCA कोर्स नंतर आपल्याला कोणत्या प्रकारच्या पदांवर नोकरी मिळू शकते ते पाहूया:-

 • सॉफ्टवेअर डेव्हलपर
 • वेब डेव्हलपर
 • कनिष्ठ प्रोग्रामर
 • सॉफ्टवेअर प्रशिक्षक
 • गेम डिझायनर
 • सॉफ्टवेअर सल्लागार
 • संगणक सहाय्यक सेवा विशेषज्ञ
 • प्रणाली अभियंता.

सरकारी संस्था मध्ये संगणक व्यावसायिकाच्या पदावर नोकरी मिळते.

इत्यादी पदे आपल्याला नोकरीमध्ये मिळू शकतात.

बी.सी.ए कोर्स नंतर कोणत्या कंपन्या नोकरी करण्यासाठी उत्तम आहेत?

 • इन्फोसिस
 • ओरेकल
 • विप्रो
 • आयबीएम. इत्यादी प्रायव्हेट मोठ्या कंपन्या नोकरी साठी उत्तम आहेत.

त्याचप्रमाणे सरकारी संस्थांमध्ये 1.इंडियन आर्मी, 2.इंडियन एअर फॉर्स, 3.इंडियन नेव्ही,यासारख्या संस्था नोकरीसाठी उत्तम आहेत.

नोकरी मध्ये किती पगार आपल्याला भेटू शकतो?

सर्व प्रथम आपल्याला कोणत्या पदावर नोकरी मिळाली आहे त्यानुसार आपला पगार ठेवत असतो.

जसे की:- बी.सी.ए नंतर आपण कंपन्यांमध्ये प्रेशर्स म्हणून नोकरी करत असू तर आपल्याला 20 ते 30,000 एवढा पगार मिळतो किंवा त्याहून जास्त मिळू शकतो. मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली तर पगार हा लाखोंनी मिळतो.

** नोकरीचे पद व पगार:-

 • सॉफ्टवेअर परीक्षकाला 2 ते 4.5 लाख पगार
 • प्रणाली अभियंत्याला 4 ते 5लाख वर्षाचा पगार
 • वेब डिझायनरला 2.5 ते 5 लाख वर्षाचा पगार
 • सॉफ्टवेअर डेव्हलपर ला वर्षाला 3 ते 8 लाख पगार
 • व्यवसाय विश्लेषकाला वर्षाचा 3 ते 6 लाख पगार

तसेच, सरकारी संस्था व एजन्सी मध्ये चांगल्या प्रकारचा पगार आपल्याला मिळतो.

कंपनी,एजन्सी व संस्था या व्यतिरिक्त आपण बी. सी.ए कोर्स केल्यानंतर नोकरी कुठे करू शकतो?

बी. सी. ए कोर्स नंतर आपण शाळेत किंवा कॉलेजेस मध्ये संगणकाचे शिक्षक म्हणून नोकरी करू शकतो. या नोकरीमध्ये आपल्याला चांगला पगार आपल्याला मिळतो.

हे देखील वाचा:  कंपनी सेक्रेटरी (CS) असत तरी काय || कसा घ्यायचा प्रवेश || What is CS || CS Course Full Information in Marathi || New Syllabus introduce CSEET

विद्यार्थ्यांना या कोर्स शी निगडित आणखी काही प्रश्न पडतात ते एक प्रश्न कोणते ते आपण पाहूया:-

बी. सी. ए कोर्स केल्यानंतर एम.सी.ए कोर्स करणे गरजेचे आहे का?

बी. सी.ए नंतर एम. सी. ए कोर्स करावाच लागतो असे काही गरजचे नाही.

परंतु ज्यांना संगणकाची आवड आहे व संगणक क्षेत्रामध्ये पुढे जायचे आहे खूप काही शिकायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी एम. सी. ए कोर्स केला तरी चालेल.

बी.सी.ए कोर्स करण्यासाठी 12 मध्ये इंग्रजी व गणित हा विषय असणे अनिवार्य आहे का?

होय, बी. सी. ए कोर्स करतांना 12 वी मध्ये गणित व इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

कारण की या कोर्समध्ये 6 सेमिस्टर आहेत आणि या 6 सेमिस्टर मध्ये गणित व इंग्रजी हे विषय आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना 12 वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे.

BCA नंतर काय?

BCA Course information in Marathi
BCA Course information in Marathi

 हा प्रश्न BCA उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो.

नोकरी हा एक पर्याय असतोच पण त्याच बरोबर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

तुम्हीं BCA नंतर लगेच MCA करू शकता. त्याच बरोबर तुम्हीं इतर काही पर्यायांचा देखील विचार करू शकता.  

 • CAT ही प्रवेश परीक्षा देऊन तुम्हीं MBA in IT Management ला प्रवेश घेऊ शकता. (Read: MBA Course Information in Marathi)
 • तुम्हीं तुमचे Masters हे MSC in IT करून देखील पूर्ण करू शकता.
 • तुम्ही Networking डिप्लोमा ला प्रवेश घेऊन CCNP व CCNA हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.
 • तुम्हीं Microsoft Certified Solutions Associate (MCSA) Certification किंवा Redhat certifications  मिळउन  System Administrator किंवा Desktop Technician or Help desk  म्हणून काम करू शकतात.
 • तुम्हीं कॉम्प्युटर शिक्षक म्हणून देखील काम करू शकता.
 • जर तुम्हाला Web Programing आवडत असेल तर तुम्ही तुमचे Coding skills सुधारून तुम्ही स्वतंत्र Web Disigner म्हणून काम करू शकता.
 • बरेचसे BCA पदवीधर सरकारी नोकरी साठी जातात. तुम्हीं देखील जाऊ शकता.

 वरील गोष्टीन वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि BCA कोर्स आहे तरी काय (BCA Course information in Marathi). तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली Comment करा.

BCA कोर्ससाठी पर्याय

Disclosure: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.